Agriculture Agricultural News Marathi article regarding rural development. | Agrowon

नॉलेज-कॉलेज-व्हिलेज' योजनेचा आराखडा

डॉ. कैलास बवले
शुक्रवार, 15 मे 2020

‘नॉलेज- कॉलेज- व्हिलेज' सहयोगी योजना ही मागणी तत्त्वावर किंवा मागणी आधारित योजना असल्याचे ज्या गावातून आणि ज्या महाविद्यालयातून या योजनेस मागणी येईल, त्याच गावांचा महाविद्यालयांच्या सहयोगाने त्यांच्या वैधानिक कामाचा भाग म्हणून ही योजना राबविण्याची आहे.

‘नॉलेज- कॉलेज- व्हिलेज' सहयोगी योजना ही मागणी तत्त्वावर किंवा मागणी आधारित योजना असल्याचे ज्या गावातून आणि ज्या महाविद्यालयातून या योजनेस मागणी येईल, त्याच गावांचा महाविद्यालयांच्या सहयोगाने त्यांच्या वैधानिक कामाचा भाग म्हणून ही योजना राबविण्याची आहे.

ग्राम विकासाच्या किंवा कोणत्याही कल्याण योजना या पुरवठा आधारित व शिखराकडून पायथ्याकडे  अशा पद्धतीने राबविल्या जात असल्याने त्यांच्या राबविण्यात आणि परिणामकारकतेमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे आल्याचे दिसून येते. उदा. योजना तयार होताना त्यामधील विविध पातळ्यांवरील अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचे हितसंबंध निर्माण होतात. त्यातून प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत योजना झिरपत असताना तिचा खरा लाभार्थी लाभापासून दूरच रहातो. अलीकडच्या काळात डिजिटल क्रांती आणि  ऑनलाइन प्रक्रियेच्या आग्रहामुळे यात आता बदल घडत आहे. ही अत्यंत आशादायक स्थिती निर्माण होत आहे. 

या पार्श्‍वभूमीवर `नॉलेज- कॉलेज- व्हिलेज' सहयोगी योजना ही मागणी तत्त्वावर किंवा मागणी आधारित योजना असल्याचे ज्या गावातून आणि ज्या महाविद्यालयातून या योजनेस मागणी येईल, त्याच गावांच्या महाविद्यालयांच्या सहयोगाने त्यांच्या वैधानिक कामाचा भाग म्हणून ही योजना राबविण्याची आहे. गाव आणि महाविद्यालयांच्याकडील उपलब्ध संसाधने (आर्थिक, नैसर्गिक, प्रशासकीय, सामाजिक, बौद्धिक व कौशल्ये) अधिक कार्यक्षमतेने वापरून या योजनेला गती द्यायची आहे. ‘नॉलेज- कॉलेज- व्हिलेज' सहयोगी योजना ही एक प्रकारे विकास योजना आणि त्यातून उपलब्ध होणारी संसाधने अधिक कार्यक्षमतेने वापरण्यासाठी तयार होत आहे. 

मागणी आधारित अंमलबजावणी आराखडा
ॲग्रोवनमध्ये  गेली चार महिने प्रसिद्ध होत असलेल्या `आमचं गाव- आमचा विकास' या लेखमालेस राज्यस्तरावर चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वच जिल्ह्यातील विविध पातळ्यांवरील लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, मंत्रिमहोदय, प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, विद्यार्थी, गावातील सकारात्मक विचाराचे ग्रामस्थ, युवक, युवती यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांच्या मागणीनुसार हा प्रथम टप्प्याच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्यात येत आहे. या प्रथम टप्प्यात सहभागी करण्यात आलेले महाराष्ट्रातील जिल्हे, विद्यापीठे, महाविद्यालये आणि ग्रामपंचायती निवड करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील समाविष्ट जिल्हे
लातूर, सांगली, उस्मानाबाद, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, सोलापूर, नगर, कोल्हापूर, रायगड, अमरावती, बुलढाणा, नांदेड, नागपूर, परभणी, वाशिम, बीड, जालना, चाळीसगाव, सातारा, औरंगाबाद, पुणे. 

समाविष्ट विद्यापीठ

 •  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
 •  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
 •  मुंबई विद्यापीठ.
 • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
 • पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
 •  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
 •  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
 • संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती
 •  गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
 •  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

उपक्रमशील गावांमध्ये योजना
 लेखमाला वाचून महाराष्ट्रातील ज्या  गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यातील प्रत्यक्ष योजनेत सहभागी होण्याची तीव्र इच्छा ज्यांनी व्यक्त केली तसेच योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग देण्याचा भूमिका व्यक्त केली अशा सकारात्मक विचारांच्या आणि आपल्या गावांच्या विकासाची तळमळ असणाऱ्या उर्जावान ग्रामस्थ, युवा, ग्रामअधिकार असणाऱ्या गावांचा त्यांच्या मागणीनुसार या प्रथम टप्प्याच्या ‘ज्ञानग्राम' चळवळीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये पहिल्या टप्यात पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, कोकण, विदर्भातील निवडक तीस गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 • महाविद्यालये आणि विद्यापीठ यांच्याशी चर्चाकरुन जिल्हानिहाय गावांची निवड त्या गावातील विकासाची तळमळ असणाऱ्या व्यक्तींच्या मागणीनुसार करण्यात येईल. 
 • ग्रामविकासासाठी सुशिक्षित, सकारात्मक विचारांच्या तरुणांचा दबावगट किंवा यालाच आपण ज्ञानग्रामासाठीची "ग्रामविकास परिषद'' असे नाव दिले आहे. अशा प्रकारचे संघटन किंवा ग्रामविकासासाठीचे सामुहिक युवा नेतृत्व तयार करण्याची प्राथमिक  जबाबदारी ही गावातील विकास करण्याची तळमळ असणाऱ्या व्यक्ती आणि  ग्रामपंचायत पदाधिकारी यांची संयुक्त राहणार आहे.  ग्रामविकासामध्ये सहभागी होण्यासाठी काही गावांनी इच्छा दर्शविली आहे. त्यांचा समावेश ‘ज्ञानग्राम' चळवळीत  करण्यात येत आहे. 
 • जिल्हानिहाय संबंधित गावांची यादी आणि त्या गावांच्या शाश्‍वत विकासाबाबत जबाबदारी घेणाऱ्या व्यक्ती, व्यक्तीसमूह, युवक, संस्था, ग्रामपंचायत पदाधिकारी यांचाही विचार यामध्ये करण्यात आला आहे. 
 •  सदर प्राथमिक निवड ही संबंधित गावाच्या मागणीनुसार आहे. मात्र अंतिम निवड प्रक्रिया शाश्‍वत ग्रामविकास केंद्राने निर्माण केलेल्या निवड चाचणी व निकषांच्या पूर्तीनंतरच करण्यात येईल.

 - डॉ. कैलास बवले, ८८८८८९२७५७
(समन्वयक, डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्‍वत ग्रामविकास केंद्र, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे)

 

 


इतर ग्रामविकास
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी...
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...