सिंचनाकरिता चुंबकीय पाणी तंत्राचा वापर

क्षारयुक्त पाण्याचा पीक उत्पादन, गुणवत्ता यावर प्रतिकूल परिणाम होत आहेतच. त्याचबरोबरीने जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. इस्राईल देशाने क्षारयुक्त पाण्यावर उपाय म्हणून चुंबकीय पाणी पद्धत (मॅग्नेटिक सॉफ्टनर) विकसित केली आहे. हे तंत्रसमजून घेऊन वापर केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होणार आहे.
Magnetic water softener
Magnetic water softener

क्षारयुक्त पाण्याचा पीक उत्पादन, गुणवत्ता यावर प्रतिकूल परिणाम होत आहेतच. त्याचबरोबरीने  जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. इस्राईल देशाने क्षारयुक्त पाण्यावर उपाय म्हणून चुंबकीय पाणी पद्धत (मॅग्नेटिक सॉफ्टनर) विकसित केली आहे. हे तंत्र समजून घेऊन वापर केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होणार आहे.

मागील काही वर्षांमध्ये कमी झालेल्या पावसामुळे जमिनीतील क्षार धुऊन जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जमिनीच्या पृष्ठभागावर ते साचत गेल्याने गंभीर समस्या तयार झाली आहे. नदीकाठच्या तसेच कॅनॉल काठच्या सिंचनक्षेत्रातील जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. भूगर्भातील पाण्यातही क्षारांचे प्रमाण वाढले आहे. क्षारयुक्त पाण्याचा सिंचनासाठी वापर केल्यास पाण्यातील विद्राव्य क्षार जमिनीत शोषले जातात. त्यांचे प्रमाण वाढत जाते. अशा क्षारयुक्त जमिनीत पाणी आणि अन्नद्रव्ये यांचे पिकाकडून शोषण होत नाही. त्यामुळे अशा पाण्याचा वापर प्रक्रिया करूनच सुरक्षित पद्धतीने करणे गरजेचे आहे.  क्षारयुक्त पाण्याचे होणारे प्रतिकूल परिणाम 

  •  क्षारांचा मुळांवर विषारी परिणाम होऊन मुळांची टोके मृत पावतात. पिकांची वाढ खुंटते.
  • बियाण्यांची उगवण कमी होते.
  •  जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होऊन सुपीकता घटते. पीक वाढीसाठी आवश्यक नत्र, जस्त, लोह यांची उपलब्धता कमी होते.
  •  उत्पादन कमी होते. उत्पादित शेतमालाची गुणवत्ता खालावते.
  • जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी पिकांना प्राणवायू उपलब्ध होऊ देत नाही. जमिनीचा सामू वाढत जातो.
  • दीर्घकाळ वापर केल्यास जमिनीत जड धातू साठून ते पिकांवाटे मानवी आहारात प्रवेश करू शकतात. अशा पिकांमध्ये ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पाण्यातील कॅल्शिअम, सोडियम यासारख्या क्षारांबरोबर संयोग होऊन मूत्राशयात क्षारांचे खडे तयार होतात. जास्त क्षारयुक्त पाणी पिण्यात 
  • आले तर मुतखड्याचे आजार जडतात.
  • सिंचन पाणी क्षारयुक्त होण्याची मुख्य कारणे  सिंचन पाण्याचे प्रयोगशाळेतून परिक्षण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू हा ६.५ ते ८ पर्यंत असावा. विद्युत वाहकता ०.७५ डेसीसायमन प्रति  मीटर पेक्षा कमी असावी. ठिबक सिंचनासाठी पाण्याची विद्युत वाहकता (क्षारता) ही ३.१२ डेसीसायमन प्रति मीटर किंवा टीडीएस २००० पीपीएम पेक्षा जास्त असल्यास ते पाणी अयोग्य समजले जाते. त्यामुळे ठिबक सिंचनाच्या तोट्यामध्ये क्षारांचे खडे होतात.  त्यामुळे ठिबक संचाची कार्यक्षमता कमी होते.

  • कमी झालेले पावसाचे प्रमाण
  • सिंचनासाठी पाण्याचा शेतीसाठी अमर्याद वापर
  • जमिनीत कमी झालेला सेंद्रिय कर्ब
  •  पीक पद्धतीमध्ये बदल नसणे
  • शिफारशींपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर
  • जमिनींना निचऱ्याचा अभाव
  • क्षारपड जमिनींचे वाढत असलेले क्षेत्र
  • क्षारयुक्त पाण्याचे परिणाम 

  •  पाण्याचा रेणू हा दोन हायड्रोजन अणू व एक ऑक्सिजन अणूपासून बनलेला असतो. निसर्गामध्ये केवळ शुद्ध पाणी अस्तित्वात नाही. त्यामध्ये नेहमी अन्य 
  • पदार्थ विशेषतः खनिजांचे  क्षार विरघळलेले असतात. निरोगी 
  • सजीव सृष्टीकरिता पाण्यामध्ये संतुलित प्रमाणात खनिजे असणे आवश्यक असते. तथापि पाण्यात विरघळलेल्या क्षारांच्या टक्केवारीनुसार पाण्याचे ‘जड’ किंवा ‘हलके’ प्रकारात वर्गीकरण केले जाते. 
  • मुळात, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारख्या खनिज पदार्थांचे पाण्यातील जास्त प्रमाण पाण्याला ‘जड’ म्हणजेच क्षारयुक्त (मचूळ) बनवते.  अशा क्षारयुक्त पाण्यात मोठ्या प्रमाणात लोह, मँगेनीज, सोडियम, बायकार्बोनेट्स आणि सल्फेट मोठ्या प्रमाणात आढळतात. अनेक पाण्याचे व विविध क्षारांचे रेणू मिळून पाण्याचे मोठे-मोठे पुंजके तयार होतात. असे हे आकाराने मोठे बनलेले पुंजके वनस्पती पेशी भित्तिकेतून आत सुरळीतपणे प्रवेश करत नाहीत. यामुळे कितीही प्रमाणात सिंचन केले तरी प्रत्यक्षात ते पिकाला मिळत नाही. परिणामी पिकाची वाढ खुंटते. ते वाळून जाते, उत्पादन कमी होते.  शेतमालाची गुणवत्ता खालावते. असे पाणी फवारणीद्वारे वापरासाठीही अयोग्य असते. 
  • क्षारयुक्त पाणी असल्यास उपाययोजना

    सिंचनातील बदल

  • क्षारयुक्त पाणी चांगल्या पाण्यात मिसळून पिकांना आलटून पालटून दयावे. 
  • क्षारयुक्त पाण्याचा वापर अमर्याद न करता मर्यादित हलके परंतु वारंवार दयावे.
  • सुधारित सिंचन पद्धतींचा (ठिबक, तुषार) वापर करावा.
  • आच्छादन 

  • जमिनीत दिलेल्या पाण्याचे उन्हामुळे अधिक प्रमाणात बाष्पीभवन होऊन क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर येतात. 
  • जमिनीवर आच्छादन केल्यास बाष्पीभवनाची प्रक्रिया मंदावते, क्षार जमा होण्याचे प्रमाण कमी होते. 
  •  मल्चिंग पेपर, शेतातील तण, पीक अवशेष, उसाचे पाचट, भुसा, काड आदींचे आच्छादन करावे.
  • पीकपद्धतीत बदल  

  •  एकसारख्या पीक पद्धतीचा अवलंब न करता पीक पद्धतीमध्ये बदल करीत रहावा. 
  • लागवड सपाट वाफ्यात न करता सरी वरंबा पद्धतीने वरंब्याच्या बगलात करावी. 
  • शिफारशीपेक्षा १५ ते २० टक्के जास्त बियाणांचा वापर करावा. 
  • मूग, उडीद, चवळी, तीळ, वाटाणा, घेवडा आणि लिंबूवर्गीय फळपिके आदी क्षार संवेदनशील पिकांची लागवड न करता गहू, मका, बाजरी, ज्वारी, सोयाबीन, कपाशी, ऊस, कोबी, वांगे, पालक, आवळा, पेरू, चिकू आदी क्षार प्रतिकारक पिकांची लागवड करावी. 
  • काळ्या खोल जमिनीस बाजूने चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
  • सेंद्रिय कर्ब 

  • दोन ते तीन वर्षातून एकदा धैचा किंवा ताग जमिनीत पेरून फुले आल्यावर गाडावा.
  • प्रत्येक पिकास शिफारशीनुसार शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळखत आदी सेंद्रिय खतांचा वापर करावा.
  •  इस्त्राईल तंत्रज्ञान इस्राईल देशाने क्षारयुक्त पाण्यावर उपाय म्हणून चुंबकीय पाणी पद्धत विकसित केलेली आहे. इजिप्त, स्पेन, अरब देश या प्रणालीचा शेतीमध्ये अवलंब करतात. यासाठी वापरण्यात येणाऱ्या मॅग्नेटिक सॉफ्टनर या उपकरणामध्ये फीड पाइपच्या अक्षासोबत आतील बाजूस सममितीयपणे दोन चुंबकीय रॉड बसवलेले असतात. जास्तीत जास्त चुंबकीय क्षेत्र निर्माण करतील या पद्धतीने त्यांची रचना असते. पाण्याच्या प्रवाहाची दिशा चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे असेल अशा अनुषंगाने मुख्य झडप आणि सिंचन पाईप दरम्यान हे उपकरण बसवावे लागते. साधारणपणे ३.५ ते १३६ मिलीटेस्ला ध्रुवीकरण क्षमता असणारा चुंबकांचा यासाठी वापर केला जातो.

    तंत्रातील ठळक बाबी 

  • प्रक्रियेमध्ये पाण्याचे रासायनिक गुणधर्म बदलत नाहीत. परंतु द्रव पाण्याची रचना आणि गुणधर्म बदलतात. यामध्ये चुंबकीय ऊर्जेच्या माध्यमातून तयार होणाऱ्या कंपनांद्वारे क्षारयुक्त पाण्याच्या रेणूचे समान सहा भागांमध्ये परावर्तन केले जाते. 
  • म्हणजेच पाण्याचे रेणू व विविध खनिजांच्या क्षारांचे रेणू यांच्यापासून तयार झालेल्या मोठ्या आकाराच्या पुंजक्यांचे छोट्या पुंजक्यांमध्ये रूपांतर होते. पाण्यामधील क्षार पाण्यापासून वेगळे न होता त्यांचे रूपांतर  सूक्ष्म अशा खनिजांच्या रेणूंमध्ये होते. 
  • या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे कमी पाण्यात पिकाचे 
  • सिंचन व पाण्यातील खनिजांचे पिकाकडून अतिशय चांगल्या प्रकारे शोषण होते.
  • चुंबकीय पाण्याचे फायदे  

  •  उत्पादनात १० ते ३० टक्के वाढ.
  • शेतमालाची गुणवत्ता सुधारते. फळांचा आकार वाढतो. रंग सुधारतो.
  • बियाणाची उगवण क्षमता वाढते.
  •  पिकाचा काढणी कालावधी कमी होतो.
  • टिकवणक्षमता वाढते.
  •  पिकाची जैविक-अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
  • जमिनीची पाणी शोषून घेण्याची तसेच निचरा करण्याची क्षमता वाढते.
  •  जमिनीचा सामू योग्य होण्यास मदत होते.
  • पाणी वापरात ३० टक्यांपर्यत बचत होते.
  • पाण्यातील क्षारांचे अतिशय सूक्ष्म क्षारांमध्ये रूपांतर होते. त्यामुळे पाईप व नळ्या स्वच्छ राहतात. 
  • ठिबक किंवा  तुषारसंच ब्लॉक होत नाही.
  • पाण्यातील क्षार पाईपला चिकटत नाहीत. ते पाण्याबरोबर पुढे जातात.
  • मॅग्नेटिक सॉफ्टनर  उपकरण खरेदी करताना

  •  बाजारपेठेत या तंत्रज्ञानावर आधारीत उपकरणे उपलब्ध आहेत. मात्र त्यांची उपयुक्तता तपासून मगच खरेदी करावीत. 
  • या प्रणालीला अंदाजे हेक्टरी ३५ ते ८० हजार रुपये खर्च येतो. चुंबकीय उपकरणांना तांत्रिक देखभाल करण्याची फारशी आवश्यकता नसते. त्यांना चालविण्यासाठी विद्युत उर्जेचीही आवश्यकता नसते.
  • उत्तम दर्जाच्या उपकरणाचे आयुष्य किमान २० वर्षे असू शकते. 
  • जिरायती क्षेत्र असणाऱ्या तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांनी गटाद्वारे उपकरण खरेदी केल्यास खर्चात बचत होऊ शकते.
  • -  डॉ. विनायक शिंदे-पाटील, ७०७१७७७७६७ (डॉ. सारिका वांद्रे-शिंदे या दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे कृषि अभियांत्रिकी विभागामध्ये आणि डॉ.विनायक शिंदे-पाटील हे उद्यानविद्या विभागात साहाय्यक प्राध्यापक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com