Agriculture Agricultural News Marathi article regarding onion cultivation. | Agrowon

दर्जेदार कांदा रोपनिर्मितीचे तंत्र

डॉ. राजीव काळे, डॉ. शैलेंद्र गाडगे
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

एक हेक्टर कांदा लागवडीसाठी पाच गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी असते. अधिक उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित जातींचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी रोपवाटिकेची तयारी ऑक्टोबर महिन्यात केली जाते. एक हेक्टर कांदा लागवडीसाठी पाच गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी असते. अधिक उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित जातींचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

रोपवाटिका व्यवस्थापन 

 • पाण्याचा चांगला निचरा होणारी उताराची जमीन निवडावी. जमिनीमध्ये चांगल्या कुजलेल्या ५०० किलो शेणखतामध्ये १.२५ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी मिसळावे. 
 • रोपवाटिका गादी वाफे किंवा सपाट वाफ्यांवर करावी. 
 • गादी वाफे १.५ सेंमी उंच, १.२ मीटर रुंद आणि ६० मीटर लांब (सोयीनुसार) असावेत.
 • सपाट वाफे तयार करताना १ ते १.२ मीटर रुंद आणि ५ ते ६ मीटर लांब करावेत.

   जाती 
भीमा शक्ती, भीमा किरण 

   लागवड 

 • लागवडीसाठी हेक्टरी ५ ते ७ किलो बियाणे लागते.
 • प्रति किलो बियाणास २ ते ३ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बेन्डाझीमची बीजप्रक्रिया करावी.
 • पेरणी ओळीमध्ये ५ ते ७.५ सेंमी अंतरावर १ ते १.५ सेंमी. खोलीवर करावी. 

   खते 

 • नत्र २ किलो, स्फुरद आणि पालाश प्रत्येकी १ किलो द्यावे.
 • पेरणीनंतर १५ ते २५ दिवसांनी प्रत्येकी १ किलो नत्र द्यावे. 

   तण व्यवस्थापन 

 • रोपे उगवण्यापूर्वी वाफ्यावर पेंडिमिथॅलीन २ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी एक खुरपणी करावी.

   पाणी व्यवस्थापन 
ठिबक सिंचन 

 • प्रत्येक वाफ्यामध्ये इनलाइन ड्रिपर असणाऱ्या १६ मिमी व्यासाच्या लॅटरलचा वापर करावा. 
 • दोन ड्रिपरमध्ये ३० ते ५० सेंमी अंतर असावे. ड्रिपरची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता ताशी ४ लिटर असावी.

तुषार सिंचन

 • दोन लॅटरलमध्ये ६ मीटर अंतर ठेवावे. नोझलची पाणी फेकण्याची क्षमता ताशी १३५ लिटर असावी.
 • रोपवाटिकेतील जादा झालेले पाणी बाहेर काढून टाकावे. जास्त पाण्यामुळे रोपे मरण्याची शक्यता असते.  

    पुनर्लागवड 

 • रोपे पुनर्लागवडीसाठी रांगडा हंगामात ४५-५० आणि रब्बी हंगामात ५०-५५ दिवसानंतर तयार होतात. 
 • रोपे काढणीच्या २-३ दिवस आधी थोड्या प्रमाणात पाणी द्यावे. 
 • पानांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून काढावा.
 • कार्बोसल्फॉन २ मिलि व कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात रोपांची मुळे २ तास बुडवून नंतर लागवड करावी. या प्रक्रियेमुळे कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
   

कीड नियंत्रण 
फवारणी ः प्रति लिटर पाणी
फुलकिडे 

 • फिप्रोनिल १ मिलि किंवा
 • प्रोफेनोफॉस १ मिलि किंवा 
 • कार्बोसल्फान २ मिलि

रोग नियंत्रण 

फवारणी ः प्रति लिटर पाणी

मर रोग 

 • मेटॅलॅक्झील अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम
 • द्रावण करून रोपांच्या ओळीत ओतावे.

काळा किंवा तपकिरी करपा 

 • मॅंन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा
 • ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा 
 • हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम 
 • रोपांच्या पानांवर फवारणी करावी.

टीप- लेखातील कीडनाशकांच्या शिफारसी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या आहेत.

- डॉ. राजीव काळे,९५२१६७८५८७,

(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, जि. पुणे)

 


इतर नगदी पिके
उन्हाळी कांदा पिकाची काढणी, साठवणूक कांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची निवड...
उन्हाळ्यात राबवा प्रभावी सिंचन...पाणी हा ऊस उत्पादनातील अतिशय महत्त्वाचा व...
खोडवा ऊस व्यवस्थापनाचे सुधारित तंत्रराज्यामध्ये तिन्ही हंगामांतील ऊस  तुटून...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरसूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची उसाच्या पानांवर...
दर्जेदार कांदा बीजोत्पादनासाठी...उत्तम कांदा बीजोत्पादनासाठी कंदाच्या योग्य...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
व्यवस्थापन ऊस पाचटाचे ...पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच...
सुरू उसातील सूक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापनमाती परीक्षण अहवालानुसार जमिनीत या सूक्ष्म...
नियोजन सुरू ऊस लागवडीचे...सुरू हंगामातील ऊस लागवड १५ डिसेंबर ते १५...
ऊस पिकावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापनपश्‍चिम महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यापासून ते...
आरआरसी’ म्हणजे काय रे भाऊ...?राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर...
गुलाबी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापनाकडे...सध्या अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या...
सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवडकांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
वेचणीयोग्य कपाशीला येत्या पावसाची चिंतामाझे कापसाचे पीक जवळपास ११५ ते १२० दिवसांचे झाले...
दर्जेदार कांदा रोपनिर्मितीचे तंत्रमहाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोरायनेस्पोरा बुरशीजन्य पानांवरील ठिपके...कपाशीचे पीक हे सध्या ६० ते ७५ दिवसांचे आहे....
कपाशीवरील रस शोषक किडींचे एकात्मिक...सध्या ढगाळ वातावरण कायम असून, कपाशीवर रस शोषक...
कपाशीतील बोंडे सडण्यावरील उपाययोजनामहाराष्ट्राच्या प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात...