Agriculture Agricultural News Marathi article regarding management of milch animals. | Agrowon

बदलत्या हवामानानुसार जनावरांचे व्यवस्थापन

डॉ. गोपाल मंजूळक
गुरुवार, 2 एप्रिल 2020

बदलत्या हवामानानुसार जनावरांच्या आहार, गोठा, व्यवस्थापन यामध्ये आवश्यक बदल करावेत. प्रजनन व्यवस्थापनासोबतच गाभण जनावरे व वासरांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करून घ्यावे. चाऱ्याचे नियोजन, गोठ्याचे नियोजन, प्रजनन व्यवस्थापन व वासरांची काळजी घ्यावी. 

बदलत्या हवामानानुसार जनावरांच्या आहार, गोठा, व्यवस्थापन यामध्ये आवश्यक बदल करावेत. प्रजनन व्यवस्थापनासोबतच गाभण जनावरे व वासरांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करून घ्यावे. चाऱ्याचे नियोजन, गोठ्याचे नियोजन, प्रजनन व्यवस्थापन व वासरांची काळजी घ्यावी. 

हिवाळा संपून उन्हाळा सुरू होताना वातावरणात बदल होत असतात. उन्हाळ्यात तापमानात वाढ होते, गरम वारे वाहू लागतात, अशा बदलणाऱ्या काळात जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात जनावरांच्या वजनात चांगली वाढ होते. हा ऋतू प्रजननासाठी अतिशय उत्तम असल्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त जनावरे गाभण असतात. त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. 

गोठा नियोजन  

 • उन्हाळ्यात जास्त तापमानापासून जनावरांचे संरक्षण होण्यासाठी गोठ्यात आवश्यक ते बदल करून घ्यावेत. रात्री व पहाटेच्या वेळेस ज्या वेळेस वातावरण थंड असते, त्या वेळेस जनावरांना खाद्य द्यावे. 
 • जमिनीवर भुसा किंवा गोणपाट पसरून त्यावर नवजात वासरांना ठेवावे, जेणेकरून त्यांचे अति गरम वातावरणापासून संरक्षण होईल. गोठ्यातील जमीन कोरडी व थंड राहील याची काळजी घ्यावी. 
 •  मुक्त संचार गोठ्यात दिवसाच्या वेळेस जनावरांना निवाऱ्याची सोय एका बाजूला करावी. 

प्रतिबंधात्मक उपाय 

 •   तापमानात होणारी वाढ यामुळे जनावरे विविध आजारांना बळी पडू शकतात, त्यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी.
 • उन्हाळ्याच्या सुरुवातीला सहा महिने वयाच्या पुढील गाई, म्हशींना लसीकरण करून घ्यावे. 
 •  लसीकरणापूर्वी सर्व जनावरांना जंतनाशक पाजावे. लसीकरणामुळे जनावरांना पूर्णपणे रोगप्रतिकारक शक्ती मिळू शकेल. 
 • शेळ्या, मेंढ्यांना देवी रोगाविरुद्ध लसीकरण करावे, लसीकरण केल्याच्या नोंदी ठेवाव्यात.  

प्रजनन व्यवस्थापन 

 • म्हशी हिवाळ्यात रेतन होतात. या काळात गाभण असतात. त्यामुळे गाभण काळाकडे विशेष लक्ष द्यावे. पुरेसा आहार द्यावा.
 • काही जनावरे उन्हाळ्याच्या सुरुवातीलासुद्धा रेतन होतात.
 •   माजावर न येणाऱ्या जनावरांची पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी. आवश्यक तो उपचार करून घ्यावा. 
 • क्षार खनिजे व जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा. म्हणजे शरीरातील कमतरता भरून निघेल, जनावर गाभण राहण्यास मदत  होईल. 
 •  माजाची लक्षणे ओळखण्यासाठी जनावरांचे पहाटे व संध्याकाळी निरीक्षण करावे.  

वासरांचे संगोपन  

 • आहार व आरोग्याचे योग्य नियोजन केल्यावरच जनावरांची चांगली पिढी तयार होऊ शकते, म्हणून त्यांची विशेष काळजी घ्यावी. 
 • नवजात वासरांना गरम वाऱ्यापासून संरक्षण करावे. 
 • जन्मलेल्या नवजात वासरांना स्वच्छ करून त्यांच्या नाका-तोंडातील चिकट पदार्थ काढावा. नाळ शरीरापासून दीड ते दोन इंचावर दोऱ्याने बांधून नवीन ब्लेडने कापावी. कापलेली नाळ आयोडिनयुक्त द्रावणात बुडवावी. 
 •  जन्मलेल्या वासरांना वजनाच्या 
 • १० टक्के चीक २४ तासांच्याआत पाजावा. त्यानंतर १० टक्के दूध पाजावे. 
 •  दोन महिन्यांनंतर दूध कमी करून त्याऐवजी मिल्क रिप्लेसर व इतर पूरक खाद्य द्यावे. जन्मल्यावर १५ दिवसांनी पहिला जंताचा डोस द्यावा. त्यानंतर दर तीन महिन्यांनी जंताचे पुढील डोस द्यावेत.  

शेळ्यांचे व्यवस्थापन 
उन्हाळा जास्त असल्यास शेळ्यांना वातावरण थंड असेल अशा वेळी चारावयास सोडावे. उन्हाचा थकवा घालवण्यासाठी पशूतज्ज्ञाच्या सल्याने लिव्हर टॉनिक व जीवनसत्वे द्यावीत. 

आहार नियोजन   

 • गरम वातावरणात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज असते. ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अधिक ऊर्जा असलेला चारा तसेच पशुखाद्य जनावरांना द्यावे. 
 •  पशुखाद्याच्या मात्रेत अर्धा ते एक किलो प्रति जनावर वाढ करूनही ही गरज भागवता येते. 
 •   गव्हाच्या काडावर, सोयाबीन व हरभऱ्याच्या भुश्श्यावर युरिया व गुळाची प्रक्रिया करून निकृष्ट चाऱ्याची सकसता वाढवावी. त्यासाठी १०० किलो चाऱ्यासाठी ३ किलो युरिया, १ किलो गूळ, १ किलो मीठ व २० लिटर पाणी वापरून प्रक्रिया करून २१ दिवस हवाबंद करून नंतर हा चारा वापरावा.  
 • काही ठिकाणी जनावरांच्या आहारात उसाच्या वाढ्याचा चारा म्हणून वापर केला जातो. वाढ्यामध्ये ऑक्झलेट नावाचा घटक मोठ्या प्रमाणावर असतो. हा घटक जनावरांकडून पचवला जात नाही, तसेच शरीरातून बाहेर पडताना कॅल्शिअमबरोबर ‘कॅल्शिअम ऑक्झलेट’ नावाचे संयुग बनवून कॅल्शिअमलाही बाहेर घेऊन जातो. हे टाळण्यासाठी एक किलो कळीचा किंवा दगडी चुना पाण्यात रात्रभर भिजत घालावा. त्यावर तयार होणारी निवळी वाढ्यावर फवारून २४ तासांनी वाढे जनावरांना खाऊ घालावे.  

 - डॉ. गोपाल मंजूळकर, ९८२२२३१९२३ 
(विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, अकोला)


इतर कृषिपूरक
जनावरातील मिथेन वायू उत्सर्जन कमी...जनावरांनी खालेल्या चाऱ्यांवर कोठीपोटात जिवाणू,...
चारा टंचाईच्या काळातील पशुआहार...उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई भासत असते. त्याला...
शेळ्यांसाठी दशरथ घासदशरथ घास या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलक्या ते...
दूध एक ‘पोषक आहार’१ जून हा जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जातो....
कोंबड्यांमध्ये दिसते खनिजांची कमतरताकोंबड्यांच्या आहारातील खनिजे विविध प्रकारची...
जनावरांना द्या पुरेसे खनिज मिश्रणजनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा...
शेळ्यांसाठी पौष्टिक चारा - शेवगा पालाशेळीपालन व्यवसायाचे यश हे मुख्यत्त्वे वापरलेल्या...
उष्णतेच्या लाटेत जनावरे सांभाळाजनावरे सावलीत, थंड ठिकाणी, खेळती हवा असणाऱ्या...
मत्स्यशेतीकरीता शेततळ्याची पूर्वतयारीयेत्या वर्षांत शेततळ्यामध्ये उत्तम मत्स्य उत्पादन...
जनावरांना चावणाऱ्या माशांवर नियंत्रण...लम्पी स्कीन डिसीज या आजाराच्या विषाणूचा प्रसार...
मधमाशांच्या संवर्धनासह व्यावसायिक...मधमाशांद्वारे वनस्पतीमध्ये होणारे परागीभवन व...
पशुपालक,पशुतज्ज्ञांनो आरोग्याची घ्या...जनावरांच्या गोठ्यात काम करणारे नियमित मजूर किंवा...
कासदाहाची लक्षणे ओळखा, उपचार करागाई, म्हशींना कासदाह होऊ नये यासाठी दररोज...
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
सेक्स सॉर्टेड सीमेन : पशुपालनातील नवीन...गाई विताना अधिक प्रमाणात कालवडीचा जन्म व्हावा...
मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धतीभारतामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती ही नवीन...
कलिंगडापासून बनवा जॅम,योगर्टकलिंगडामध्ये जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात...
जनावरांच्या आहारात काटे विरहीत...काटे विरहीत निवडुंगांमध्ये शुष्कपदार्थ, प्रथिने,...
हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे चारा...हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे सात ते दहा दिवसांत...
जनावरांना खुराकासोबत द्या बायपास...जनावरांना चाराटंचाईच्या काळात हवी तेवढी प्रथिने...