Agriculture Agricultural News Marathi article regarding milch animal management. | Agrowon

जनावरांमधील पोटफुगीवर जिरे, हळद, बडीशेप उपयुक्त

डॉ. सुधीर राजूरकर
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

पोटफुगी आजारावर उपचार तत्काळ करणे आवश्यक असते. कारण उपचारास वेळ झाल्यास पोटफुगी वाढत जाते. वाढलेल्या पोटामुळे इतर अवयव म्हणजेच फुफ्फुस, हृदयावर दाब पडतो. सुरुवातीस किरकोळ वाटणारा हा आजार जीवघेणा ठरतो.

पोटफुगी आजारावर उपचार तत्काळ करणे आवश्यक असते. कारण उपचारास वेळ झाल्यास पोटफुगी वाढत जाते. वाढलेल्या पोटामुळे इतर अवयव म्हणजेच फुफ्फुस, हृदयावर दाब पडतो. सुरुवातीस किरकोळ वाटणारा हा आजार जीवघेणा ठरतो.

पोटफुगी म्हणजेच टीम्पनी किंवा पोटामध्ये गॅसेस होणे. जनावरांना बऱ्याच वेळेस होणारा आणि तत्काळ उपचार न केल्यास घातक ठरणारा हा आजार खाद्यात होणाऱ्या अचानक बदलामुळे होतो.

 • संपूर्ण उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीस पहिले एक-दोन पाऊस पडले की सर्वत्र हिरवे गवत उगवते. जनावर ते खाते. बऱ्याच वेळेस गवतावर असणारे कीटक हे देखील जनावरांच्या पोटात जातात. त्यामुळेदेखील पोटदुखीचा त्रास चालू होतो. पोटफुगी आजारावर उपचार तत्काळ करणे आवश्यक असते. कारण उपचारास वेळ झाल्यास पोटफुगी वाढत जाते. वाढलेल्या पोटामुळे इतर अवयव म्हणजेच फुफ्फुस, हृदयावर दाब पडतो. सुरुवातीस किरकोळ वाटणारा हा आजार जीवघेणा ठरतो.
 • पोटफुगीवर उपचार हे औषधी वनस्पतीद्वारे सहज शक्य आहे. परंतु यापूर्वी ही पोटफुगी कशामुळे झाली याची तपासणी करावी. बऱ्याच वेळेस जनावराच्या अन्ननलिकेत काही अडकले तर पोटफुगी होते. अशा वेळेस उपचार पद्धती वेगळी असते.

पोटफुगीमध्ये उपयुक्त औषधी वनस्पती 
ओवा 

 • अन्नपचनादरम्यान तयार होणारा वायू (गॅस) पोटाच्या हालचालींसोबतच बाहेर पडतो. बऱ्याच वेळा खाद्यामध्ये होणाऱ्या बदलामुळे या वायूचे तयार होण्याचे प्रमाण वाढते. पर्यायाने जनावरास पोटफुगी होते. या वायूचा दाब इतर अवयवांवर पडतो. याचा परिणाम पोटाच्या हालचालींवर होतो.
 • ओव्यामुळे पचनादरम्यान तयार होणाऱ्या वायूच्या प्रमाणावर नियंत्रण येते. सोबतच पोटाची हालचाल वाढल्यामुळे हा वायू बाहेर पडतो.
 •  ओवा अन्नपचनास मदत करतो. पोटफुगी होऊ नये व झाल्यास त्यावर उपचार म्हणून ओव्याचा वापर होतो.

जिरे

 • जिऱ्याचा वापर पोटफुगी आजारात अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
 • अन्नपचनास मदत करणारी ही अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. 
 • जिरे पोटाची हालचाल नियमित करते. अन्नपचनाच्या क्रियांमध्ये तयार होणाऱ्या वायूचे प्रमाण जिरे या वनस्पतीमुळे नियमित होते. याशिवाय पचन क्रिया सुधारते. 

बडीशेप 

 • बडीशेप जनावरांमध्ये पोटफुगी होऊ देत नाही. अथवा ती झाल्यास उपचार म्हणून अत्यंत उपयुक्त ठरते.

हळद 

 •  बऱ्याच वेळा जनावरांच्या पोटात असणाऱ्या उपायकारक सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी होऊन अपायकारक सूक्ष्मजीवांचे प्रमाण संसर्गामुळे वाढते. यामुळे जनावरांना अपचन होते, याच दरम्यान पोटात जास्तीचा वायू तयार होऊन पोटफुगी होते.
 • हळदीचा वापर पोटफुगीमध्ये व फेसयुक्त पोटफुगीमध्ये अत्यंत उपयुक्त ठरतो.  
 •  जिवाणूविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म आहेत. यामुळे हळदीचा वापर संसर्गात देखील उपयुक्त ठरतो.
 •  हळदीचे मूळ अथवा हळकुंड जनावरांच्या पोटफुगीवर अत्यंत उपयुक्त आहे.

धने 

 •     अन्नपचनास मदत करून पोटात तयार होणाऱ्या वायूचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी धने अत्यंत उपयुक्त आहेत. 
 •     आपल्या दैनंदिन आहारात व मसाल्याच्या पदार्थातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे धने. ही वनस्पती जनावरांच्या पोटफुगीवर अत्यंत उपयुक्त आहे.

काळे मीठ 
पचन संस्थेच्या, जनावरांच्या पोटफुगीवर काळ्या मिठाच्या वापरास अत्यंत महत्त्व आहे.

टर्पेंटाईन तेल
    टर्पेंटाईन तेल हे वनस्पतीपासूनच काढले जाते. परंतु रंगकामासाठी वापरात येणारे टर्पेंटाईन तेल हे भेसळयुक्त असते. विशेषतः यामध्ये रॉकेलची भेसळ असते. म्हणून या तेलाचा वापर करत असताना औषधी दुकानांमधून विकत घ्यावे.

वापर 
    गाय, म्हैस, बैल : ५० ते १०० मिलि टर्पेंटाईन तेल २०० मिलि गोडेतेलात मिसळून पाजावे.
    शेळी, मेंढी, वासरे : २५ ते ५० मिलि टर्पेंटाईन तेल १०० मिलि गोडेतेलात मिसळून पाजावे.  

टीप ः वरील औषधे पोटफुगीच्या तीव्रतेनुसार चार ते सहा तासांच्या विश्रांतीनंतर परत द्यावीत. पोटफुगी कमी झाल्यानंतर देखील दररोज एक वेळेस अशी दोन दिवस द्यावीत. यामुळे पोटफुगी परत होणार नाही.

-डॉ. सुधीर राजूरकर,९४२२१७५७९३
(प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)


इतर कृषिपूरक
उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनगोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी...
फलोत्पादनासाठी शासनाच्या योजनाकृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना...
अळिंबी स्पॉन करताना घ्यावयाची काळजीसंशोधनाच्या आधारे भारतामध्ये अळिंबी स्पॉनसाठी...
पैदाशीच्या बोकडाचे व्यवस्थापनशेळीपालकांनी आपल्या प्रक्षेत्रावर जातिवंत बोकड...
मृदूअस्थी ः दुधाळ गाई- म्हशीतील आजारमृदूअस्थी आजार दुधाळ व गाभण गाई-म्हशींना निव्वळ...
शाश्वत गिनी पालनासाठी नवे तंत्रज्ञानस्थानिक पातळीवर गिनी, तितारी आणि चित्रा या...
सातत्यपूर्ण दूध उत्पादन देणारी निली...निली रावी म्हशीची दूध उत्पादन क्षमता ही मुऱ्हा...
जनावरातील लिस्टेरियोसिस आजारलिस्टरियोसिस आजारामध्ये जनावरे मान एकीकडे खेचून...
कोंबड्यांमधील उष्माघातावरील उपचारउन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी...
मत्स्य बीज खरेदी, संचयन करतानाची काळजीमत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज द्रव्येपचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक...
निकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धननिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या...
अळिंबी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेची...चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी...
देशी गाईंमधील प्रजनन व्यवस्थापनावर द्या...देशी गाईंची निवडलेली जात, वंशावळ आणि...
स्पेंट मशरूम कंपोस्टचे मूल्यवर्धनपारंपरिक कंपोस्ट खतामध्ये अनेक प्रकारचे...
उन्हाळ्यातील कोंबड्यांचे आहार व्यवस्थापनउन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना उष्माघात होतो. यामुळे...
संधिवातावर निर्गुडी, निलगिरी उपयुक्तपशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी...
शेळ्यांची निवड पद्धतीशेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड...
प्राणिजन्य क्षयरोगाकडे नको दुर्लक्षजनावरांना क्षयरोग झाल्यास उत्पादनक्षमता १० ते २५...
योग्य खाद्य व्यवस्थापनातून उष्माघाताचे...उन्हाळ्याच्या काळात आहारामध्ये साधारणतः ५ ते ७...