Agriculture Agricultural News Marathi article regarding milch animal management. | Page 4 ||| Agrowon

मृदूअस्थी ः दुधाळ गाई- म्हशीतील आजार

डॉ. अनिल भिकाने
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

मृदूअस्थी आजार दुधाळ व गाभण गाई-म्हशींना निव्वळ वाळलेल्या चारा दिल्यामुळे होतो. म्हशींमध्ये हा आजार होण्यास स्फुरदाची कमतरता हेच प्रमुख कारण आहे. 

मृदूअस्थी आजार दुधाळ व गाभण गाई-म्हशींना निव्वळ वाळलेल्या चारा दिल्यामुळे होतो. म्हशींमध्ये हा आजार होण्यास स्फुरदाची कमतरता हेच प्रमुख कारण आहे. 

को रडवाहू भागात विशेषतः मराठवाड्यात दुधाळ म्हशींमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात मृदूअस्थी हा आजार आढळून येतो. ग्रामीण भागात या आजारास ‘उरमोडी’ असे म्हणतात. योग्य उपचाराअभावी आणि अंधश्रद्धेपोटी बरेच पशुपालक आजारी म्हशींच्या छातीच्या भागात डाग देतात. मृदूअस्थी आजार प्रामुख्याने स्थानिक म्हशींमध्ये आढळून येतो. आजार प्रामुख्याने एप्रिल ते जुलै दरम्यान होतो. आजार सर्वसाधारण दुभत्या म्हशी व्यायल्यानंतर ६ ते ८ महिन्यांनी होतो क्वचित गाभण म्हशीतही हा आजार दिसून येतो. म्हशींच्या तुलनेत गायींमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. 

आजाराची कारणे   
जमिनीत स्फुरदाची कमतरता 

 •   राज्यातील विशेषतः चराऊ व वहितीखालील जमिनीत स्फुरदाचे प्रमाणे अत्यंत कमी असल्याचे आढळून आले आहे. 
 •   जमिनीत स्फुरदाचे प्रमाण कमी असले की, चाऱ्यातसुध्दा स्फुरद कमी येते. चाऱ्यातून म्हशींना स्फुरदाचा आवश्यक पुरवठा होत नाही. 

असमतोल आहार 

 •   खा़द्यात हिरवा चारा, वाळलेला चारा, खुराक व क्षार- जीवनसत्त्व मिश्रणाचा अंतर्भाव असावा. - राज्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता काही भाग सोडला तर बहुतांश भाग कोरडवाहू असल्यामुळे हिरवा चारा जनावरास फक्त पावसाळ्यातील चार महिने मिळतो. 
 •   उन्हाळ्याच्या दिवसांत जनावरांना फक्त वाळलेला चारा/कडबा मिळतो. व्यावसायिक तत्त्वावर पाळल्या जाणाऱ्या म्हशीशिवाय इतर म्हशींना आपल्याकडे खुराक, क्षार व जीवनसत्वे मिळत नाहीत. वाळलेल्या चाऱ्यात स्फुरदाचे प्रमाण अत्यल्प असते. याउलट हिरव्या चाऱ्यात स्फुरदाचे प्रमाण वाळलेल्या चाऱ्याच्या तिप्पट तर खुराकात तिप्पट ते सहापट जास्त असते. एकंदरीत ज्या म्हशी निव्वळ वाळलेल्या चाऱ्यावर अवलंबून असतात त्या प्रामुख्याने या आजारास बळी पडतात.  

शरीराची वाढती गरज
शरीराच्या गरजेनुसार स्फुरद न मिळाल्याने हा आजार होतो. दुधाळ गाई-म्हशींना दूध तयार होण्यासाठी तर गाभण गाई-म्हशींना गर्भाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर स्फुरदाची आवश्यकता असते. साधारणतः एक लिटर दुधात १ ग्रॅम स्फुरद जाते. यासाठी आहारातून प्रतिलिटर दूधामागे २ ग्रॅम जादा स्फुरद मिळणे आवश्यक असते.म्हणून वाढलेल्या गरजेप्रमाणे आहारातून स्फुरद पुरवणे आवश्यक आहे.

गाई-म्हशींमधील मृदूअस्थी  आजार   
गाई-म्हशींच्या आहारात स्फुरदाची कमतरता असेल किंवा अधिक दूध देणाऱ्या जनावरांत दूधाद्वारे स्फुरद जास्त प्रमाणात जात असेल आणि त्या प्रमाणात आहारातून स्फुरदाची भरपाई होत नसेल तर रक्तातील स्फुरदाचे प्रमाणे कायम ठेवण्यासाठी व दूध उत्पादनासाठी हाडातील स्फुरद शरीरक्रियेद्वारे काढले जाते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात. 

लक्षणे   

 •   चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. जनावर खंगत जाते. दुग्धोत्पादन घटते 
 •   जनावर आखडून व हळूवार चालते/लंगडते. पाठ वाकडी होते. 
 •   जनावर उठताना अत्यंत हळूवार उठते. बराच वेळ गुडघ्यावर थांबते. 
 •   वेळीच उपचार केला नाही तर जनावर आडवे पडून राहते आणि शेवटी दगावते. 

उपचार 

 •   आजारी गाई-म्हशींना १५ ते ३० दिवस नियमितपणे  क्षार मिश्रणे १०० ते १२५ ग्रॅम मात्रेमध्ये दिल्यास त्या पूर्णपणे दुरुस्त होतात.
 •   उपचारासाठी सर्वसाधारणतः ४०० ते ५०० रुपये खर्च येतो. पशुपालक घरच्या घरी आजारी जनावरावर उपचार करू शकतात. 

प्रतिबंधक उपाय 

 •   हा आजार दुधाळ व गाभण गाई-म्हशी निव्वळ वाळलेल्या चाऱ्यावर ठेवल्यामुळे होतो. म्हणून शक्य आहे तेथे त्यांना हिरवा चारा द्यावा. 
 •   दुधाळ गाई,म्हशी दुधाच्या प्रमाणात म्हणजे प्रती २.५ ते ३ लिटर दुधामागे एक किलो तर गाभण गाई-म्हशींना गाभणकाळाच्या शेवटच्या २ महिन्यात दीड किलो जादा खुराक द्यावा. दुधाळ व गाभण गाई,म्हशींना क्षार मिश्रणे रोज किमान ५० ग्रॅम याप्रमाणे द्यावीत. यामुळे प्रत्येक दुधाळ म्हशींपासून एक लिटर दूध जादा मिळेल.

- डॉ. अनिल भिकाने,
  ९४२०२१४४५३ 
(सहयोगी अधिष्ठाता, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)


इतर कृषिपूरक
उष्णतेच्या ताणापासून दुधाळ जनावरांची...वातावरणातील तापमान व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
गाई, म्हशींमधील छातीचे आजारजनावरांमधील छातीच्या आजारामुळे दुग्धोत्पादनावर...
वराहपालन सुरू करताना...वराहपालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून...
गीर संवर्धन करणारा भरवाड समुदायभरवाड समुदायासाठी गीर गोवंश संपत्ती आहे....
बहुगुणी मधाची शुद्धता अन् उपयोग मधमाश्यांपासून मधासोबतच अन्य मौल्यवान...
कृषी उत्पादन वाढीसाठी मधमाश्या...जागतिक मधमाशी दिवस विशेष वाढते शेतीक्षेत्र,...
आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआआंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची...
दुधाळ जनावरांमधील माज ओळखण्याच्या...दुधाळ जनावरांतील व्यवस्थापनामध्ये मुख्य कार्य...
वासरांची वाढ खुंटण्याची कारणे अन्...वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसर, बाळ खुराक इ....
संगोपन जानी म्हशीचे...चांगल्या दर्जाचे जनावर टिकून राहावे म्हणून जानी...
दूध उत्पादन वाढीसाठी दर्जेदार पशुआहारचारा कुट्टी करत असताना त्याचा योग्य आकार...
दूधनिर्मिती अन् प्रत टिकविण्यासाठी...दुधाचा दर हा गुणवत्तेवर अवलंबून असतो. त्यामुळे...
देशी, जर्सी, एचएफ गाईंचे अर्थशास्त्रशेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय...
शिफारशीनुसार जनावरांना लसीकरण आवश्यक...जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात...
उन्हाळ्यातील म्हशींचे व्यवस्थापन जनावरांसाठी पुरेसे पाणी, खाद्याची व्यवस्था ठेवावी...
जनावरातील मूतखड्यावर गोखरू, कुलशी...मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात...
नियोजन चारा, खाद्यमिश्रणाचे..जनावरांना वर्षभर लागणाऱ्या पशुखाद्य घटक, हिरवा...
शेळीपालनातील महत्त्वाच्या बाबीआपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीची असली तरी...
उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनगोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी...
फलोत्पादनासाठी शासनाच्या योजनाकृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना...