आंब्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ

mango processing
mango processing

आंबा फळावर आधारित प्रक्रिया लघुउद्योग निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. आंब्यापासून गर, स्क्वॅश, सिरप, जॅम, फोडी, पोळी, लोणचे, पन्हे, आमचूर असे अनेक टिकाऊ पदार्थ तयार करून स्थानिक बाजारात पाठवून चांगला रोजगार मिळवता येतो.

क च्ची कैरी चवीला आंबट असते. आंबट नसलेल्या कैरीला खोबरी कैरी असे म्हणतात. आंब्याची पाने औषधी गुणधर्माची असून पानांमध्ये ॲंटीऑक्सिडेंट आणि ॲँटीमायक्रोबियल गुणांसह जीवनसत्त्व अ, ब आणि क असते.  कैरीचे पन्हे  पूर्ण वाढ झालेली कच्ची कैरी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. कैरी पाण्यामध्ये शिजवून घ्यावी. त्यानंतर थंड झाल्यावर त्याचा गर काढून घ्यावा. कैरीचा २०० ग्रॅम गर घेतल्यास त्यात १५० ग्रॅम साखर, १५० ग्रॅम तेल व ७०० मिलि पाणी घालावे. हे मिश्रण चाळणीने गाळून घ्यावे. त्यात १ ग्रॅम खाण्याचा सोडा मिसळावा. तयार पन्हे निर्जंतुक बाटलीत भरावे. बाटल्या हवाबंद करून गरम पाण्यात (८५ ते १०० अंश सेल्सिअस तापमानाला) ठेवून नंतर थंड करून घ्याव्यात.

स्क्वॅश  एक लिटर गाळून घेतलेल्या आंब्याच्या रसामध्ये १ लिटर पाणी, १.८ किलो साखर, ०.६ ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फेट आणि ५ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावे. मिश्रण विरघळून घ्यावे. तयार स्क्वॅश निर्जंतुक बाटल्या मध्ये सीलबंद करावा. स्क्वॅशमध्ये २५ टक्के रस, ४० टक्के टी.एस.एस. आणि आम्लतेचे प्रमाण १.५ टक्के असते.  लोणचे  कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्यात. कैरीच्या फोडी करून कोई काढून टाकाव्यात. अर्धा लिटर गरम तेलामध्ये १ किलो कैरीच्या फोडी, २ ग्रॅम बारीक तुकडे केलेले लसूण मिसळावेत. त्यामध्ये २५ ग्रॅम मोहरी, ५ ग्रॅम हिंग, ५ ग्रॅम जिरे या सगळ्यांची पावडर करून मिसळावी. तसेच ८० ग्रॅम मिरची पावडर, १० ग्रॅम धने पावडर, २०० ग्रॅम मीठ, ५ ग्रॅम हळद याचे मिश्रण एकत्र करावे. तयार लोणचे निर्जंतुक बाटलीत साठवून ठेवावे.  रस  आंबे धुवून घ्यावेत. १ किलो गरामध्ये ७५० मिलि पाणी मिसळावे. आंब्याचे तुकडे स्क्रू टाइप एक्सट्रुडर यंत्रामध्ये टाकून रस काढावा. रस ७० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानाला गरम करावा. नंतर रस थंड करून २४ तास स्थिर ठेवून गाळणीने गाळून घ्यावा.

  - मनीषा गायकवाड, ७०२८९७४११७  (शिवरामजी पवार अन्नतंत्र महाविद्यालय, कंधार, जि. नांदेड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com