Agriculture Agricultural News Marathi article regarding milch animal management. | Agrowon

लंम्पी स्कीन डिसीज आजाराचे नियंत्रण

देवानंद राऊत
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

लंम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. हा विषाणू शेळ्या मेंढ्यांमध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूंशी साधर्म्य असणारा असून सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात.

लंम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. हा विषाणू शेळ्या मेंढ्यांमध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूंशी साधर्म्य असणारा असून सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात.

हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दुग्धोत्पादनक्षमता घटते. प्रजननक्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. सुरुवातीस २-३ दिवस जनावरास बारीक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेंन्द्रियाच्या भागात येतात. बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरे लंगडतात. न्यूमोनिया व श्वसनसंस्थेची लक्षणे आढळतात. डोळ्यांमधील व्रणामुळे जनावरांची दृष्टी बाधित होऊ शकते. अशक्तपणामुळे जनावरांना या आजारातून बरे होण्यास बराच कालावधी लागतो.  आजारी जनावरे दोन ते तीन आठवड्यामध्ये बरे होतात. परंतू काही वेळा दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण पुढील काही आठवड्यासाठी कमी होऊ शकते.
                              
उपचार 

  • हा आजार विषाणूजन्य असल्याने यावर खात्रीशीर उपचार होऊ शकत नाही. परंतु विषाणूजन्य आजाराची बाधा झालेल्या जनावरास प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर जिवाणूजन्य आजाराची बाधा होण्याची दाट शक्यता असल्याने प्रतिजैविके देणे आवश्यक आहे. 
  • ताप कमी करणारी औषधे, प्रतिकारशक्तिवर्धक जीवनसत्त्व अ व ई, तसेच त्वचेवरील व्रणांसाठी मलमाचा वापर करावा. वेदनाशामक व अँटि-हिस्टॅमिनिक औषधांचा पशूतज्ज्ञांच्या सल्याने वापर करावा. 
  • जनावरास मऊ, हिरवा चारा व मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. तोंडातील व्रणास २ टक्के पोटॅशिअम परमॅग्नेट द्रावणाने धुऊन तोंडात बोरोग्लीसरीन लावावे. लिव्हर टॉनिकच्या वापराने जनावरे लवकर बरे होण्यास मदत होते. 
  • बाधित अथवा संशयित जनावरांचा उपचार करताना किंवा रोग नमुने गोळा करताना पीपीई किटचा वापर करावा. हात धुऊन घ्यावेत. तपासणीनंतर सर्व साहित्य निर्जंतुक करावे.
  • सद्य स्थितीत या रोगावर लस नाही. लिंबाच्या पाल्याचे धुपट करावे, जेणे करून गोठ्यामध्ये डास आदी कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही.आजाराचा प्रसार किटकांपासून  होत असल्याने आपल्या गोठ्यातील किटकांचे नियंत्रण करावे. जनावरांचा गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवावा लागेल. गोठ्याशेजारी पाणी, शेण,मूत्र जमा होऊन चिखल होणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यातील कीटकांच्या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात ४० मिली करंज तेल, ४० मिलि निम तेल आणि१० ग्रॅम साबण चांगला मिसळून घ्यावा. हे द्रावण दिवसातून दोन ते तीन वेळा गोठ्यामध्ये फवारावे. 

 - देवानंद  राऊत,७०२०५३२८२०                                                                                    
(कृषि विज्ञान केंद्र , सांगवी(रेल्वे)
 ता. दारव्हा जि. यवतमाळ)


इतर कृषिपूरक
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
व्यवस्थापन म्हशींच्या माजाचेदुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी म्हशीने दर १३...
सुधारीत पद्धतीने लाव्ही पक्षीपालनजपानी लाव्ही पक्षांची खाद्याची गरज फार कमी असते....
जनावरांची रक्त तपासणी महत्त्वाची...आजार करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक...
गोठ्यातील माश्यांचे एकात्मिक व्यवस्थापनगोठ्यात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय...
जनावरांतील परोपजिवींचे नियंत्रण...सध्याच्या काळातील परोपजिवींच्या प्रादुर्भावामुळे...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनपावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढते आणि अशा...
दुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शिअम...जनावरांच्या खाद्यामध्ये विकसित होणारी बुरशी तसेच...
प्रसुती दरम्यान जनावरांची काळजीगाभण जनावरांना शेवटचे तीन आठवडे रानात तसेच डोंगर...
गाई, म्हशीमधील प्रजनन व्यवस्थापनकालवडी साधारण १२ ते १८ महिने आणि वगारी २४ ते ३६...
स्वीकारा फक्त दुग्धसमृद्धी रेतमात्राभरपूर उत्पादक पिढी देणाऱ्या रेतमात्रेचा वापर...
मजुरांशिवाय कुटुंब झाले दुग्धव्यवसायात...पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यालगत शहरीकरण वाढले...
बाजारपेठेत वाढतेय ‘चीज'ला मागणीआपल्या देशामध्ये प्रामुख्याने प्रक्रियायुक्त चीज...
लंम्पी स्कीन डिसीज आजाराचे नियंत्रणलंम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गाई, बैल,...
दुग्धोत्पादनासाठी प्रजननाची पंचसूत्रीदुग्धोत्पादन हे गाई,म्हशींच्या प्रजननावर अवलंबून...
अन्न सुरक्षेेचा प्रश्न ऐरणीवर...अंतर्गत संघर्ष, हिंसा या मानवी कारणांसोबतच विविध...
जनावरांतील धर्नुवाताची लक्षणे अन्...जनावरांच्या शरीरावरील जखमांतून धर्नुवात आजाराचे...
परसबागेमध्ये वनराजा कोंबडीपालनमुक्तपद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि, बंदिस्त...
शेळ्या- मेंढ्यांमधील आंत्रविषारमोठ्या शेळ्या-मेंढ्या तीव्रतेनुसार काही...
शेततळ्यातील मत्स्यपालन झाले उत्पन्नाचे...करडा (जि. वाशीम) येथील कृषी विज्ञान केंद्राने...