Agriculture Agricultural News Marathi article regarding poultry management. | Agrowon

कोंबड्यांमधील उष्माघातावरील उपचार

डॉ. गणेश काळुसे
शनिवार, 10 एप्रिल 2021

उन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी थंड वेळेत द्यावे. छत थंड ठेवण्याकरिता  गवताचे आच्छादन करावे. शक्‍य असल्यास छतावर व पडद्यावर पाण्याचे फवारे  दिवसातून ३ ते ४ वेळेस द्यावेत.

उन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी थंड वेळेत द्यावे. छत थंड ठेवण्याकरिता  गवताचे आच्छादन करावे. शक्‍य असल्यास छतावर व पडद्यावर पाण्याचे फवारे  दिवसातून ३ ते ४ वेळेस द्यावेत.

कोंबड्यांना अनेक कारणांमुळे ताण येतो. परंतु, सर्वांत जास्त ताण उन्हाळ्यात येतो. साधारणतः ३५ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत कोंबड्यांना विशेष ताण येत नाही. परंतु, उन्हाळ्यात तापमान यापेक्षा खूप अधिक वाढते. अशा वेळी शेडमध्ये भरपूर खेळती हवा असणे आवश्‍यक असते. छत थंड ठेवण्याकरिता छतावर गवताचे आच्छादन करावे. शक्‍य असल्यास छतावर व पडद्यावर पाण्याचे फवारे (फॉगर्स) दिवसातून ३ ते ४ वेळेस द्यावेत.

खाद्य देण्याच्या वेळा 

  •  उन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी थंड वेळेत द्यावे. 
  •  सकाळच्या वेळी कोंबड्यांच्या शरीरात ऊर्जानिर्मिती २० ते ७० टक्के कमी असते. खाद्याद्वारे निर्माण होणारी ऊर्जा ही थंड वेळेत केवळ दोन तासांपर्यंत परिणाम दर्शविते, तर वातावरणातील तापमान हे ३५ अंश सेल्सिअस किंवा अधिक असताना हा परिणाम १० तासांपर्यंत असतो म्हणजेच केवळ खाद्य थंड वेळेत दिले तरी आपण ताण बराच कमी करू शकतो.

शेड 
  शेड पूर्व-पश्‍चिम असावी. यामुळे हवा खेळती राहते. कोंबड्यांना प्रत्यक्ष उन्हापासून संरक्षण मिळते. पोल्ट्री शेडमध्ये गर्दी टाळावी. आवश्‍यक तेवढ्या कोंबड्या ठेवाव्यात. छतावर पाण्याचे फवारे लावावेत. छत झाकून ठेवावे. पोल्ट्री शेडच्या छतावर व भिंती पांढऱ्या (चुना) रंगाने रंगवाव्यात.

औषधोपचार 

  • कोंबड्यांच्या दैनंदिन खाद्यात जीवनसत्त्व सी आणि ई यांचा वापर करावा.
  • जीवनसत्त्व ई चा वापर २५० मि. ग्रॅ. प्रति किलो खाद्य व जीवनसत्त्व सी चा वापर ४०० मि. ग्रॅम प्रति किलो खाद्य करावा. सोबतच इलेक्‍ट्रोलाइट्‌स व डेकस्ट्रोजचा वापर  आवश्‍यक आहे. कर्बोदकांऐवजी फॅटचा उपयोग खाद्यातून करावा.

औषधी वनस्पतींचा वापर

  •   ताण कमी करण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो.
  •   जीवनसत्त्वांचा पुरवठा होण्याकरिता आवळा व संत्री किंवा इतर लिंबूवर्गीय वनस्पतींचा वापर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात करावा.

  आवळा : १०-२० ग्रॅम प्रति १०० कोंबड्या. 
  संत्री/ लिंबू : ३०-४० ग्रॅम प्रति १०० कोंबड्या. 
  लिंबू किंवा संत्र्याची सालदेखील उपयुक्त आहे. 

  • औषधोपचारामध्ये अश्‍वगंधा ४ ग्रॅम, तुळस ४ ग्रॅम,मंजिष्ठा,४ ग्रॅम, शतावरी ५ ग्रॅम यांचा वापर करावा. या सर्व वनस्पती एकत्र करून खाद्यातून १०० कोंबड्यांसाठी वापराव्यात. 
  • पाण्यातून वापर करताना वरील वनस्पतींमध्ये चार पट पाणी मिसळून उकळाव्यात.अर्धे पाणी राहिल्यानंतर द्रावण गाळून हा अर्क १० ते १५ मि.लि. प्रति १०० कोंबड्यांना द्यावा.

- डॉ. गणेश काळुसे,  ९०११०२१२८०
(विषय विशेषज्ञ(पशू संवर्धन व दुग्धव्यवसाय) 
कृषी विज्ञान केंद्र , बुलडाणा)

 


इतर कृषिपूरक
डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी...अळिंबी उत्पादनामुळे उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनसततच्या पावसाचा मोठ्या जनावरांना त्रास होत नसला,...
तेलबिया पिके अन् मधमाशीपालनामध्ये संधीसर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे...
कोंबडीखाद्यामधील मायकोटॉक्सिन्सवर...मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग...
मत्स्य संवर्धनामध्ये चांगली संधीमत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
वासरांसाठी योग्य प्रमाणात जंतनाशकाची...जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे  ...
शेळीपालनातील महत्त्वाची सुत्रेशेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय...
जनावरांतील कॅल्शिअम विषबाधेवर उपाययोजनासंकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले...
वासरांच्या आहारात काफ स्टार्टरचा वापरपशुपालकाला गोठ्यामध्ये जातिवंत वासरांची उत्तम...
शेळी व्यवस्थापनाच्या पद्धतीशेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त...
कांदळवन संवर्धनातून रोजगारनिर्मितीकांदळवन हे एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्याजवळील...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती असून,...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
कोंबड्यांना वेळेवर लसीकरण महत्त्वाचे...कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे....
पशुपालन सल्लापावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
जंतनाशकाप्रती प्रतिकार तयार होण्याची...जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
ओळखा जनावरांतील जंताचा प्रादुर्भाव...जंताची प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची...