Agriculture Agricultural News Marathi article regarding milch animal management. | Agrowon

प्लॅस्टिकमुळे जनावरांच्या कोठीपोटावर होतो परिणाम

डॉ. संतोष मोरेगावकर
बुधवार, 20 जानेवारी 2021

पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक साहित्य जनावरांच्या कोठीपोटमध्ये जाते. हे कोठीपोट आणि उपपोटामध्ये जमा होतात. यामुळे शरीरविकृतींचा सामना करावा लागतो. याची लक्षणे ओळखून पशू तज्ज्ञांकडून उपचार करावेत.

पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक साहित्य जनावरांच्या कोठीपोटमध्ये जाते. हे कोठीपोट आणि उपपोटामध्ये जमा होतात. यामुळे शरीरविकृतींचा सामना करावा लागतो. याची लक्षणे ओळखून पशू तज्ज्ञांकडून उपचार करावेत.

काही वेळा जनावरांच्या आहारात हे प्लॅस्टिक कागद, पिशव्या जातात. याचे जनावरांच्या पोटामध्ये संचयन होऊन कोठीपोट गच्च होते. यामुळे अपचन, वारंवार येणारी पोटफुगी, कोठीपोटातील उपयोगी जिवाणूंच्या ऱ्हास आणि प्लॅस्टिकमधील हानिकारक उपपदार्थ्यांच्या विषारी परिणामामुळे जनावरांचा मृत्यू होतो. कॅल्शिअम आणि फॉस्फरसच्या कमतरतेमुळे (पायका) जनावरे भूक भागविण्यासाठी निर्जीव वस्तू खाण्याची सवय लागते. फॉरेन बॉडी सिंड्रोमचा आजार होऊ शकतो. रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये रवंथ प्रक्रियेत अन्नाचा गोळा (कड) निवांत वेळेमध्ये पुन्हा तोंडात घेऊन त्याचे रवंथ करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या अन्न चोथ्यामध्ये लाळ मिसळली जाते. परंतु प्लॅस्टिक पदार्थाच्या सेवनामुळे अन्नपदार्थाची गोळा निर्मिती व एकूणच रवंथ प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक आवरण साहित्य जनावरांच्या कोठीपोटामध्ये जाते. हे कोठीपोट आणि उपपोटामध्ये जमा होतात. यामुळे शरीरविकृतींचा सामना करावा लागतो. अपचन, गच्च होणे, पोटफुगी, आघातजन्य रेटिक्युलोपेरिकार्ड्टीस, रासायनिक लीचिंग आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.भूक लागत नाही. 

 •   कोठीपोटामध्ये खाद्य पदार्थ प्लॅस्टिकमध्ये अडकतात आणि पाचक आणि किण्वित प्रक्रियेसाठी कोठीपोटातील उपयुक्त जिवाणूसाठी ते अनुपलब्ध होतात. यामुळे उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या अपेक्षित कार्यावर (किण्वन प्रक्रियेवर) परिणाम होतो. ज्यामुळे जनावरांना अपचनाची समस्या निर्माण होते. 
 •   पॉलिथिन पिशव्या, प्लॅस्टिक एकमेकांना अडकून त्याचा गोळा तयार होतो. नंतर जमा झालेला गोळा जाळीदार पोट व उपकोटी पोटाच्या दरम्यान असलेल्या छिद्रांना अडथळा आणतो. ज्यायोगे अन्नपदार्थांच्या हालचालींना त्रास होतो. कोठीपोटीची हालचाल बंद होते.

 पॉलिबेझोर्स (प्लॅस्टिकचे गोळे) 

 •   कोठीपोटात अडकलेल्या पॉलिथिन्सच्या सभोवतालच्या भागामध्ये क्षारांचा थर जमा होऊन गोळा होतो. पुढे अन्नपचन व वहन प्रकियेमध्ये अडथळा येतो.  

पोटफुगी 

 •   कोठीपोट आणि जाळीपोटामध्ये अस्तित्वात असलेल्या पॉलिथिनचे पदार्थ जाळी पोटी आणि उपकोठीपोटाच्या छिद्रांना अंशतः किंवा पूर्णपणे बंद करतात. ज्यामुळे कोठीपोटामध्ये वायू जमा होतात. प्लॅस्टिक पदार्थांच्या विघटनातून बिस्फेनोल्स, पॉलिविनाइल क्लोराईड, कॅडमियम, शिसे आणि अ‍ॅक्रॅलामाइड इत्यादी रसायने रोगप्रतिकारकशक्तीला हानिकारक आहेत.  
 •   प्लॅस्टिकमधील कोबाल्ट, शिसे, पारा, कॅडमियम, क्रोमियम आणि त्यांचे क्षार हळूहळू अन्ननलिकेतून शोषले जाऊन रक्तामध्ये पोहोचतात. ही रसायने जनावरांचे मांस व दूध उत्पादनांद्वारे मानवी अन्न साखळीत पोहोचतात. 

अखाद्य वस्तूंमुळे समस्या 

 •  बऱ्याच वेळा खिळे, तारा किंवा इतर तीक्ष्ण कठोर वस्तू पॉलिबॅगमध्ये गुंडाळल्या जातात आणि कचऱ्याच्या ढिगात फेकल्या जातात. अशा कचऱ्यावर प्राणी चरतात, जाळीदार पोटामध्ये असलेल्या मधुकोश रचनेमुळे या तीक्ष्ण वस्तू त्यात अडकतात आणि नुकसान करतात.  
 • या तीक्ष्ण वस्तू उदरपटलात घुसून हृदयावर आघात करतात किंवा जाळीदार पोटाच्या बाहेर येऊन यकृत, फुफ्फुस, प्लिहा या अवयवांना इजा पोहोचवतात.

जनावरांमधील काही लक्षणे 

 •  औदासिन्य, आंशिक किंवा संपूर्ण भूक मोड, वारंवार पोटफुगी येणे, कमी दूध उत्पादन, वजन कमी होणे, कोठीपोट निष्क्रिय होणे. इतर रोगांच्या परिस्थितीत वाढ होते. 

मानवी आरोग्यावर परिणाम 

 • कोठीपोटामध्ये जमा झालेल्या प्लॅस्टिक पदार्थांमधून घातक रासायनिक घटक बाहेर पडतात. हळूहळू या रसायनांचे शोषण मांस, दुधात होते. हे मानवी आहारात आल्यास परिणाम होतात. 

निदान आणि उपचार

 •   वारंवार येणारी पोटफुगी, जनावरांचा चरण्याचा इतिहास यावरून निदान करू शकतो.  तसेच क्ष-किरणे , सोनोग्राफी.   पोटफुगीची औषधे किंवा पोटसाफ होण्याची औषधे वापरून काही प्रमाणात हा आजार बरा करू शकतो. 
 •   ओटीपोटीची शल्यचिकित्सा हाच शेवटचा पर्याय आहे. यामध्ये शल्यचिकित्सक कोठीपोटी उघडून त्यामध्ये साचलेले प्लॅस्टिक पदार्थ बाहेर काढून परत कोठीपोटी शिवून व पुढील औषधोपचार करून समस्या सोडवितात.
   

- डॉ. संतोष मोरेगावकर, ९२८४६८०७६२,

(पशुविकृतिशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

 


इतर कृषिपूरक
अळिंबी उत्पादनामध्ये मोठ्या संधीभारतामध्ये अळिंबीचे विविध प्रकार उत्पादित केले...
कुक्कुटपालनाचे नियोजनकरार पद्धतीने कुक्कुटपालन करत असल्याने...
जनावरांतील गर्भाशयाचा दाहगर्भाशयाचा दाह हा विशेषतः दुधाळ व कमी...
प्रतिजैविकांचा योग्य वापर महत्त्वाचा...प्रतिजैविकांच्या अनावश्‍यक वापरामुळे...
जनावरांना उन्हाळ्यात द्या ऊर्जायुक्त...उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचा जनावरांचे...
मत्स्यशेतीतील फसवणुकीचे नवनवीन फंडेसुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या मार्गाने नव्या...
मत्स्यपालन व्यवसायाची महत्त्वाची सूत्रेमत्स्य संवर्धन करताना मातीची पोत, पाणी धरून...
खूर समस्येवर योग्य पोषण हाच उपायआवश्यकतेपेक्षा कमी, जास्त किंवा असमतोल...
जनावरांमधील पोटफुगीवर जिरे, हळद, बडीशेप...पोटफुगी आजारावर उपचार तत्काळ करणे आवश्यक असते....
मत्स्यबीजांमधील फसवणूक जाणून नुकसान टाळाशेतकऱ्यांना मत्स्यशेतीविषयी फारशी माहिती उपलब्ध...
पशुखाद्य निर्मितीसाठी आधुनिक यंत्रणादळलेले आणि योग्य प्रकारे मिसळले पशुखाद्य पावडर...
दुधाळ गायींमधील लंगडेपणावर उपायखुरांच्या समस्या हे लंगडेपणाचे प्रमुख कारण आहे....
यकृत आजारावर चिरायता, कटुकी, माका उपयोगीजनावरांमध्ये आजारावर उपचार करताना प्रतिजैविकांचा...
कुक्कुटपालनाचे नियोजननाव: सतीश पोपट कुळधर गाव: सायगाव, ता.येवला, जि....
सुधारित तंत्रातून वाढते पशुआहाराची...सर्वसाधारणपणे भौतिक, रासायनिक, जैविक,...
शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला, ॲ...झाडपाल्याचा शेळ्यांसाठी चारा म्हणून वापर केल्यास...
दुधी अळिंबी लागवड तंत्रज्ञान दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी...
प्लॅस्टिकमुळे जनावरांच्या कोठीपोटावर...पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक साहित्य जनावरांच्या...
भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्तजनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे,...
जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी...मी जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी जातींच्या...