लेयर कोंबड्यांसाठी संतुलित आहार

कोंबड्यांना संतुलित खाद्य नियोजन करावे. शुद्ध आणि स्वच्छ पाणी द्यावे.उत्पादन आणि वाढीसाठी खाद्याचा वापर पुरेसा आहे की नाही, हे ठरवण्यासाठी कोंबड्यांचे वजन तपासावे.
poultry farming
poultry farming

कोंबड्यांना संतुलित खाद्य नियोजन करावे. शुद्ध आणि स्वच्छ पाणी द्यावे.उत्पादन आणि वाढीसाठी खाद्याचा वापर पुरेसा आहे की नाही, हे ठरवण्यासाठी कोंबड्यांचे वजन तपासावे.

लेयर कोंबड्यांमध्ये २६ ते ४० आठवड्यांतील कालावधी हा सर्वोच्च अंडी देणारा कालावधी समजला जातो. या कालावधीत उत्पादन ९० टक्क्यांवर असते. म्हणून या कालावधीतील व्यवस्थापन योग्यरीतीने करणे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरते.

सर्वोच्च अंडी उत्पादनाच्या कालावधीची उद्दिष्टे

  • ९५ टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन साध्य करणे.
  •  व्यवस्थापनातील चढउतार आणि समस्या टाळून सर्वोच्च उत्पादन टिकविणे.
  • अंड्याचा आकार सरासरी आकार ५४ ते ५८ ग्रॅम दरम्यान असावा.
  • दररोज खाद्याचा वापर ११५ ते १२० ग्रॅम असावा.
  • १४ आठवड्यांच्या कालावधीत एकूण मरतुक दोन टक्क्यांपेक्षा जास्त नसावी.
  • कोंबड्यांची गुणवत्ता     २६ आठवड्यांच्या वयाच्या कोंबड्यांचे शरीराचे वजन सुमारे १५५० ग्रॅम आणि ४० आठवड्यांच्या वयात १६०० ग्रॅम असावे.     अति चरबी टाळण्यासाठी कोंबड्यांचे आकारमान योग्य असावे. 

    पोषण

  •     सर्वोच्च अंडी उत्पादन मिळेपर्यंत किंवा योग्य वजन साध्य होईपर्यंत कोंबड्यांना शिफारशीत खाद्य पुरवावे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी खाद्य द्यावे. 
  •     उत्पादन आणि वाढीसाठी खाद्याचा वापर पुरेसा आहे की नाही हे ठरविण्यासाठी कोंबड्यांचे वजन तपासावे. साधारणपणे लेयर कोंबड्यांचे वजन अत्यंत कमी वेगाने वाढत असते. क्रमश: वजन घटणे हा पोषणतत्त्वे अपुऱ्या प्रमाणात असल्याचा संकेत आहे. याकडे लक्ष दिले नाही तर उत्पादनामध्ये नुकसान होऊ शकते. 
  •     अंड्यांचा आकार नियंत्रित करण्यासाठी आणि नफ्यात जास्तीत जास्त भर करण्यासाठी शेवटच्या काही आठवड्यांत आहारातील प्रथिने कमी करू शकतो. यासाठी अनेक खाद्य मिश्रणे उपलब्ध आहेत. 
  •     खूप गरम हवामानाच्या वेळी कोंबड्यांना अंडी उत्पादन आणि अंड्यांचा आकार योग्य राखण्यासाठी रात्रीच्या वेळी आहार देणे फायदेशीर आहे.
  • प्रकाशाची गरज

  •  दिवसाच्या प्रकाशासह जास्तीत जास्त १६.५ तास द्यावा. 
  •  कोणत्याही परिस्थितीत प्रकाश कमी करू नका.
  •  उन्हाळ्याच्या महिन्यांत कमी प्रकाश राखला जाऊ शकतो.
  • उन्हाळ्यात खाद्य खाण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रकाश सकाळी आणि संध्याकाळी विभागून द्यावा.
  • अंड्यांचा आकार 

  • अंड्यांचे आकारमान सतत काळजीपूर्वक पहावे. जर २६ आठवड्यांनंतरही कोंबडीची अंडी ५२ ग्रॅमच्या खाली असतील, तर खाद्य नियोजनात बदल करावेत. 
  • शक्यतो सिंथेटिक मेथिओनिन जोडून फीडमध्ये तज्ज्ञांच्यासल्याने मेथिओनिनची पातळी वाढवावी.
  • खाद्यामध्ये अतिरिक्त चरबी देऊन फॅटी ॲसिडची पातळी वाढवावी. 
  • फीडमध्ये १० टक्क्यांपर्यंत पॉलिश केलेला तांदूळ खाद्यामध्ये वापरावा. 
  • अंडी आकारांत सुधारणा करण्यासाठी सोया तेलाचा शिफारशीत प्रमाणात वापर करावा. 
  • आरोग्य व्यवस्थापन 

  • संतुलित खाद्य नियोजन करावे. कोंबड्यांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी द्यावे.  
  • उन्हाळ्यात सोडिअम बायकार्बोनेट आणि जीवनसत्त्व सीचा शिफारशीनुसार वापर करावा. 
  • असंतुलित खाद्यामुळे ओटीपोटात जास्त प्रमाणात चरबी वाढते. चरबीच्या समस्येमुळे ओव्हिडक्टची लवचिकता कमी होईल. याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे संतुलित आहार महत्त्वाचा आहे.  
  • - डॉ. सतीश मनवर,  ९७३०२८३२१२ (स्नातकोत्तर पदव्युत्तर व पशुविज्ञान संस्था, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com