Agriculture Agricultural News Marathi article regarding Mango processing. | Page 2 ||| Agrowon

आंब्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ

मनीषा गायकवाड
मंगळवार, 24 मार्च 2020

आंबा फळावर आधारित प्रक्रिया लघुउद्योग निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. आंब्यापासून गर, स्क्वॅश, सिरप, जॅम, फोडी, पोळी, लोणचे, पन्हे, आमचूर असे अनेक टिकाऊ पदार्थ तयार करून स्थानिक बाजारात पाठवून चांगला रोजगार मिळवता येतो.

क च्ची कैरी चवीला आंबट असते. आंबट नसलेल्या कैरीला खोबरी कैरी असे म्हणतात. आंब्याची पाने औषधी गुणधर्माची असून पानांमध्ये ॲंटीऑक्सिडेंट आणि ॲँटीमायक्रोबियल गुणांसह जीवनसत्त्व अ, ब आणि क असते. 

आंबा फळावर आधारित प्रक्रिया लघुउद्योग निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. आंब्यापासून गर, स्क्वॅश, सिरप, जॅम, फोडी, पोळी, लोणचे, पन्हे, आमचूर असे अनेक टिकाऊ पदार्थ तयार करून स्थानिक बाजारात पाठवून चांगला रोजगार मिळवता येतो.

क च्ची कैरी चवीला आंबट असते. आंबट नसलेल्या कैरीला खोबरी कैरी असे म्हणतात. आंब्याची पाने औषधी गुणधर्माची असून पानांमध्ये ॲंटीऑक्सिडेंट आणि ॲँटीमायक्रोबियल गुणांसह जीवनसत्त्व अ, ब आणि क असते. 

कैरीचे पन्हे 
पूर्ण वाढ झालेली कच्ची कैरी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. कैरी पाण्यामध्ये शिजवून घ्यावी. त्यानंतर थंड झाल्यावर त्याचा गर काढून घ्यावा. कैरीचा २०० ग्रॅम गर घेतल्यास त्यात १५० ग्रॅम साखर, १५० ग्रॅम तेल व ७०० मिलि पाणी घालावे. हे मिश्रण चाळणीने गाळून घ्यावे. त्यात १ ग्रॅम खाण्याचा सोडा मिसळावा. तयार पन्हे निर्जंतुक बाटलीत भरावे. बाटल्या हवाबंद करून गरम पाण्यात (८५ ते १०० अंश सेल्सिअस तापमानाला) ठेवून नंतर थंड करून घ्याव्यात.

स्क्वॅश 
एक लिटर गाळून घेतलेल्या आंब्याच्या रसामध्ये १ लिटर पाणी, १.८ किलो साखर, ०.६ ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फेट आणि ५ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावे. मिश्रण विरघळून घ्यावे. तयार स्क्वॅश निर्जंतुक बाटल्या मध्ये सीलबंद करावा. स्क्वॅशमध्ये २५ टक्के रस, ४० टक्के टी.एस.एस. आणि आम्लतेचे प्रमाण १.५ टक्के असते. 

लोणचे 
कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्यात. कैरीच्या फोडी करून कोई काढून टाकाव्यात. अर्धा लिटर गरम तेलामध्ये १ किलो कैरीच्या फोडी, २ ग्रॅम बारीक तुकडे केलेले लसूण मिसळावेत. त्यामध्ये २५ ग्रॅम मोहरी, ५ ग्रॅम हिंग, ५ ग्रॅम जिरे या सगळ्यांची पावडर करून मिसळावी. तसेच ८० ग्रॅम मिरची पावडर, १० ग्रॅम धने पावडर, २०० ग्रॅम मीठ, ५ ग्रॅम हळद याचे मिश्रण एकत्र करावे. तयार लोणचे निर्जंतुक बाटलीत साठवून ठेवावे. 

रस 
आंबे धुवून घ्यावेत. १ किलो गरामध्ये ७५० मिलि पाणी मिसळावे. आंब्याचे तुकडे स्क्रू टाइप एक्सट्रुडर यंत्रामध्ये टाकून रस काढावा. रस ७० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानाला गरम करावा. नंतर रस थंड करून २४ तास स्थिर ठेवून गाळणीने गाळून घ्यावा.

 - मनीषा गायकवाड, ७०२८९७४११७ 
(शिवरामजी पवार अन्नतंत्र महाविद्यालय, कंधार, जि. नांदेड)


इतर कृषी प्रक्रिया
भाजीपाला, फळे प्रक्रियेसाठी अत्याधुनिक...भाजीपाला व फळे प्रक्रिया हा महत्त्वाचा विषय आहे....
वाढवा प्रतिकार क्षमतासध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे....
अननसापासून जॅम, स्क्वॅश, मुरंब्बाअननसाच्या गरामधे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात...
मोसंबी, आवळा वाढवितात रोग प्रतिकारशक्ती सध्याच्या काळात योग्य व समतोल पौष्टिक आहार...
संरक्षक पदार्थांचा प्रमाणबद्ध वापर...संरक्षक पदार्थ म्हणजे असे घटक जे पदार्थामध्ये...
आंब्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थआंबा फळावर आधारित प्रक्रिया लघुउद्योग निश्चितपणे...
फळे व पालेभाज्यांचे प्रीकूलिंग, पॅकिंग...फळे व भाज्या नाशवंत असल्यामुळे वेळीच त्यांची...
काढणीपश्चात टिकवण क्षमतेवर परिणाम...भाजीपाला पिकांमध्ये अधिक काळ साठविण्यावर अनेक...
पदार्थाच्या मूल्यवर्धनासाठी गुलकंदाचा...गुलाब हे फूल म्हणून प्रसिद्ध आहेच त्याच बरोबरीने...
साठवणीतील धान्यावरील प्राथमिक किडीजगभरामध्ये किडीमुळे अन्नधान्याचे प्रति वर्ष...
वाढवा मटकीची पौष्टिकतामटकीचे बियाणे क्षारांमध्ये (मीठ)भिजवल्याने...
शेंगदाण्यापासून विविध पदार्थांची...पौष्टिक गुणधर्मामुळे शेंगदाण्यापासून बनविलेल्या...
औषधी कवठाचे प्रक्रियायुक्त पदार्थकवठ हे फळ मधुर व आम्लरसाचे असते. दररोज कवठाच्या...
केक विक्रीतून मिळतील रोजगाराच्या संधीबेकरी पदार्थांत केक या पदार्थाला अनन्यसाधारण...
कसावापासून स्नॅक्‍सनिर्मितीअन्न सुरक्षेच्या दृष्टीने कसावा महत्त्वाचे पीक...
सोयापदार्थांची निर्मिती फायदेशीरसोयाबीनवर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करता...
ताडगूळ निर्मिती प्रक्रियाताड, माड, पाम आणि खजुरीच्या झाडांपासून मिळणारा...
जास्त प्रमाणात पदार्थ सुकविण्यासाठी...टनेल टाइप सोलर ड्रायरमध्ये गरम हवेचा वापर करून...
अशी ओळखा अन्नातील भेसळ..अन्नपदार्थातील भेसळीची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप...
फळबाग अन् प्रक्रिया उद्योगांवर भरजर्मनीमधील शेतकरी नियोजनबद्ध पद्धतीने दूध, मांस,...