फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीक

फळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला पर्याय आहे. फळपिके एकमेकांपासून लांब अंतरावर घेतली जातात. त्यामुळे लागवडीमधील पट्यात फुलपिकांची लागवड करावी. आंतरपीक पद्धतीमध्ये मुळांच्या पद्धती आणि वाढीच्या कालावधीत भिन्नता असणारी पिके किंवा अर्धवट सावली आवश्यक असलेल्या लहान पिकासह उंच पीक लागवडीसाठी निवडली जातात.
intercrop of marigold in pomegranate
intercrop of marigold in pomegranate

फळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला पर्याय आहे. फळपिके एकमेकांपासून लांब अंतरावर घेतली जातात. त्यामुळे लागवडीमधील पट्यात फुलपिकांची लागवड करावी. आंतरपीक पद्धतीमध्ये मुळांच्या पद्धती आणि वाढीच्या कालावधीत भिन्नता असणारी पिके किंवा अर्धवट सावली आवश्यक असलेल्या लहान पिकासह उंच पीक लागवडीसाठी निवडली जातात.

कमीत कमी जागेत आणि कमी वेळेत जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न देण्याची क्षमता विविध फुलपिकांत आहे. फुलांचे मुख्य पीक न घेता इतर मुख्य (फळे आणि भाजीपाला) पिकांसोबतच आंतरपीक म्हणून लागवड करणे शक्य आहे. आंतरपिकामुळे लागवडीयोग्य क्षेत्र तसेच जमिनीतील अन्नद्रव्य, पाणी आणि सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर होतो. त्यामुळे एक पीक पद्धतीपेक्षा आंतरपिकांत जास्त उत्पन्न मिळते.   आंतरपीक पद्धतीमध्ये माती, हवामान, पिके आणि जातींचा विचार करून काळजीपूर्वक नियोजन करावे. ही पीक पद्धती लागवड क्षेत्र, पोषकद्रव्ये, पाणी किंवा सूर्यप्रकाशासाठी एकमेकांशी  स्पर्धा करणारी नसावीत. आंतरपीक पद्धतीमध्ये मुळांच्या पद्धती आणि वाढीच्या कालावधीत भिन्नता असणारी पिके किंवा अर्धवट सावली आवश्यक असलेल्या लहान पिकासह उंच पीक लागवडीसाठी निवडली जातात.

फळझाडांमध्ये फुलांचे आंतरपीक 

  • फळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला पर्याय आहे. फळपिके एकमेकांपासून लांब अंतरावर घेतली जातात. त्यामुळे लागवडीमधील पट्यात फुलपिकांची लागवड करावी.
  • नारळ  ७.५ x ७.५ मीटर अंतरावर लावले जातात.त्यामुळे फक्त २२.३ टक्के क्षेत्राचा प्रभावी वापर होतो. आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, द्राक्ष, संत्रे, डाळिंब यासारख्या जास्त अंतरावरील  फळ पिकांमध्ये फुलझाडांची लागवड अत्यंत कार्यक्षमतेने करता येऊ शकते.
  • अनेक प्रयोगात्मक अभ्यासातून असे दिसून आले आहे की फूलपीक हे आंतरपीक म्हणून घेतले असता, मुख्य पिकांच्या उत्पन्नावर किंवा गुणवत्तेवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. 
  • फुलपिकांचे आंतरपीक घेण्याचे फायदे

  •  कमी कालावधीमध्ये फुलपिकांची काढणी करता येते.
  • आवश्यकता आणि मागणी नुसार मुख्य पिकामध्ये लागवड करता येते. 
  • फुल पिकांचा सापळा पीक म्हणून उपयोग करता येतो. 
  • फळ बागांमध्ये फुलपिके घेतल्यास परागीभवन अधिक प्रभावीपणे  होते. फळधारणा सुधारते.
  • फळबागांमध्ये झाडांच्या दोन ओळीमधील जागेचा फुल पिकांच्या लागवडीसाठी योग्य वापर करता येतो.
  • आंतरपीक मोकळ्या जागेत वाढणारे तण कमी करते. खुरपणीचा खर्च कमी करता येतो. 
  • फुलपिकांचे आंतरपीक घेताना 

  • पीक निवडताना मुख्य पिकाचा आणि आंतरपीक यांच्या वाढीचा कालावधी किती आहे याची खात्री करूनच आंतरपिकाची निवड करावी.
  • कंद वर्गीय फुलपिके (ग्लॅडिओलस, लिली, निशिगंध, इ.) ही दुसऱ्या कंद वर्गीय (बटाटे, रताळी, इ.) पिकांसोबत घेऊ नये.
  • फळ बागांमध्ये आंतरमशागतीसाठी लागणाऱ्या जागेचा तसेच काही यंत्रे/ट्रॅक्टरचा होणार वापर लक्षात घेऊनच फुलपिके लागवडीचे नियोजन करावे.
  • फळ बागांमध्ये मुख्य फळांचा हंगाम लक्षात घेऊनच आंतरपिकाच्या लागवडीचा निर्णय घ्यावा.
  •  -  ०२०-२५५३७०२४  - डॉ गणेश कदम, ८७९३११५२७७  ( पुष्प विज्ञान संशोधन निदेशनालय, शिवाजीनगर, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com