लंम्पी स्कीन डिसीज आजाराचे नियंत्रण

लंम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. हा विषाणू शेळ्या मेंढ्यांमध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूंशी साधर्म्य असणारा असून सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात.
lumpi skin disease in animal
lumpi skin disease in animal

लंम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. हा विषाणू शेळ्या मेंढ्यांमध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूंशी साधर्म्य असणारा असून सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दुग्धोत्पादनक्षमता घटते. प्रजननक्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. सुरुवातीस २-३ दिवस जनावरास बारीक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेंन्द्रियाच्या भागात येतात. बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरे लंगडतात. न्यूमोनिया व श्वसनसंस्थेची लक्षणे आढळतात. डोळ्यांमधील व्रणामुळे जनावरांची दृष्टी बाधित होऊ शकते. अशक्तपणामुळे जनावरांना या आजारातून बरे होण्यास बराच कालावधी लागतो.  आजारी जनावरे दोन ते तीन आठवड्यामध्ये बरे होतात. परंतू काही वेळा दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण पुढील काही आठवड्यासाठी कमी होऊ शकते.                                उपचार 

  • हा आजार विषाणूजन्य असल्याने यावर खात्रीशीर उपचार होऊ शकत नाही. परंतु विषाणूजन्य आजाराची बाधा झालेल्या जनावरास प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर जिवाणूजन्य आजाराची बाधा होण्याची दाट शक्यता असल्याने प्रतिजैविके देणे आवश्यक आहे. 
  • ताप कमी करणारी औषधे, प्रतिकारशक्तिवर्धक जीवनसत्त्व अ व ई, तसेच त्वचेवरील व्रणांसाठी मलमाचा वापर करावा. वेदनाशामक व अँटि-हिस्टॅमिनिक औषधांचा पशूतज्ज्ञांच्या सल्याने वापर करावा. 
  • जनावरास मऊ, हिरवा चारा व मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. तोंडातील व्रणास २ टक्के पोटॅशिअम परमॅग्नेट द्रावणाने धुऊन तोंडात बोरोग्लीसरीन लावावे. लिव्हर टॉनिकच्या वापराने जनावरे लवकर बरे होण्यास मदत होते. 
  • बाधित अथवा संशयित जनावरांचा उपचार करताना किंवा रोग नमुने गोळा करताना पीपीई किटचा वापर करावा. हात धुऊन घ्यावेत. तपासणीनंतर सर्व साहित्य निर्जंतुक करावे.
  • सद्य स्थितीत या रोगावर लस नाही. लिंबाच्या पाल्याचे धुपट करावे, जेणे करून गोठ्यामध्ये डास आदी कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही.आजाराचा प्रसार किटकांपासून  होत असल्याने आपल्या गोठ्यातील किटकांचे नियंत्रण करावे. जनावरांचा गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवावा लागेल. गोठ्याशेजारी पाणी, शेण,मूत्र जमा होऊन चिखल होणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यातील कीटकांच्या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात ४० मिली करंज तेल, ४० मिलि निम तेल आणि१० ग्रॅम साबण चांगला मिसळून घ्यावा. हे द्रावण दिवसातून दोन ते तीन वेळा गोठ्यामध्ये फवारावे. 
  •   - देवानंद  राऊत,७०२०५३२८२०                                                                                     (कृषि विज्ञान केंद्र , सांगवी(रेल्वे)  ता. दारव्हा जि. यवतमाळ)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com