Agriculture Agricultural News Marathi article regarding muskmelon processing. | Page 2 ||| Agrowon

खरबुजापासून पावडर, सरबत

विठ्ठल चव्हाण,डॉ. रवींद्र काळे
मंगळवार, 6 एप्रिल 2021

खरबुजाचे  मूल्यवर्धन वेगवेगळ्या स्वरूपात केल्यास ते  टिकवून ठेवण्यात मदत होते. या फळापासून जॅम, जेली, गर, सरबत, स्क्वॅश तयार करता येतो.

खरबुजाचे  मूल्यवर्धन वेगवेगळ्या स्वरूपात केल्यास ते  टिकवून ठेवण्यात मदत होते. या फळापासून जॅम, जेली, गर, सरबत, स्क्वॅश तयार करता येतो.

 

खरबूज फळ पौष्टिक आणि औषधी आहे. हे  जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व क , जीवनसत्त्व बी ६ आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. खरबूज हे नाशवंत फळ असल्याने जास्त काळ साठवले जाऊ शकत नाही. खरबुजाचे  मूल्यवर्धन वेगवेगळ्या स्वरूपात केल्यास ते  टिकवून ठेवण्यात मदत होते. या फळापासून जॅम, जेली, गर, सरबत, स्क्वॅश तयार करता येतो.
पावडर 

  • खरबुजाची फळे स्वच्छ पाण्यात धुऊन आणि स्टेनलेस स्टीलच्या चाकू वापरून त्यावरील खाण्यास योग्य नसलेला भाग काढून घ्यावा. 
  • सोललेली फळे दोन भागात अर्धवट कापून त्याच्या बिया काढाव्यात. नंतर त्याचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून त्याचा गर करून घ्यावा. हा गर मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. नंतर हा गर स्प्रे ड्रायर किंवा कॉन्व्हेंशनल ड्रायर वापरून वळवावा. पावडर प्लास्टिकच्या पिशवीत साठवावी. 

सरबत  

  • चांगली निवडलेली फळे स्वच्छ पाण्यात धुऊन आणि स्टेनलेस स्टीलच्या चाकू वापरून त्यावरील खाण्यास योग्य नसलेला भाग काढावा. सोललेली फळे दोन भागात अर्धवट कापून त्याच्या बिया काढून घ्याव्यात. नंतर त्याचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये त्याचा गर करून घ्यावा. 
  • गरामध्ये १० टक्के खरबूज गर आणि  १० टक्के साखर असते तसेच ०.१ -०.३ टक्के आम्ल असते. 
  • एक लिटर गाळून घेतलेल्या गरामध्ये १ किलो  साखर आणि १ ते ३ ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि ९ लिटर पाणी मिसळून घ्यावे. बनवलेले मिश्रण मंद आचेवर ५ मिनिटे गरम करून थंड करून घ्यावे थंड केलेले आरटीएस निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे.

सिरप 

  • चांगली निवडलेली फळे स्वच्छ पाण्यात धुऊन आणि स्टेनलेस स्टीलच्या चाकू वापरून त्यावरील खाण्यास योग्य नसलेला भाग काढावा. सोललेली फळे दोन भागात अर्धवट कापून  त्याच्या बिया काढून घ्याव्यात. नंतर त्याचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये  गर करून घ्यावा.
  • ५०० मिलि गरामध्ये २५० ग्रॅम साखर आणि २ ग्रॅम सायट्रिक आम्ल किंवा १० मिलि लिंबाचा रस मिसळावा. हे मिश्रण साखर विरघळण्यासाठी उकळावा. 
  • उकळलेले मिश्रण सुती कापडातून गाळून प्लास्टिक बाटलीमध्ये भरून रेफ्रिजरेटरमध्ये साठवावे.

 - विठ्ठल चव्हाण, ९५१८३४७३०४ 
( एम. जी. एम. अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद)


इतर कृषी प्रक्रिया
टोमॅटोपासून केचअप, सूप, प्यूरीटोमॅटो अत्यंत नाशवंत फळभाजी असून काढणीनंतर लगेच...
आरोग्यदायी व्हर्जीन कोकोनट ऑइलव्हर्जीन कोकोनट ऑइल तेल उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ...
अंड्यापासून जॅम, पनीर निर्मितीसर्वांत स्वस्त, उत्तम पोषणतत्त्वे असणारा पदार्थ...
बहुगुणी राळाराळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या...
लसणापासून लोणचे, जेली, चटणीलसूण हा आपल्या सर्वांना परिचित आहे. लसणाचा उपयोग...
लिंबू प्रक्रियेतील संधी लिंबाच्या रसात जंतुनाशकता व रोगप्रतिकारकता...
अळिंबी स्पॉन निर्मिती तंत्रज्ञानअळिंबी लागवडीसाठी योग्य प्रकारचे स्पॉन आणि त्याची...
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
खरबुजापासून पावडर, सरबतखरबुजाचे  मूल्यवर्धन वेगवेगळ्या स्वरूपात...
आरोग्यवर्धक लसूण लसणाचा उपयोग स्वयंपाकात अन्न स्वादिष्ट होण्यासाठी...
अळिंबीची मूल्यवर्धित उत्पादनेपारंपरिक पदार्थांमध्ये वाळलेल्या आणि पावडर धिंगरी...
शास्त्रोक्त पद्धतीने हळद बियाण्याची...निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी...
चिंचेपासून प्रक्रिया केलेले पदार्थचिंच चवीला आंबट, तुरट व थोडीशी गोडसर असते. विविध...
आरोग्यदायी किवी फळकिवी  हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड...
बेलफळाच्या प्रक्रिया उद्योगाला संधीबेलापासून जेली, जॅम, सरबत निर्मिती करता येते. या...
अळिंबीपासून केचअप, कॅण्डी, मुरंबाअळिंबीमध्ये जास्त आर्द्रता असल्यामुळे अळिंबीचा...
आरोग्यदायी हळद मिश्रित दूधहळदीचा वापर औषधोपचारामध्ये चांगल्या प्रकारे होते...
होळीसाठी नैसर्गिक रंगनिर्मितीचा व्यवसायघरगुती पातळीवर रंगांची निर्मिती सोपी आहे....
बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायएव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा “बर्ड फ्लू” हा एक...
अंजिरापासून बर्फी, गर, पावडरअंजिरामध्ये तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व-क व...