आरोग्यदायी कलिंगड

कलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून जीवनसत्त्व ब-१, ब-२, ब-६, फोलेट आणि नियासिन कमी प्रमाणात असतात. तसेच पोटॅशिअम, लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस यासारखे इतर खनिज पदार्थ असतात.
watermelon
watermelon

कलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून जीवनसत्त्व ब-१, ब-२, ब-६, फोलेट आणि नियासिन कमी प्रमाणात असतात. तसेच पोटॅशिअम, लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस यासारखे इतर खनिज पदार्थ असतात. 

  • फळ चरबी आणि कोलेस्टेरॉलपासून मुक्त आहे. कलिंगडात जास्त प्रमाणात लाइकोपीन आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात.
  • बियांमध्ये सेपोनिन्स, टॅनिन्स, ट्रायटरपेनोइड्स आणि ग्लायकोसाइड्स आणि अल्कालाईइड्स सारखे फायटोकेमिकल्स असतात. टॅनिनमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. बियांमध्ये आढळणारे अल्कलॉइड्स आणि ग्लायकोसाइड्स आरोग्यासाठी फायदेशीर असते. अल्कलॉइड्समध्ये वेदनाशामक आणि ग्लायकोसाइड्समध्ये अतिसारविरोधी गुणधर्म असतात.
  • रस 

  • कलिंगड गरापासून रस काढला जातो. तसेच चव व इतर गुणधर्म सुधारण्यासाठी कलिंगडाचा रस अननसाच्या रसात मिसळला जातो. कलिंगडाचा रस अनुक्रमे ७५:२५ च्या प्रमाणात बीट रसासोबत मिसळला जाऊ शकतो. 
  • रेफ्रिजरेशनद्वारे नैसर्गिक कलिंगडाच्या रसाचा साठवण कालावधी वाढविता येतो. सोडियम बेंझोएट ०.१ टक्के, पाश्‍चरायझेशन प्रक्रिया आणि रेफ्रिजरेशनद्वारे (४ ते १५ अंश सेल्सिअस तापमानात) कलिंगडाचा रस तीन महिन्यापर्यंत साठविता येतो.
  •  - डॉ. नितीन सुरडकर,९६६५२५९६१५ (सहाय्यक प्राध्यापक, एमआयटी अन्नतंत्रज्ञान  महाविद्यालय, औरंगाबाद)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com