Agriculture Agricultural News Marathi article regarding machines for cococnut harvest and process | Agrowon

नारळ काढणी, सोलण्यासाठी यंत्रे फायदेशीर

कु. अश्विनी चोथे
रविवार, 12 जुलै 2020

नारळ काढणी, झावळ्यांची स्वच्छता, कीडनाशक फवारणी ही कामे सुलभ होण्यासाठी शिडीचा वापर फायदेशीर ठरतो. याचबरोबरीने नारळ सोलणी यंत्र, विद्युत मोटरचलित नारळ सोलणी यंत्र कमी वेळेत नारळ सोलणीसाठी उपयुक्त ठरते. 

नारळ काढणी, झावळ्यांची स्वच्छता, कीडनाशक फवारणी ही कामे सुलभ होण्यासाठी शिडीचा वापर फायदेशीर ठरतो. याचबरोबरीने नारळ सोलणी यंत्र, विद्युत मोटरचलित नारळ सोलणी यंत्र कमी वेळेत नारळ सोलणीसाठी उपयुक्त ठरते. 

सद्यस्थितीत मजुरांद्वारे नारळाची काढणी करून घेतली जाते. मजूर झाडावर पारंपरिक पद्धतीने चढून नारळाची काढणी करतो. एका माणसाला एका झाडावरून नारळ काढण्यास जवळपास चार तास लागतात. पावसाळ्यात नारळ काढणीवर मर्यादा येतात; तसेच हे काम शारीरिकदृष्ट्या कष्ट आणि जोखमीचे असल्याने नारळ काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. हे लक्षात घेऊन सुधारित शिडीचा वापर फायदेशीर ठरतो.

झाडावर चढण्याची शिडी 

 • नारळ काढणी, झावळ्यांची स्वच्छता, कीडनाशक फवारणी या कामासाठी शिडीचा वापर फायदेशीर ठरतो. यासाठी एका व्यक्तीची आवश्यकता असते. 
 • शिडी चांगल्या स्टीलबारपासून बनविलेली आहे. त्यावर वायररोप जोडलेला असतो.ही शिडी गंजरोधक असल्यामुळे कुठल्याही वातावरणात वापरण्यास योग्य आहे. 
 • शिडीच्या विविध भागात यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. या शिडीस डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने मान्यता दिलेली आहे.

शिडी वापरण्याची कृती  

 • शिडीचे दोन्ही भाग नारळाच्या खोडावर बसवावेत.
 • शिडीसोबत सेफ्टी बेल्ट कमरेला घट्ट बसवावा.
 • शिडीच्या पायडलमध्ये पाय ठेवून व हँडलला पकडून शिडीवर उभे राहावे.
 • डाव्या पायावर भार देऊन उजव्या पायाच्या शिडीचा पायडल व नंतर शिडी उचलावी. परत उजव्या पायावर भार देऊन डाव्या पायाच्या शिडीचा पायडल व नंतर शिडी उचलावी.नारळ पेडीपर्यंत पोचेपर्यंत वरील दोन्ही क्रिया करत राहावे.
 • परिपक्व नारळ काढावा. झावळ्यांची स्वच्छता करावी. पुन्हा झाडावरून जमिनीपर्यंत 
 • सुरक्षितपणे उतरावे. नारळाच्या खोडावरून शिडी बाजूला काढावी.

वैशिष्ट्ये 

 • शिडीच्या वापरासाठीचे तंत्र सोपे आहे.
 • झाडावर चढण्यासाठी पारंपरिक पद्धतीपेक्षा खूपच कमी कष्ट लागतात. 
 • शिडीच्या साह्याने नारळ काढणी; तसेच झाडाची स्वच्छता करणे पारंपरिक पद्धतीपेक्षा सुरक्षित आहे. 
 • अकुशल आणि असुरक्षित व्यक्तीसुद्धा या शिडीचा सहज वापर करू शकतो. 
 • माफक किंमत व सहजरीत्या बाजारात उपलब्ध आहे.
 • शहाळे; तसेच बियाण्यांसाठीची नारळ झाडावरून उतरविण्यासाठी फायदेशीर. 
 • मनुष्यबळ    १ माणूस 
 • क्षमता    ५० झाडे प्रतिदिन/प्रतिमनुष्य 
 • किंमत    २,००० रुपये 
   

विद्युतचलित नारळ सोलणी यंत्र 

 • या यंत्रामध्ये २ अश्वशक्तीची विद्युत मोटार बसवलेली आहे. मोटारीची गती कमी करून ताकद वाढविण्यासाठी गियर बॉक्स वापरला आहे. त्यावर दोन दातेरी चक्र बसवले असून या दोन्ही चक्राच्या शाफ्टवर दंडगोलाकार चक्रे बसवली आहेत. 
 • यंत्रातील दोन दातेरी चकत्या एकमेकांना जोडलेल्या असल्यामुळे त्यांच्या शाफ्टवरील चक्रे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला फिरतात. 
 • यंत्राच्या साह्याने सोडण्यासह १२ ते २५ सें.मी. व्यास असलेला नारळ सोलता येऊ शकतो. 
 • सोललेला नारळ हा यंत्र चालवणाराच्या डाव्या हाताला, तर सोडण उजव्या हाताला पडते. 
 • यंत्राने एका तासात सुमारे ४५० ते ५०० नारळ एवढी क्षमता मिळवण्यासाठी तीन मजुरांची आवश्यकता असते. मजुरी खर्च; तसेच वीजबिल लक्षात घेता १०० नारळांसाठी अंदाजे २० ते २५ रुपये खर्च येतो.
   

नारळ सोलणी यंत्र 

 • नारळ सोलणीसाठी प्रामुख्याने कोयत्याचा वापर केला जातो; परंतु आता नारळ सोलणी यंत्र, विद्युत मोटरचलित नारळ सोलणी यंत्र उपलब्ध झाले आहे. 
 • यंत्रामध्ये दोन टोकदार पट्ट्या असून त्या हँडलच्या साह्याने एकत्र आणता येतात आणि एकमेकांपासून बाजूला नेता येतात. 
 • नारळ सोलायचा असल्यास तो आडवा करून दोन्ही पट्ट्या हँडलने एकत्र घेऊन त्यावर आपटावा, म्हणजे या पट्ट्या नारळाच्या सोडण्यामध्ये घुसतात. नंतर हँडल ओढल्यावर दोन पट्ट्यांमधील एक पट्टी जागा सोडते. ही सरकणारी पट्टी सोबत नारळाचे सोडण करवंटीपासून बाजूला करते. हीच क्रिया दोन ते तीन वेळेस केल्यास नारळ पूर्णपणे सोलला जातो. 
 • एका तासात एक माणूस सरासरी ७० ते ८० नारळ सहज सोलू शकतो.
   

- कु. अश्विनी चोथे, ७७४३९९१२०६, 
(कु. अश्विनी चोथे के. के. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक येथे सहायक प्राध्यापक आणि प्रफुल्ल डावरे हे उद्यानविद्या महाविद्यालय, सरळगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे येथे सहायक प्राध्यापक आहेत)


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...
कांदा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेकांदा वाळवून कांद्याच्या फ्लेक्स, चिप्स, चकत्या,...
दुचाकीला ट्रॉलीचे जुगाड अन् सुरू झाला...बीड : शेतात सालदार म्हणून काम करणाऱ्या सचिन...
हवामान अनुकूल रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानबदलत्या हवामानामध्ये राज्यातील प्रमुख पिकांसाठी...
यांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...
पशुआहारातील घटकांची तपासणी महत्वाचीआपल्याला उपलब्ध झालेला पशुआहार किंवा त्यासाठी...
काजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...
आंतरमशागतीसाठी अवजारे ठरतात फायदेशीरतण नियंत्रणासाठी दातेरी हात कोळपे, सायकल कोळपे,...
नारळ काढणी, सोलण्यासाठी यंत्रे फायदेशीर नारळ काढणी, झावळ्यांची स्वच्छता, कीडनाशक फवारणी...
कमी खर्चातील सौर ऊर्जा आधारीत...ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी...
जांभूळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक...औषधी गुणधर्म असूनही व्यावसायिक तत्त्वावरील लागवड...
यंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्यभाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक,...
एका कुटुंबासाठी स्वयंपूर्ण शिवार वसाहतअर्धा एकर शेतजमीन (दोन हजार चौ.मी. सूर्यप्रकाश) व...
कोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी...कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीनच्या लागवडीसाठी जोळओळ...
सुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून...तेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या...
यंत्राद्वारे भात रोपांची लावणीभात लावणी यंत्राचे वॉकिंग टाईप आणि रायडींग टाईप...
भात पेरणीसाठी सुधारित यंत्रेभात लागवडीसाठी सुधारित यंत्राचा वापर फायदेशीर...
पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना...प्रशिक्षित ट्रॅक्‍टरचालक हवा    ...