Agriculture Agricultural News Marathi article regarding management of sweet orange, lemon crop. | Agrowon

अवकाळी पावसानंतर लिंबूवर्गीय फळबागेचे नियोजन

डॉ. एस. आर. पाटील
गुरुवार, 2 एप्रिल 2020

स ध्या अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. गारपीटग्रस्त बागांमध्ये मृग बहाराच्या इजा झालेल्या फळांची ताबडतोब तोडणी करून घ्यावी.

स ध्या अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. गारपीटग्रस्त बागांमध्ये मृग बहाराच्या इजा झालेल्या फळांची ताबडतोब तोडणी करून घ्यावी. बागेमध्ये कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे फूलगळ व फळगळ होताना दिसत आहे. याकरिता उर्वरित नत्राची अर्धी मात्रा प्रति झाड ७५० ग्रॅम युरियाच्या स्वरूपात द्यावी.

 • झाडाच्या वयोमानानुसार प्रति झाड ४० लिटर पाणी द्यावे.  ठिबक सिंचनाची सुविधा असलेल्या बागांमध्ये आच्छादन म्हणून गवत किंवा भुसा यांचा वापर करावा.
 • उन्हाळ्यात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. बाष्पीभवन कमी करण्यासाठी फळझाडांच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये पाचट, गव्हांडा, वाळलेले गवत, भुसकट किंवा पॉलिथिन शीट यांचे आच्छादन करावे.
 • काही बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ होत आहे. फळे वाटाण्याच्या आकाराची असल्यास, नॅपथॅलीन अॅसिटीक अॅसिड (एन.ए.ए.) १५ मिलिग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. 
 • पाण्याची कमतरता असल्यास आंबे बहराचे नियोजन करू नये. 
 • बऱ्याच मोसंबी बागांमध्ये झाडे पिवळी पडलेली दिसत आहेत. अशा झाडांवरील फळे ताबडतोब काढून टाकावीत. झाडांना मेटॅलॅक्झील अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी  करावी.
 • एका बहाराची फळे झाडावर असताना दुसऱ्या बहरासाठी झाडे ताणावर सोडू नयेत. झाडांना एकाच बहाराची सवय लावावी. हे बागेच्या आयुर्मानाच्या दृष्टीने  फायदेशीर ठरते.
 • मृग बहाराच्या गळालेल्या फळांची योग्य विल्हेवाट लावावी व बागेची स्वच्छता करावी. 
 • ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता वाढून लिंबूवर्गीय झाडांवर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
 • खोडावर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास खोडाला इजा न करता, डिंक्‍या असलेला चिकट भाग पटाशीने खरवडून त्यावर बोर्डो पेस्ट लावावी.
 • वादळी पावसामध्ये मोडलेल्या फांद्या सिकेटरच्या साह्याने कापून घ्याव्यात. कापलेल्या भागांवर बोर्डो पेस्ट लावावी किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी. तसेच उर्वरित फांद्यांना बांबूचा आधार द्यावा. 

कीड,रोग नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)
सिट्रस सायला 

 • किडीची पिल्ले पानातून रस शोषण करतात. याचा फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो.
 • या किडीमुळे मोसंबी फळांमध्ये ग्रीनिंग या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.
 • इमिडाक्लोप्रिड ०.५ मिलि किंवा
 • अॅबामेक्टीन ०.४२ मिलि किंवा
 • नोव्हॅल्यूरॉन ०.५५ मिलि

फूलकिडे 

 • बागेत एकरी ४ ते ५ पिवळे चिकट सापळे लावावेत.
 • स्पिनोसॅड ०.२५ मिलि 

मावा,  काळी माशी 

 • इमिडाक्लोप्रिड ०.५ मिलि (कीटकनाशक) अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा
 • मॅन्कोझेब २.५ ग्रॅम
 • पाने पोखरणारी अळी 
 • अॅबामेक्टीन ०.३२ मिलि किंवा
 • स्पिनोसॅड ०.३४ मिलि

डिंक्या रोग

 • मेटॅलॅक्झील अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम

कोळी 

 • डायकोफॉल २ मिलि

खैऱ्या 

 • रोगग्रस्त फांद्या व पानांची छाटणी करावी. या फांद्या जाळून नष्ट कराव्यात.
 • कॉपर ऑक्सिक्लोराईड ३३.३ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* १ ग्रॅम

 - डॉ. एस. आर. पाटील, ९८८१७३५३५३
(डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, 
अकोला)


इतर फळबाग
उन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
नियोजन संत्रा बाग लागवडीचे..हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या...
असे करा द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशिअम...खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व,...
दर्जेदार पेरू, सीताफळाच्या उत्पादनावर भरमाझ्याकडे पेरू आणि सीताफळाची लागवड आहे. पेरूच्या...
गावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष कोरोनामुळे बाजार समित्या बंद झाल्या, व्यापारीही...
जास्तीच्या ओलाव्यामुळे येणाऱ्या ...गेल्या आठवड्यात बऱ्याच भागात पाऊस झाला व काही...
केळी पीलबागेचे व्यवस्थापन, खर्च कमी... माझी काळी कसदार दहा एकर शेती आहे. दोन...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
थेट ग्राहकांना विकली २० टन द्राक्ष   बागेत द्राक्ष घड काढणीला आले आणि कोरोनाचे...
‘हापूस'च्या नऊ हजार पेट्यांची ...हंगाम तोंडावर आला असतानाच कोरोनाने देशभरात पाय...
सीताफळातून लाभले आर्थिक स्थैर्यपांगारे (ता.पुरंदर,जि.पुणे) येथील प्रयोगशील...
लिंबूवर्गीय फळपीक सल्लाशेतीमध्ये काम करण्याची परवानगी असली तरी ते काम...
डाळिंब सल्लामृग बहार / अर्ली मृग बहार (जून - जुलै...
फळझाडांचे आच्छादन, ठिंबक सिंचन महत्वाचेउन्हाळ्यात फळबागांना पाण्याची टंचाई जाणवते. अशा...
संत्रा पिकाची पाने पिवळी पडण्याची कारणे...संत्रा बागेत पाने पिवळी पडण्याची समस्या अनेक...
द्राक्षबागेतील अवस्थांनुसार व्यवस्थापनसध्याच्या काळात बागेतील घडांच्या स्थितीनुसार...
असे करा दर्जेदार चिकू उत्पादनाचे नियोजनचिकू फळांना योग्य दर मिळण्यासाठी योग्य आकार व...
द्राक्षबागेतील वेगवेगळ्या अवस्थांनुसार...सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेत वेगवेगळ्या...
अवकाळी पावसानंतर लिंबूवर्गीय फळबागेचे...स ध्या अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...