Agriculture Agricultural News Marathi article regarding market trandes in pomegranate. | Agrowon

डाळिंबासाठी पायाभूत सुविधांच्या विस्ताराची गरज

विजयकुमार चोले, नितीन फुगे
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

येत्या काळात डाळिंब फळांच्या बरोबरीने रस, पावडर, विविध पेये, अनारदाणा निर्मितीसाठी डाळिंबाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर  प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना रिटेल विक्रीतून चांगला नफा मिळू शकतो.

येत्या काळात डाळिंब फळांच्या बरोबरीने रस, पावडर, विविध पेये, अनारदाणा निर्मितीसाठी डाळिंबाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर  प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना रिटेल विक्रीतून चांगला नफा मिळू शकतो.
 

राज्याच्या कोरडवाहू भागामध्ये डाळिंब पीक चांगल्या प्रकारे रुजले.या पिकाने या भागातील शेती तसेच अर्थकारणाला चांगली गती दिली. राज्यात गणेश, मृदुला, आरक्ता,  फुले भगवा आणि  फुले भगवा सुपर या जातींची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. आपल्या डाळिंबामध्ये कमी आम्लता आणि बिया मऊ आहेत.  खाद्य गुणवत्ता आणि आकर्षकतेमध्ये  महाराष्ट्रातील डाळिंब स्पेन आणि इराण मधील डाळिंबाच्या वरचढ आहेत. 
महाराष्ट्राच्या बरोबरीने कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये डाळिंबाची लागवड वाढली आहे. राज्याचा विचार करता सोलापूर, नाशिक, सांगली, नगर, पुणे आणि सातारा  जिल्ह्यात डाळिंब लागवडीचे मोठे क्षेत्र आहे. या जिल्ह्यातील काही गावे डाळिंब लागवड तसेच गुणवत्तेसाठी राष्ट्रीय बाजारपेठेत प्रसिद्ध आहेत. या जिल्ह्यांनी देशातील एकूण लागवड क्षेत्राच्या सुमारे ७१.२१ टक्के एवढे क्षेत्र व्यापले आहे.
    विक्री व्यवस्थेची स्थिती 
बाजारपेठेतील दरांची अद्ययावत माहिती डाळिंब बागायतदाराकडे आहे. परंतु  साठवणुकीच्या पुरेशा सुविधांअभावी दराचा लाभ उठवता येत नाही.जागतिक स्तरावर डाळिंबाला वाढती मागणी आहे. २०१८ मध्ये डाळिंबाची जागतिक उलाढाल ८.२ अब्ज डॉलर्स इतकी होती, ती येत्या काही वर्षांत २३.१४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. फळांच्या बरोबरीने रस, पावडर, विविध पेये, अनारदाणा निर्मितीसाठी डाळिंबाची मागणी १४  टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. डाळिंबाच्या प्रक्रियायुक्त पदार्थांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. 

युरोप आणि मध्यपूर्वेतील देश हे भारताचे प्रमुख निर्यात क्षेत्र आहे. देशांतर्गत बाजारपेठ तसेच निर्यातीसाठी डाळिंबाची मागणी वाढत असल्याने, लागवड आणि उत्पादनातही २०  ते २५  टक्के वाढ  होण्याचा अंदाज आहे. विशेषतः भगवा जातीला चांगली मागणी आहे. युरोप, मध्यपूर्वेतील देश आणि आशियाई देशांतील बाजारपेठांमध्ये डाळिंबाला चांगली मागणी आहे. निर्यातक्षम गुणवत्तेच्या जोरावर अमेरिकेतील बाजारपेठेतही मोठी संधी आहे.

   आधुनिक सुविधा आवश्‍यक 
डाळिंब उत्पादक क्षेत्रामध्ये पुरेशा पायाभूत सुविधा नसल्याने शेतकरी स्थानिक तसेच परराज्यातील बाजारपेठेत फळे पाठवितात. दर्जेदार फळे निर्यातीसाठी जातात. ठिकठिकाणी फळ प्रतवारी आणि पॅकिंगच्या पुरेशा सुविधा मिळाल्यास  देशांतर्गत बाजारपेठेत चांगले दर मिळू शकतात.डाळिंबाच्या ‘रेडी टू इट' प्रक्रियायुक्त पदार्थांना चांगली मागणी आहे. स्थानिक पातळीवर प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना रिटेल विक्रीतून चांगला दर मिळू शकतो. 

    उत्पादक कंपनीची आवश्यकता 
 डाळिंब पिकासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या  माध्यमातून  सुनियोजित प्रयत्न होऊ शकतात. यामुळे चांगला दर मिळेल. डाळिंबाला स्पर्धात्मक दर मिळण्यासाठी उत्पादक समूहाने एकत्र येऊन विपणन व्यवस्था उभारण्याची गरज आहे. या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाच्या  दर्जेदार डाळिंब मागणीची पूर्तता होईल.  
     संशोधन, विकास 
 महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये डाळिंब पिकाबाबत सखोल संशोधन होत आहे.  महात्मा फुले कृषी विद्यापीठाने निवड पद्धतीने भगवा सुपर ही जात प्रसारित केली. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये देखील कीड, रोग व्यवस्थापनाबाबत चांगले संशोधन झालेले आहे. रसायन  अवशेषमुक्त डाळिंब उत्पादनासाठी याचा फायदा होत आहे. महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक प्रयोगशील आणि अभ्यासू आहे. उपक्रमशील शेतकऱ्यांनी स्वतःच व्यवस्थापन करून गुणवत्तापूर्ण डाळिंब निर्यात सुरू केली आहे. 

आव्हाने आणि संधी

  • महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थानमधील डाळिंब लागवडीखालील क्षेत्र सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासमोर येत्या काळात निश्चितपणे आव्हान उभे राहणार आहे.
  • गुजरात, राजस्थानच्या तुलनेत महाराष्ट्रातील डाळिंब फळामधील एकूण विद्राव्य घटकांचे (टी.एस. एस.) प्रमाण अधिक आहे. आपल्या राज्यात डाळिंबातील  मर आणि तेलकट डाग रोगाची मोठी समस्या आहे.   
  • येत्या काळात डाळिंब मूल्यवर्धनावर अधिक भर देऊन प्रक्रियेच्या पायाभूत सुविधा उपलब्धकरून दिल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो.

- विजयकुमार चोले, ९४२०४९६२६०,

(उपाध्यक्ष, सातारा मेगा फूड पार्क) 

 

 


इतर कृषी प्रक्रिया
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...
हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...
दुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....
सुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...
टोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...
उद्योजकतेतून ग्रामीण विकासाकडे...ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी...
टोमॅटो निर्यात, प्रक्रिया उद्योगात संधीयेत्या काळात टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी...
पनीर निर्मितीसह वाढवा टिकवणक्षमतापनीर हा भारतीय उपखंडामध्ये आहारामध्ये मोठ्या...
आल्यापासून कॅण्डी, लोणचे, मुरांबाअनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जातो...
डाळिंबापासून जॅम, जेली, स्क्वॅश ​डाळिंबापासून इतर फळाप्रमाणेच उत्तम प्रकारचे सिरप...
कृषी व्यवसायात भरपूर संधी, गरज योग्य...कृषी क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. कृषी...
पेरूपासून बनवा लोणचे, चीज, जेलीपेरूमधील जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती...
चिंच प्रक्रियेतून उद्योगाच्या संधीचिंचेच्या आंबट-मधुर व आम्लकारक चवीमुळे याचा वापर...
डाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...
केळीमधील सूत्रकृमीचे नियंत्रणकेळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त...
आरोग्यदायी तुतीची फळेतामिळनाडू राज्यातील रेशीम संशोधन व जर्मप्लाझम...
ग्लूटेनमुक्त आहार फायदेशीरग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
डाळिंबासाठी पायाभूत सुविधांच्या...येत्या काळात डाळिंब फळांच्या बरोबरीने रस, पावडर,...