Agriculture Agricultural News Marathi article regarding opening of bank account | Agrowon

खातेदाराची ओळख

अनिल महादार
शनिवार, 18 एप्रिल 2020

आता पूर्वीप्रमाणे जुन्या खातेदाराची ओळख घेऊन खाते उघडले जात नाही. खातेदाराने आपली स्वत:ची ओळख ही कागदपत्राद्वारे करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वत:चे फोटो असलेले कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, तसेच नोकरदार असल्यास त्यांचे ओळख पत्र ही स्वतःची ओळख दर्शवणारी कागदपत्रे लागतात.

आता पूर्वीप्रमाणे जुन्या खातेदाराची ओळख घेऊन खाते उघडले जात नाही. खातेदाराने आपली स्वत:ची ओळख ही कागदपत्राद्वारे करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वत:चे फोटो असलेले कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, तसेच नोकरदार असल्यास त्यांचे ओळख पत्र ही स्वतःची ओळख दर्शवणारी कागदपत्रे लागतात.

विमलताई आपल्या सूनेला घेऊन बँकेत आल्या होत्या. बँक 
 अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी आपल्या सूनेची ओळख करून दिली. शाखा अधिकारी म्हणाले, ‘‘ताई , यांना मी ओळखतो. लग्नाला आलो होतो.’’ विमलताई म्हणाल्या,‘‘ ही स्नेहा तिचे आपल्या येथे बचत खाते उघडायचे आहे. त्याच प्रमाणे तिच्या नव्या व्यवसायासाठीचेही एक स्वतंत्र खाते काढायचे आहे. माझे बचत खाते आहेच. माझी ओळख घ्या.’’

त्यावर शाखा अधिकाऱ्यांनी विमलताईंना थांबवले आणि सांगितले, ‘‘आता पूर्वीप्रमाणे जुन्या खातेदाराची ओळख घेऊन खाते उघडले जात नाही. खातेदाराने आपली स्वत:ची ओळख ही कागदपत्राद्वारे करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वत:चे फोटो असलेले कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, तसेच नोकरदार असल्यास त्यांचे ओळख पत्र ही स्वतःची ओळख दर्शवणारी कागदपत्रे लागतात. सोबत राहण्याच्या पत्त्यांच्या पुराव्यासाठी रहिवासी दाखला, वीज बिल अशी काही कागदपत्रे लागतात. त्यासोबत पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागतात.’’
त्यावर विमलताई म्हणाल्या, ‘‘आम्ही काही कागदपत्रे आणली आहे. पण त्यात स्नेहाच्या माहेरच्या आडनावांची अधिक आहेत. त्यामुळे लग्नपत्रिका व विवाहनोंदणी प्रमाणपत्रही आणले आहे.’’ 

शाखा अधिकाऱ्यांनी त्यांना खाते उघडण्याचा अर्ज दिला. तो स्नेहाने भरला. तो भरताना आलेल्या अडचणीही त्यांनी सोडवल्या. त्याचवेळी त्यांचे स्नेहाची कागदपत्रे तपासण्याचे काम एका बाजूला सुरू होते. कागद पत्रांमध्ये तिचे आधारकार्ड, पॅन कार्ड, दोन फोटो, लग्न पत्रिका व विवाह प्रमाणपत्र यांचा समावेश होता. आधारकार्डावरील पत्ता माहेरचा होता.  नवीन पत्ता विवाह प्रमाणपत्रावर आला होता. त्याशिवाय येथील राहण्याचा पत्ता व विजेचे बिलही होते. ही सर्व कागदपत्रे पाहून, ती योग्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मूळ कागदपत्रे पाहिल्यानंतर त्याच्या प्रती घेतल्या. त्यावर सह्या घेतल्या.  अर्जावरही सर्व जागी सह्या व्यवस्थित झाल्या असल्याची खात्री करून घेतली. त्यांनी बचत खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू केली. बचत खात्याचे पासबूक तयार करून दिले. या खात्याचे चेक बूक व ए. टी. एम. कार्ड घरच्या पत्त्यावर येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी व्यवसायासाठी वेगळे चालू खाते (CurrentAccount) सुरू करावे लागते. आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्राची यादी दिली. सोबत त्याचाही अर्ज दिला.

तुमच्या ग्राहकांना ओळखा 
(केवायसी) ची मार्गदर्शक तत्त्वे 

 • आपला ग्राहक जाणून घ्या (केवायसी) ही ग्राहकांची ओळख सत्यापित करण्याची प्रक्रिया आहे. 
 • पैशांची अफरातफर करणाऱ्या गुन्हेगारी स्वरुपांच्या लोकांना त्यापासून रोखणे, बॅंकांच्या सोयींचा गैरवापर होण्यापासून रोखणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे
 •  बँक यातून त्यांचे ग्राहक आणि त्यांचे आर्थिक व्यवहार समजून घेण्यास सक्षम केली जाते. त्यातून त्यांची सेवा अधिक चांगली होईल.
 • ओळख कागदपत्रे 
 •  बचत खाते 
 • वैयक्तिक खाते, प्रोप्रायटर, संयुक्त खाते यातील प्रत्येकासाठी, मग ते स्वत:, भागीदार, सह खातेदार, संचालक, ट्रस्टी, एकत्र कुटुंबकर्ता या सर्वासाठी ,
 • पासपोर्ट आकाराचे दोन सध्याचे फोटो 

याबरोबर खालील पैकी कोणत्याही एका कागदपत्र मूळप्रत तपासणीसाठी व त्याच्या स्वसाक्षांकीत प्रती सादर करणे आवश्यक  असते.

 • पासपोर्ट,
 • पॅन कार्ड,
 •  मतदार ओळखपत्र (व्होटर आयडेंटी कार्ड) ,
 • ड्रायव्हिंग लायसन्स,
 • मनरेगा ने दिलेले जॉब कार्ड,
 • आधार कार्ड 
 • नोकरदारसाठी असलेले ओळखपत्र (आयडेंडीटी कार्ड),
 • विद्यार्थ्यांचे ओळखपत्र.

ब. मालकी हक्क फर्म खाते  ( Proprietorship Firm) साठी चालू खाते (Current Account) 
वर  अनु.क्र. १ मध्ये नमूद केलेली कागदपत्रे
याशिवाय,

 • बँकेच्या नमुन्यामध्ये मालकी हक्क पत्र 
 • याशिवाय खालील पैकी कोणतीही दोन कागदपत्रे :
 •  मालकीहक्क फार्म नोंद पत्र
 • शॉप  अॅक्ट
 •  आयकर रिटर्न 
 •  सेवा व वस्तू कर दाखला ( GST नंबर )
 •  वीज बील, पाणी बील, टेलिफोन बील 

भागीदारी फर्म (Partnership Firm)
वर  अनु.क्र. १ मध्ये नमूद केलेली कागद पत्रे
याशिवाय,

 • भागीदारी पत्र (बँकेच्या नमुन्यात )
 • नोंदणी पत्र /दाखला,
 • ट्रस्ट, कंपनी , सोसायटी, क्लब, असोसिएशन, हिदू अविभाज्य कुटुंब यासाठी वेगवेगळी कागदपत्रे हे खाते उघडण्यासाठी द्यावी लागतात. त्याची माहिती संबंधित बँकेकडून मिळू शकते.

 

- अनिल महादार, ८८०६००२०२२  

(निवृत्त सहायक महाप्रबंधक, बॅंक ऑफ इंडिया)

 

   


इतर अॅग्रोमनी
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा...शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स)...
‘जीआय’प्राप्त उत्पादनांच्या ब्रँडिंगवर...नाशिक : भारतीय शेतीमाल व खाद्यपदार्थांना जगभर...
ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादन...सध्या शेतकरी कायद्यामध्ये बदल झाल्यानंतर करार...
जळगावच्या सुवर्ण बाजाराला झळाळीजळगाव ः शुद्धता, सचोटीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
सोयाबीनची चाल पाच हजारांकडे  पुणे ः देशांतर्गत बाजारातील कमी आवक, शिकागो बोर्ड...
बेदाणा दरात सुधारणासांगली ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून...
नाईक सूतगिरणीचा कंटेनर निघाला चीन,...पुसद, जि. यवतमाळ : लॉकडाउन काळात पिंपळगाव कान्हा...
बांगलादेशच्या वस्त्रोद्योगात चीनची मोठी...जळगाव ः भारतीय कापसाचा सर्वांत मोठा खरेदीदार...
साखर निर्यात यंदा ठरणार फायदेशीरकोल्हापूर : साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या...
सांगलीत हळदीची उलाढाल २८० कोटींनी घटलीसांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तांदळाची विक्रमी निर्यात होणार पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस...
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात...जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार...नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या...
डाळींच्या दरात दहा टक्के वाढ मुंबई : पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता...
जागतिक कापूस उत्पादन घटणार; ...जळगाव ः जागतिक कापूस उत्पादन नव्या म्हणजेच २०२०-...