Agriculture Agricultural News Marathi article regarding inter crop of flower crops in fruit orchard. | Agrowon

फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीक

डॉ गणेश कदम
शुक्रवार, 5 जून 2020

फळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला पर्याय आहे. फळपिके एकमेकांपासून लांब अंतरावर घेतली जातात. त्यामुळे लागवडीमधील पट्यात फुलपिकांची लागवड करावी. आंतरपीक पद्धतीमध्ये मुळांच्या पद्धती आणि वाढीच्या कालावधीत भिन्नता असणारी पिके किंवा अर्धवट सावली आवश्यक असलेल्या लहान पिकासह उंच पीक लागवडीसाठी निवडली जातात.

फळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला पर्याय आहे. फळपिके एकमेकांपासून लांब अंतरावर घेतली जातात. त्यामुळे लागवडीमधील पट्यात फुलपिकांची लागवड करावी. आंतरपीक पद्धतीमध्ये मुळांच्या पद्धती आणि वाढीच्या कालावधीत भिन्नता असणारी पिके किंवा अर्धवट सावली आवश्यक असलेल्या लहान पिकासह उंच पीक लागवडीसाठी निवडली जातात.

कमीत कमी जागेत आणि कमी वेळेत जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न देण्याची क्षमता विविध फुलपिकांत आहे. फुलांचे मुख्य पीक न घेता इतर मुख्य (फळे आणि भाजीपाला) पिकांसोबतच आंतरपीक म्हणून लागवड करणे शक्य आहे. आंतरपिकामुळे लागवडीयोग्य क्षेत्र तसेच जमिनीतील अन्नद्रव्य, पाणी आणि सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर होतो. त्यामुळे एक पीक पद्धतीपेक्षा आंतरपिकांत जास्त उत्पन्न मिळते.  
आंतरपीक पद्धतीमध्ये माती, हवामान, पिके आणि जातींचा विचार करून काळजीपूर्वक नियोजन करावे. ही पीक पद्धती लागवड क्षेत्र, पोषकद्रव्ये, पाणी किंवा सूर्यप्रकाशासाठी एकमेकांशी 
स्पर्धा करणारी नसावीत. आंतरपीक पद्धतीमध्ये मुळांच्या पद्धती आणि वाढीच्या कालावधीत भिन्नता असणारी पिके किंवा अर्धवट सावली आवश्यक असलेल्या लहान पिकासह उंच पीक लागवडीसाठी निवडली जातात.

फळझाडांमध्ये फुलांचे आंतरपीक 

 • फळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला पर्याय आहे. फळपिके एकमेकांपासून लांब अंतरावर घेतली जातात. त्यामुळे लागवडीमधील पट्यात फुलपिकांची लागवड करावी.
 • नारळ  ७.५ x ७.५ मीटर अंतरावर लावले जातात.त्यामुळे फक्त २२.३ टक्के क्षेत्राचा प्रभावी वापर होतो. आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, द्राक्ष, संत्रे, डाळिंब यासारख्या जास्त अंतरावरील  फळ पिकांमध्ये फुलझाडांची लागवड अत्यंत कार्यक्षमतेने करता येऊ शकते.
 • अनेक प्रयोगात्मक अभ्यासातून असे दिसून आले आहे की फूलपीक हे आंतरपीक म्हणून घेतले असता, मुख्य पिकांच्या उत्पन्नावर किंवा गुणवत्तेवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. 

फुलपिकांचे आंतरपीक घेण्याचे फायदे

 •  कमी कालावधीमध्ये फुलपिकांची काढणी करता येते.
 • आवश्यकता आणि मागणी नुसार मुख्य पिकामध्ये लागवड करता येते. 
 • फुल पिकांचा सापळा पीक म्हणून उपयोग करता येतो. 
 • फळ बागांमध्ये फुलपिके घेतल्यास परागीभवन अधिक प्रभावीपणे  होते. फळधारणा सुधारते.
 • फळबागांमध्ये झाडांच्या दोन ओळीमधील जागेचा फुल पिकांच्या लागवडीसाठी योग्य वापर करता येतो.
 • आंतरपीक मोकळ्या जागेत वाढणारे तण कमी करते. खुरपणीचा खर्च कमी करता येतो. 

 

फुलपिकांचे आंतरपीक घेताना 

 • पीक निवडताना मुख्य पिकाचा आणि आंतरपीक यांच्या वाढीचा कालावधी किती आहे याची खात्री करूनच आंतरपिकाची निवड करावी.
 • कंद वर्गीय फुलपिके (ग्लॅडिओलस, लिली, निशिगंध, इ.) ही दुसऱ्या कंद वर्गीय (बटाटे, रताळी, इ.) पिकांसोबत घेऊ नये.
 • फळ बागांमध्ये आंतरमशागतीसाठी लागणाऱ्या जागेचा तसेच काही यंत्रे/ट्रॅक्टरचा होणार वापर लक्षात घेऊनच फुलपिके लागवडीचे नियोजन करावे.
 • फळ बागांमध्ये मुख्य फळांचा हंगाम लक्षात घेऊनच आंतरपिकाच्या लागवडीचा निर्णय घ्यावा.

 

 -  ०२०-२५५३७०२४
 - डॉ गणेश कदम, ८७९३११५२७७ 
( पुष्प विज्ञान संशोधन निदेशनालय, शिवाजीनगर, पुणे)

 


इतर फूल शेती
गुलाब फुलांचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानफूल काढणीसाठी स्वच्छ आणि धारदार सिकेटर वापरावे....
हरितगृहात गुलाब लागवडीनंतर घ्यावयाची...हरितगृहामध्ये गुलाब लागवड केल्यानंतर त्यांची...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...
गुलाबावरील लाल कोळीचे नियंत्रणसध्या दुपारचे तापमान वाढत आहे. मात्र रात्री...
पॉलिहाउसमधील गुलाबशेतीत तयार केली ओळखऊसशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्लामपूर (जि....
ॲस्टर लागवडीसाठी वापरा सुधारित वाणॲस्टर हंगामी फुलपीक असून, त्याची लागवड...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
निशिगंध लागवडीचे नियोजनलागवड केल्यापासून निशिगंध पीक २ ते ३ वर्षे त्याच...
ग्लॅडिओलस कंदांची काढणी, साठवणूकयोग्य टप्प्यावर ग्लॅडिओलस कंदांची काढणी करणे...
नियोजन मोगरावर्गीय फुलशेतीचेमोगरावर्गीय फुलझाडामध्ये मोगरा, जाई, जुई, चमेली,...
निशिगंध लागवड तंत्रज्ञाननिशिगंध हे एक कंदवर्गीय फूलझाड असून महाराष्ट्रात...
ग्लॅडिओलस पिकातील खत व्यवस्थापनग्लॅडिओलसची चांगल्या प्रतीची फुले आणि कंदांचे...
ग्लॅडिओलस लागवडीसाठी निवडा योग्य जातग्लॅडिओलस फुलांना जागतिक आणि देशांतर्गत...
लागवड हेलिकोनियाची...हेलिकोनियाची लागवड वर्षभर केव्हाही करता येते....
..ही आहेत दर्जेदार मोगरा उत्पादनाची...मोगऱ्याच्या झाडाची योग्य पद्धतीने छाटणी करावी....
अशी करा गॅलार्डिया लागवड गॅलार्डियाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते....
ग्लॅडिओलस लागवडग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा...
क्षारपड जमिनीत फुलवली कार्नेशनची शेती सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी येथील तरुण शेतकरी...
फुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...
हरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...