Agriculture Agricultural News Marathi article regarding milch animal management. | Agrowon

भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्त

डॉ. सुधीर राजूरकर
मंगळवार, 19 जानेवारी 2021

जनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे, पोटाची हालचाल मंदावणे, रवंथ न करणे ही भूक मंदावण्याची लक्षणे आहेत. या आजारावर सुंठ, जिरे, ओवा, चित्रक, पिंपळी या वनस्पतींचा वापर महत्त्वाचा ठरतो.

जनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे, पोटाची हालचाल मंदावणे, रवंथ न करणे ही भूक मंदावण्याची लक्षणे आहेत. या आजारावर सुंठ, जिरे, ओवा, चित्रक, पिंपळी या वनस्पतींचा वापर महत्त्वाचा ठरतो.

अपचन, पोट गच्च होणे, पोटदुखी यांसारखे पोटाचे आजार जनावरांमध्ये बऱ्याच वेळा आढळतात. जनावरांच्या खाद्यातील बदल, संगोपनातील चुका, गोठ्यातील अस्वच्छता, संक्रमक आजार अशा विविध कारणांमुळे पोटाचे आजार होतात. या आजारांमध्ये जनावर खाद्य खात नाही. सुरुवातीस अगदी किरकोळ वाटणारा हा आजार वेळीच उपचार न केल्यास त्रासदायक ठरतो. कारण अशा आजारांमध्ये सर्वांत आधी परिणाम होतो तो जनावरांच्या खाद्य खाण्याच्या इच्छेवर. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतो, जनावर रोड होते आणि पर्यायाने त्यापासून मिळणारे उत्पादन कमी अथवा बंद होते.

लक्षणे ः जनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे, पोटाची हालचाल मंदावणे, रवंथ न करणे.
उपचारासाठी वनस्पती 

 • भूक मंदावणे या आजारावर उपचार करताना आपल्या माहितीच्या व आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वनस्पतींचा वापर करता येतो. उदाहरणार्थ सुंठ, जिरे, ओवा, काळे मीठ, चित्रक, पिंपळी. 

आले, सुंठ 

 •  अन्नपचन होण्यासाठी पोटात अन्नावर विविध अभिक्रिया होतात.
 • अन्न खाल्ल्यानंतर तोंडात दाताद्वारे ते बारीक होते. सोबतच त्यात लाळ मिसळली जाते. याच प्रमाणे अन्न पोटात गेल्यानंतर त्यामध्ये शरीरात तयार होणारे विविध पाचक रस मिसळले जातात.
 •  आले ही वनस्पती अन्नपचनास मदत करणारी आहे. अन्नाच्या पचनाच्या प्रक्रियेमध्ये पोटामध्ये पाचक रस तयार होणे अत्यंत महत्त्वाचे असते. या पाचक रसांची कमतरता किंवा असे पाचक रस तयार न झाल्यास अन्नपचन नीट होऊ शकत नाही. या पाचक रसांची निर्मिती करण्याचे काम सुंठीमुळे होते. 

 जिरे 

 •  अन्नपचनाच्या प्रक्रियेत विविध पाचक रसांची निर्मिती होण्यासाठी जिरे या वनस्पतीचा अत्यंत चांगला उपयोग होतो. 
 •  पोटाची हालचाल नियमित होणे हे पचनासाठी अत्यंत आवश्यक असते. ही हालचाल कमी झाल्यास पोट गच्च होते. जनावरास पातळ संडास होते, म्हणजेच अपचन होते. 
 •   अपचनाच्या दोन्ही प्रकारांत भूक कमी होते. यसाठी जिरे उपयुक्त आहे.

ओवा 

 •  ओवा आणि जिरे यांच्या वापरामुळे पोटाची व आतड्यांची मंदावलेली हालचाल वाढते. नियमित होते. यामुळे अन्नाचे पचन होऊन पोटाचे आजार कमी होतात.  

पिंपळी

 •  पोटाची हालचाल नियमित करणे, अन्नपचनास मदत करणे, तसेच या दरम्यान तयार होणरा गॅस याची मात्रा नियमित करण्यासाठी पिंपळी या वनस्पतीचा उपयोग होतो.
 • पोटाच्या आजारात या वनस्पतीचा उपयोग अत्यंत चांगला होतो. 
 • पिंपळी या वनस्पतीचे मूळ औषधीमध्ये वापरतात. 

काळे मीठ 

 • काळे मीठ ही वनस्पती नाही. परंतु पोटाच्या आजारात अत्यंत उपयुक्त असलेले हे औषध आयुर्वेदात सांगितले आहे.
 • काळे मीठ वापरानंतर पोटात जमा झालेली हवा म्हणजेच गॅस कमी होतो. 
 • पोटात हवा जमा झाली तर अपचन होऊन जनावर खाद्य खात नाही. अशावेळी अत्यंत खात्रीचा उपाय म्हणजेच काळे मीठ.

टीप ः या लेखात दिलेल्या सर्व वनस्पती एकत्र करून वापरल्यास याचा चांगला उपयोग होतो. परंतु काही कारणास्तव काही वनस्पती जर आपल्याला मिळाल्या नाहीत, तर ज्या वनस्पती उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा. या लेखात सांगितलेली प्रत्येक वनस्पती एकटी वापरली तरीदेखील ती 
उपयुक्त ठरते.

- डॉ. सुधीर राजूरकर,  ९४२२१७५७९३
(प्राध्यापक, पशू औषधी व विषयशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)


इतर औषधी वनस्पती
औषधी वनस्पतींनी वाढवा प्रतिकारशक्तीभारत हा औषधी आणि सुगंधी वनस्पतींचे आगार आहे....
औषधी वनस्पती, वृक्ष लागवड योजना गेल्या काही वर्षांत औषधी वनस्पतींची लागवड वाढत...
भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्तजनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे,...
गुणकारी अन् औषधी हरभरासाधारणपणे हिवाळ्यात कोवळा हरभरा येतो. हरभऱ्याचे...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
जाणून घ्या पळसाचे आरोग्यदायी गुणधर्मआपल्या सर्वांना पळस ही वनस्पती परिचित आहे....
आरोग्यदायी आवळाआवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध...
हळदीचे औषधी गुणधर्महळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक...
गुणकारी वाळावाळा म्हटले की उन्हाळ्याच्या दिवस आठवतात. माठ...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
महौषधी ओवास्वयंपाकघरातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओवा! अनेक...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...
वातविकारांवर गुणकारी एरंडएरंड ही वनस्पती सगळ्यांना सुपरिचित आहे. घरातील...
आरोग्यदायी सुरणसुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भाग ...
केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी माका ​माका सगळीकडे अगदी सहज मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो...
मळमळ, पित्तावर आमसूल फायदेशीरआमसूल महिलावर्गामध्ये अधिक लोकप्रिय आहे....
डाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...
आरोग्यदायी तुतीची फळेतामिळनाडू राज्यातील रेशीम संशोधन व जर्मप्लाझम...