दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन तंत्रज्ञान

अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स सॉर्डेड सीमेन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. जनावरांमध्ये ९० टक्के अचूकतेसह अनेक देशांमध्ये व्यावसायिकपणे हे तंत्रज्ञान वापरले जाते. या तंत्रज्ञानातून जातिवंत दुधाळ जनावरे पशुपालकांच्या गोठ्यामध्ये तयार होतील.
cow
cow

अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स  सॉर्डेड सीमेन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. जनावरांमध्ये ९० टक्के अचूकतेसह अनेक देशांमध्ये व्यावसायिकपणे हे तंत्रज्ञान वापरले जाते. या तंत्रज्ञानातून जातिवंत दुधाळ जनावरे पशुपालकांच्या गोठ्यामध्ये तयार होतील.

अन्नसुरक्षेच्या मागणीत वाढ आणि आहारातील प्रथिनांचे महत्त्व लक्षात घेऊन पशुपालनाकडे अधिक महत्त्व देण्यात येत आहे. मांस, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी जागतिक स्तरावर वाढली आहे; या मागणीची पूर्तता करण्यासाठी, जनावरांच्या शाश्वत उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग सर्व स्तरावर वाढला आहे. दूध उत्पादनात जास्तीत जास्त वाढ व्हावी, यासाठी दुधाळ गाईंचे संगोपन केले जाते. यासाठी जातीवंत दुधाळ गाई, कालवडी गोठ्यात कशा तयार होतील, यावर भर देणे गरजेचे आहे. पशुपालनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पूर्व-लैंगिक शुक्राणू (Pre Sexed Sperm) किंवा भ्रूण मध्यस्थीकृत (Embryo mediated) पशूधन उत्पादन; तसेच इतर जीनोमिक, प्रोटीमिक आणि फिनोमिक्स तंत्रज्ञानाद्वारे पशू उत्पादनाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी प्रजनन धोरण जाहीर केले आहे.अलीकडच्या काळात सेक्‍स सॉर्डेड सीमेन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. जनावरांमध्ये ९० टक्के अचूकतेसह अनेक देशांमध्ये व्यावसायिकपणे हे तंत्रज्ञान वापरले जाते. उपलब्ध तंत्रज्ञानामध्ये शुक्राणूंच्या नियंत्रणापेक्षा उत्पादन खर्च, अंमलबजावणी आणि गर्भधारणेच्या संदर्भात काही अडथळे आहेत. मात्र शुक्राणूचे नुकसान न करता आणि अचूकतेसह तंत्र किंवा साधनांचा विकास केल्यास या तंत्रज्ञानाची प्रगती आणखी वेगवान होईल.

फ्लो सायटोमीटर पद्धती 

  •  फ्लो सायटोमीटर हे प्रगत असून, ते पेशींना वेगळे करण्यासाठी वापरले जाते. फ्लुरोसेंटडायला उत्तेजित करण्यासाठी लेसर वापरतात. जे शुक्राणूजन्य डीएनएला वेगळा रंग देते. शुक्राणूमध्ये असणारे डीएनएचे प्रमाण आणि विशिष्ट डीएनए डाय हेच फ्लो सायटोमीटरचे शुक्राणू विभक्त करण्याचे प्रमुख तत्त्व आहे.
  • X गुणसूत्र असणाऱ्या शुक्राणूमध्ये अधिक डीएनए प्रमाण असल्यामुळे, ते Y गुणसूत्र असणाऱ्या शुक्राणूपेक्षा जास्त रंग घेते. या रंगाच्या आधारावर, शुक्राणूजन्य X किंवा Y गुणसूत्र वर्गीकृत केले जाते. 
  • गर्भधारणेचे प्रमाण

  • पहिल्या वितात येणाऱ्या जनावरात पूर्वलैंगिक वीर्यासह सेक्‍स सॉर्टटेड सीमेनचे गर्भधारणेचे प्रमाण सुमारे ७० ते ८० टक्के आणि दुसऱ्या व तिसऱ्या वितात येणाऱ्या गायींमध्ये ५० ते ६० टक्के आहे. म्हणून, दुसऱ्या व तिसऱ्या वितात येणाऱ्या गायींमध्ये अधिक गर्भधारणा दर मिळविण्यासाठी जास्त संख्येने बीजारोपण आणि गर्भदान डोस वापरणे आवश्यक आहे.
  • सेक्‍स सॉर्डेड सीमेनची मूलभूत तत्त्वे 

    सस्तन प्राण्यांमध्ये लिंग निर्धारण काटेकोरपणे गुणसूत्र करत असते. संततीचे लिंग (sex of offspring) संपूर्ण शुक्राणूद्वारे निश्चित केले जाते. 

  • नर दोन प्रकारचे शुक्राणू तयार करतो. अर्धा X- गुणसूत्र (X-शुक्राणू) आणि उरलेला अर्धा Y- गुणसूत्र (Y-शुक्राणू) आणि मादीद्वारे तयार केलेला अंडाशयामध्ये नेहमीच X- गुणसूत्र ठरवतो.  म्हणून, Y-शुक्राणूद्वारे अंडाशयाचे गर्भादान केल्याने एक नर (XY) तयार होते आणि X-शुक्राणूद्वारे गर्भाधानानंतर मादी (XX) तयार होते. 
  • पूर्व-लैंगिक शुक्राणूचा व्यावहारिक दृष्टिकोन म्हणजे विशिष्ट लिंग असलेल्या शुक्राणूंची संख्या वेगळी करणे आणि कृत्रिम रेतन करण्यासाठी वापरणे. हे फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्याला शुक्राणूमधला X आणि Y मधील फरक लक्षात आलेला असेल. 
  • आजपर्यंत नोंदविलेल्या X आणि Y गुणसूत्रांमधील मुख्य फरक म्हणजे डीएनएचे प्रमाण. शुक्राणूमध्ये असणाऱ्या  X गुणसूत्रांमधील डीएनएचे प्रमाण हे दुसऱ्या शुक्राणुमध्ये असणाऱ्या Y गुणसूत्रांमधील जास्त असते. काहीमध्ये शुक्राणूजन्य आकार म्हणजेच  X शुक्राणू Y शुक्राणूपेक्षा मोठा असतो.  
  • तंत्रज्ञानाची मर्यादा

  • प्रक्रिया खर्च जास्त असल्यामुळे कृत्रिम रेतन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेत मात्रेची किंमत वाढते.
  • यंत्रणेचा वापर आणि देखरेखीसाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे.
  • या तंत्रज्ञानाने मादी वासरू जन्मण्याची शक्यता ९० टक्यांपर्यंत वाढवते; परंतु गर्भदानाच्या किमतीत वाढ होते.  
  • भविष्यातील संधी 

  • नवीन तंत्रज्ञानाने सेक्स-सॉर्ट केलेली रेतमात्रा येत्या काळात अपेक्षित किमतीमध्ये मिळू शकते. 
  •  लवकरात लवकर लिंग निर्धारण केल्याने चांगला वळू किंवा गायींच्या निवडक व्यवस्थापनाची काळजी घेतली जाऊ शकते. व्यवस्थापनात होणारा खर्च कमी केला जाऊ शकतो. अनुवांशिक प्रगती गतीने होते.
  •  - डॉ. शिवाजी वाघ, ८६००४६७३७९ (पीएचडी स्कॉलर, पशू अनुवांशिकी विभाग, भारतीय पशू संशोधन संस्था, बरेली, उत्तरप्रदेश)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com