मूल्यवर्धनाची संधी असलेले पीक ः सोयाबीन

आपल्याला सोयाबीन मूल्यवर्धनामध्ये मोठा टप्पा गाठणे गरजेचे आहे. सोयाबीन दूध, प्रोटीन पावडर ,पौष्टिक पूरक आहार अशा विविध प्रक्रिया पदार्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे.
soyabean
soyabean

आपल्याला सोयाबीन मूल्यवर्धनामध्ये मोठा टप्पा गाठणे गरजेचे आहे. सोयाबीन दूध, प्रोटीन पावडर ,पौष्टिक पूरक आहार अशा विविध प्रक्रिया पदार्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे. उत्कृष्ट पोषणमूल्य असलेले सोयाबीन  हे पीक शेतकऱ्यांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाले.  महाराष्ट्रामध्ये मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. चांगला बाजारभाव मिळवून देणारे हे पीक आहे.   मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान ही सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असणारी राज्ये आहेत. देशांतर्गत सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेशचा वाटा ४५ टक्के आणि महाराष्ट्राचा वाटा ४० टक्के एवढा आहे. राज्याचा विचार करता लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, जालना, बीड, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वाशीम, वर्धा, सातारा, नगर, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, जळगाव हे सोयाबीन उत्पादनातील प्रमुख जिल्हे आहेत.  अजुनही पारंपरिक बाजारपेठांमधील मध्यस्थ आणि व्यापाऱ्यांमार्फत सोयाबीनची विक्री साखळी आहे. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर सोयाबीनच्या किमती अवलंबून असतात. असे असून देखील बाजार भावावर परिणाम  करणाऱ्या घटकांची खात्रीशीर माहिती निर्देशांक उपलब्ध नाहीत. यामध्ये मोठ्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

संशोधन आणि विकास

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी येथे सोयाबीन संशोधन केंद्र कार्यरत  आहेत. या केंद्रांमार्फत आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार तसेच सुधारित जाती प्रसारित केल्या जातात. मुख्यत्वे सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्थापन, हवामान बदल, कीड व रोग नियंत्रणाबाबत  संशोधन केले जाते. अजूनही आपल्याला सोयाबीन मूल्यवर्धनामध्ये मोठा टप्पा गाठणे बाकी आहे.  सोयाबीन दूध, प्रोटीन पावडर ,पौष्टिक पूरक आहार अशा विविध प्रक्रिया पदार्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे. विविध अन्नपदार्थांची पौष्टिकता वाढविण्यासाठी फोर्टीफिकेशनसाठी सोयाबीनला चांगली मागणी आहे. परंतु अद्यापही तंत्रज्ञान विकासाच्या दृष्टीने शासकीय किंवा खाजगी स्तरावर फारसे प्रयत्न दिसून येत नाही.

पायाभूत सुविधा आणि त्रुटी 

  • सोयाबीन पिकासाठी सुनियोजित विक्री आणि मूल्यवर्धन साखळी अद्यापही विकसित झालेली नाही. पुरेशी साठवण सुविधा उपलब्ध नाही, परिणामी  मिळेल त्या दरामध्ये उत्पादकाला सोयाबीनची विक्री करणे भाग पडते. 
  • उत्पादक शेतकरी विखुरलेला तर सोयाबीनचे मध्यस्थ, व्यापारी संघटित आहेत. काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीन खरेदी, साठवणुकीसाठी काही प्रमाणात प्रयत्न झाले परंतु त्यांची व्याप्ती कमी क्षेत्रापुरती आहे.  
  • अनेक सुधारित जाती विकसित झालेल्या असल्या तरी  बियाणे न  उगवल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. दुबार पेरणीचे मोठे संकट उत्पादकांसमोर आहे.  यामुळे बियाणे उत्पादक  कंपन्या आणि बीज प्रमाणीकरण तपासणी यंत्रणेसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अशा घटना उत्पादक शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचविणाऱ्या आहेत.
  • शेतकरी कंपन्यांची भूमिका

    सोयाबीन लागवड ते विक्री व्यवस्थापनात सध्या कोणतीही शेतकरी उत्पादक कंपनी कार्यरत नाही. नव्याने स्थापन झालेल्या उत्पादक कंपन्यांसमोर पायाभूत सुविधा  उभारण्याचे आव्हान आहे. लागवड क्षेत्रात उत्पादक कंपनी स्थापन करून सोयाबीनचे मूल्यवर्धन आणि विक्री साखळी सुनियोजित संघटनात्मक पद्धतीने उभारण्यास मोठा वाव आहे.  

    - विजयकुमार चोले, ९१३००३५०६९,

    (उपाध्यक्ष, सातारा मेगा फूड पार्क) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com