खातेदाराची ओळख

आता पूर्वीप्रमाणे जुन्या खातेदाराची ओळख घेऊन खाते उघडले जात नाही. खातेदाराने आपली स्वत:ची ओळख ही कागदपत्राद्वारे करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वत:चे फोटो असलेले कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, तसेच नोकरदार असल्यास त्यांचे ओळख पत्र ही स्वतःची ओळख दर्शवणारी कागदपत्रे लागतात .
bank account opening form
bank account opening form

आता पूर्वीप्रमाणे जुन्या खातेदाराची ओळख घेऊन खाते उघडले जात नाही. खातेदाराने आपली स्वत:ची ओळख ही कागदपत्राद्वारे करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वत:चे फोटो असलेले कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, तसेच नोकरदार असल्यास त्यांचे ओळख पत्र ही स्वतःची ओळख दर्शवणारी कागदपत्रे लागतात .

विमलताई आपल्या सूनेला घेऊन बँकेत आल्या होत्या. बँक   अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी आपल्या सूनेची ओळख करून दिली. शाखा अधिकारी म्हणाले, ‘‘ताई , यांना मी ओळखतो. लग्नाला आलो होतो.’’ विमलताई म्हणाल्या,‘‘ ही स्नेहा तिचे आपल्या येथे बचत खाते उघडायचे आहे. त्याच प्रमाणे तिच्या नव्या व्यवसायासाठीचेही एक स्वतंत्र खाते काढायचे आहे. माझे बचत खाते आहेच. माझी ओळख घ्या.’’ त्यावर शाखा अधिकाऱ्यांनी विमलताईंना थांबवले आणि सांगितले, ‘‘आता पूर्वीप्रमाणे जुन्या खातेदाराची ओळख घेऊन खाते उघडले जात नाही. खातेदाराने आपली स्वत:ची ओळख ही कागदपत्राद्वारे करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वत:चे फोटो असलेले कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, तसेच नोकरदार असल्यास त्यांचे ओळख पत्र ही स्वतःची ओळख दर्शवणारी कागदपत्रे लागतात. सोबत राहण्याच्या पत्त्यांच्या पुराव्यासाठी रहिवासी दाखला, वीज बिल अशी काही कागदपत्रे लागतात. त्यासोबत पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागतात.’’ त्यावर विमलताई म्हणाल्या, ‘‘आम्ही काही कागदपत्रे आणली आहे. पण त्यात स्नेहाच्या माहेरच्या आडनावांची अधिक आहेत. त्यामुळे लग्नपत्रिका व विवाहनोंदणी प्रमाणपत्रही आणले आहे.’’  शाखा अधिकाऱ्यांनी त्यांना खाते उघडण्याचा अर्ज दिला. तो स्नेहाने भरला. तो भरताना आलेल्या अडचणीही त्यांनी सोडवल्या. त्याचवेळी त्यांचे स्नेहाची कागदपत्रे तपासण्याचे काम एका बाजूला सुरू होते. कागद पत्रांमध्ये तिचे आधारकार्ड, पॅन कार्ड, दोन फोटो, लग्न पत्रिका व विवाह प्रमाणपत्र यांचा समावेश होता. आधारकार्डावरील पत्ता माहेरचा होता.  नवीन पत्ता विवाह प्रमाणपत्रावर आला होता. त्याशिवाय येथील राहण्याचा पत्ता व विजेचे बिलही होते. ही सर्व कागदपत्रे पाहून, ती योग्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मूळ कागदपत्रे पाहिल्यानंतर त्याच्या प्रती घेतल्या. त्यावर सह्या घेतल्या.  अर्जावरही सर्व जागी सह्या व्यवस्थित झाल्या असल्याची खात्री करून घेतली. त्यांनी बचत खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू केली. बचत खात्याचे पासबूक तयार करून दिले. या खात्याचे चेक बूक व ए. टी. एम. कार्ड घरच्या पत्त्यावर येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी व्यवसायासाठी वेगळे चालू खाते (CurrentAccount) सुरू करावे लागते. आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्राची यादी दिली. सोबत त्याचाही अर्ज दिला.

तुमच्या ग्राहकांना ओळखा  (केवायसी) ची मार्गदर्शक तत्त्वे 

  • आपला ग्राहक जाणून घ्या (केवायसी) ही ग्राहकांची ओळख सत्यापित करण्याची प्रक्रिया आहे. 
  • पैशांची अफरातफर करणाऱ्या गुन्हेगारी स्वरुपांच्या लोकांना त्यापासून रोखणे, बॅंकांच्या सोयींचा गैरवापर होण्यापासून रोखणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे
  •  बँक यातून त्यांचे ग्राहक आणि त्यांचे आर्थिक व्यवहार समजून घेण्यास सक्षम केली जाते. त्यातून त्यांची सेवा अधिक चांगली होईल.
  • ओळख कागदपत्रे 
  •  बचत खाते 
  • वैयक्तिक खाते, प्रोप्रायटर, संयुक्त खाते यातील प्रत्येकासाठी, मग ते स्वत:, भागीदार, सह खातेदार, संचालक, ट्रस्टी, एकत्र कुटुंबकर्ता या सर्वासाठी ,
  • पासपोर्ट आकाराचे दोन सध्याचे फोटो 
  • याबरोबर खालील पैकी कोणत्याही एका कागदपत्र मूळप्रत तपासणीसाठी व त्याच्या स्वसाक्षांकीत प्रती सादर करणे आवश्यक  असते.

  • पासपोर्ट,
  • पॅन कार्ड,
  •  मतदार ओळखपत्र (व्होटर आयडेंटी कार्ड) ,
  • ड्रायव्हिंग लायसन्स,
  • मनरेगा ने दिलेले जॉब कार्ड,
  • आधार कार्ड 
  • नोकरदारसाठी असलेले ओळखपत्र (आयडेंडीटी कार्ड),
  • विद्यार्थ्यांचे ओळखपत्र.
  • ब. मालकी हक्क फर्म खाते  ( Proprietorship Firm) साठी चालू खाते (Current Account)  वर  अनु.क्र. १ मध्ये नमूद केलेली कागदपत्रे याशिवाय,

  • बँकेच्या नमुन्यामध्ये मालकी हक्क पत्र 
  • याशिवाय खालील पैकी कोणतीही दोन कागदपत्रे :
  •  मालकीहक्क फार्म नोंद पत्र
  • शॉप  अॅक्ट
  •  आयकर रिटर्न 
  •  सेवा व वस्तू कर दाखला ( GST नंबर )
  •  वीज बील, पाणी बील, टेलिफोन बील 
  • भागीदारी फर्म (Partnership Firm) वर  अनु.क्र. १ मध्ये नमूद केलेली कागद पत्रे याशिवाय,

  • भागीदारी पत्र (बँकेच्या नमुन्यात )
  • नोंदणी पत्र /दाखला,
  • ट्रस्ट, कंपनी , सोसायटी, क्लब, असोसिएशन, हिदू अविभाज्य कुटुंब यासाठी वेगवेगळी कागदपत्रे हे खाते उघडण्यासाठी द्यावी लागतात. त्याची माहिती संबंधित बँकेकडून मिळू शकते.
  • - अनिल महादार, ८८०६००२०२२  

    (निवृत्त सहायक महाप्रबंधक, बॅंक ऑफ इंडिया)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com