Agriculture Agricultural News Marathi article regarding rural development in Hasta Village,Dist.Aurangabad | Agrowon

प्रत्येक कुटुंब अन ्गाव आत्मनिर्भर करण्याचा ध्यास

संतोष मुंढे
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

ध्यास, प्रयत्न, चिकाटीचा संगम झाल्याने हस्ता गावाची शाश्‍वत विकास आणि गावातील प्रत्येक कुटुंब आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

ध्यास, प्रयत्न, चिकाटीचा संगम झाल्याने हस्ता गावाची शाश्‍वत विकास आणि गावातील प्रत्येक कुटुंब आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील अतिशय प्रयोगशील हस्ता गाव. या गावची लोकसंख्या सुमारे २३०० च्या आसपास. गावात ग्रामपंचायतीसाठी सरपंचासह दहा सदस्य निवडले जातात. नियोजनपूर्वक कामाचा ध्यास घेत एकीने प्रयत्न व चिकाटीची जोड देत ग्रामस्थ २०१२ मध्ये एकत्र आले, ते त्या वेळी निवडलेल्या सदस्यातून सरपंच झालेल्या मनोहर निळ यांच्या नेतृत्वात. पहिल्या पाच वर्षांच्या कालावधीतच त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि शासनाच्या मदतीने ग्रामविकासाची पायाभरणी केली. कालबद्ध कार्यक्रम आखला. गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या हाताला गावात काम मिळावे, ते जे काम करतील त्याचा त्यांना मोबदला मिळावा, कुटुंबातील प्रत्येक जण आनंदी जीवन जगला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू केली. 

कृषी विभाग, नाबार्ड, जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग, लुपिन फाउंडेशन आदींच्या सहकार्याला ग्रामस्थांचा लोकसहभाग, श्रमदानाची जोड देऊन, कृषी, शिक्षण, आरोग्य, वनविकास, जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, पूरक उद्योग आदींच्या माध्यमांतून गावकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्न मिळवून देण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे. मनोहर निळ यांनी पाच वर्षांत सरपंच म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे ग्रामस्थांनी २०१७ मध्ये ग्रामपंचायत बीनविरोध केली आणि त्यांच्या पत्नी वंदना मनोहर निळ यांना सरपंचपदी निवडले. वंदनाताईंनी पतीकडून मिळालेला जनसेवेचा वारसा २०१७ पासून अविरत सुरू ठेवला.

लुपीन फाउंडेशन व नाबार्डच्या सहकार्यातून अलीकडेच गावात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली आहे. गावचे उपसरपंच तथा प्रयोगशील शेतकरी सर्जेराव आव्हाळे शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष आहेत. १५ मुख्य व जवळपास १५० वर भागधारक असलेल्या या कंपनीने प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रीत करून शेतकऱ्यांना थेट बाजापेठेशी जोडले आहे.  

- सौ. वंदना मनोहर निळ,९८२२११११०५ 
(सरपंच,  हस्ता, ता. कन्नड, जि. औरंगाबाद)

 


इतर ग्रामविकास
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
कारले म्हणावे तर टाकरखेडचेच’बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेड गाव कारले पिकासाठी...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
शेती, पूरक उद्योगावर दिला भरकुडाळ तालुक्यातील पूर्व भागात आमचे निरुखे हे...
महिला सक्षमीकरणातून होतो ग्राम विकाससामर्थ्य संपन्न ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी...
पाणीपुरवठा, जलपुनर्भरणाच्या कामांना आता...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या...
उच्चशिक्षित महिला सरपंचांनी गावात पेरला...नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मोहगावच्या...
लोक सहभाग हाच विकासाचा पायाकुटुंबाचा विकास म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचा...
ग्राम स्वच्छता, प्रयोगशील शेतीला चालनालोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे ...
पाणलोटाच्या मदतीनं केली दुष्काळावर मातजालना जिल्ह्यातील कायम दुष्काळी नंदापूर गावच्या...
गावामध्ये असावी संयुक्त कुरण व्यवस्थापन...शेती परिवार कल्याण संस्था गावशिवारातील माळरानावर...
गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्नतीन वर्षांपासून मनारखेड गावाचे सरपंचपद सांभाळत...
शिक्षण, कृषी, ग्रामविकासामध्ये ‘समता...नाशिक जिल्ह्यातील येवल्यासारख्या दुष्काळी...
दुष्काळी मजले एकीतून झाले बागायतीकायम दुष्काळी असलेले मजले (ता. हातकणंगले. जि....
प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...