आरोग्यदायी तुतीची फळे

तुतीच्या साधारण जातीची फळे १ ते २ सें.मी.लांब व २ ग्रॅम वजनाची असतात. लॅव्हिगेटा सुधारित जातीला ८ ते ९ सेंमी लांब आणि ६ ते १० ग्रॅम वजनाची फळे वर्षातून दोनदा येतात. प्रामुख्याने थंड वातावरण पुरेसे पाऊसमान, असल्यास फळांची उपलब्धता आणि गुणवत्ता चांगली असते.
mulberry fruits
mulberry fruits

तामिळनाडू राज्यातील रेशीम संशोधन व जर्मप्लाझम रिसोर्स संस्थेकडे १२९९ पेक्षा जास्त तुतीच्या जातींचे संवर्धन   केलेले आहे. तुतीच्या पांढऱ्या, काळ्या रंगाच्या विविध जाती आहेत. यामध्ये तुतीच्या पांढऱ्या जातींची लागवड ही प्रामुख्याने रेशीम अळी संगोपनासाठी केली जाते. तुतीच्या साधारण जातीची फळे १ ते २ सें.मी.लांब व २ ग्रॅम वजनाची असतात. लॅव्हिगेटा सुधारित जातीला ८ ते ९ सेंमी लांब आणि ६ ते १० ग्रॅम वजनाची फळे वर्षातून दोनदा येतात. प्रामुख्याने थंड वातावरण पुरेसे पाऊसमान, असल्यास फळांची उपलब्धता आणि गुणवत्ता चांगली असते.  लॅव्हिगेटा तुती जातीची उपलब्धता निसर्गामध्ये विखुरलेली आहे. या जातीला मोठी फळे येतात. याची लागवड फळांसाठी उपयोगी ठरते.

तुती फळांचे आरोग्यदायी महत्त्व

  • फळे शरीर स्वास्थ्यासाठी गुणकारी ठरतात. फळांना चांगला स्वाद आहे. 
  • तुती फळांपासून जाम, जेली, तसेच स्वादिष्ट पेय बनविता येते. फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पोषक तत्त्वे आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. 
  • एक कप तुतीच्या फळांपासून ६० कॅलरी ऊर्जा मिळते. 
  • फळांमधील पिष्टमय पदार्थामधून साखरेचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. त्यातून ऊर्जा मिळते.
  • फळांतून लोह मिळते. त्याचा फायदा हिमोग्लोबीन वाढ तसेच प्राणवायू पुरवण्यासाठी होतो. 
  • फळांमध्ये रिबोफ्लोविन( जीवनसत्त्व ब-२) उपलब्ध आहे. जे प्राणवायू पुरवठ्यासाठी उपयोगी ठरते. 
  • फळांमध्ये पोषक तंतुमय घटकांची चांगल्या प्रमाणात उपलब्धता असते. त्यामुळे पचनास मदत होते. यामुळे सूज व पोटातील ताठरपणा, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. 
  • फळांचा आहारामध्ये समावेश केल्याने कंबर आणि मांडीवरची चरबी कमी होण्यास मदत होते. 
  • इटली येथील तज्ज्ञांच्या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे, तुती फळाचा आहारामध्ये समावेश केल्यास तीन महिन्यात १० टक्के वजन कमी झाले आहे. 
  • शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी तुतीच्या पांढऱ्या फळांचे सेवन उपयोग ठरते. फळांमधील रसायनांच्यामुळे टाईप २ मधुमेहावर नियंत्रण शक्य होते.  
  • फळांमध्ये अ‍ॅन्थोसायनीन मोठ्या प्रमाणात असते. जे कर्करोगाच्या पेशींना वाढू देत नाही. यामधील रिसपेरेट्रॉल हे कर्करोग रोधक आणि प्रोस्टेट ग्रंथीरोधक म्हणून ओळखले जाते.  थायरॉडपासून बचाव करण्यासही मदत करते.  
  • फळांमध्ये अ‍ॅन्टीऑक्सीडंट भरपूर प्रमाणात असतात,जे रक्तवाहिन्या व रक्त पेशींचे कार्य सुधारण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत होतो. तांबड्या रक्त पेशी वाढण्यास फायदा आणि रक्त पुरवठा सुरळीत होतो. तुती फळांमध्ये पॉलीफेनॉल्स असतात. रक्तवाहिन्यांचे कार्य चांगले ठेवतात.  यामध्ये उपलब्ध असलेले पोटॅशिअम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयोगी ठरते. 
  •  फळांमधील क जीवनसत्त्व रोग प्रतिकारशक्ती तसेच पेशींना मजबूत करण्यासाठी उपयोगी पडते. फळांमधील कॅल्शिअम आणि लोहाचे प्रमाण हाडांच्या पेशी आणि हाडांना बळकटी करण्यास मदत करतात. 
  • मेंदू कार्यासाठी आवश्यक कॅल्शिअम तुतीच्या फळांमध्ये उपलब्ध असते. हे मेंदूचे वार्धक्य टाळण्यासाठी उपयोगी ठरते. ज्यामुळे आपला मेंदू जास्त काळासाठी क्रियाशील राहतो. ज्यामुळे अल्जाइमर सारखे मेंदूशी निगडीत रोग दूर राहतात. 
  • फळातील लोह यकृताची आरोग्य प्रणाली चांगली ठेवण्यास उपयोगी ठरते.  
  • तुतीची पांढरी फळे प्रकृतीसाठी उपयुक्त असतात. सर्दी-खोकल्यावर उपयुक्त. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लॉरोनोईड शरीरासाठी चांगले असते.  
  • शरीरातील सूज कमी करण्यासाठी उपयोगी. 
  • कु.अश्‍विनी जाधव, ७३८५५३७०३३,

    डॉ. अधिकराव जाधव,९८२२७०१९२५ 

    (कु.अश्‍विनी जाधव अन्न प्रक्रिया व व्यवस्थापन विभाग,  के.बी.पी. महाविद्यालय, पंढरपूर,जि. सोलापूर आणि डॉ. अधिकराव जाधव हे सेंटर ऑफ एक्सलन्स  अँड इन्क्युबेशन इन सेरिकल्चर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com