Agriculture Agricultural News Marathi article regarding soyabean seed germination testing. | Agrowon

उगवणशक्ती तपासूनच तयार ठेवा सोयाबीन बियाणे

डॉ. विलास खर्चे, डॉ. सतीश निचळ, मंगेश दांडगे
गुरुवार, 30 एप्रिल 2020

 खरीप २०२० साठी शासनाने पायाभूत व प्रमाणित बियाणेसंदर्भात ६५ टक्केपर्यंत उगवणशक्तीचे बियाणे वापरण्यास परवानगी दिलेली आहे. यामुळे गत खरीप हंगामामधील  चांगले सोयाबीन आपण बियाणे म्हणून वापरू शकतो. 

 खरीप २०२० साठी शासनाने पायाभूत व प्रमाणित बियाणेसंदर्भात ६५ टक्केपर्यंत उगवणशक्तीचे बियाणे वापरण्यास परवानगी दिलेली आहे. यामुळे गत खरीप हंगामामधील  चांगले सोयाबीन आपण बियाणे म्हणून वापरू शकतो. 

राज्यात मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये अवकाळी आणि वादळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे व बीजोत्पादनाचे मोठे नुकसान झाले. त्याच प्रमाणे विविध बीजोत्पादन संस्था उदा. महाबीज, राष्ट्रीय बीज महामंडळ, कृषि विद्यापिठांच्या बियाण्यांचे नुकसान झाले आहे. परिणामी येत्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासू शकते. या अडचणीवर मात करण्यासाठी  यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनाने पायाभूत व प्रमाणित बियाणेसंदर्भात ६५ टक्केपर्यंत उगवणशक्तीचे बियाणे वापरण्यास परवानगी दिली आहे. यामुळे गत खरीप हंगामामधील  चांगले सोयाबीन आपण बियाणे म्हणून वापरू शकतो. 

 • आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरता येईल.
 • सोयाबीन चाळणीने गाळून त्याची उगवणक्षमता घरच्या घरीच तपासावी. उगवणक्षमता ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे. उगवणक्षमता  तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्यास (६० टक्के पर्यंत), जितकी उगवणक्षमता कमी असेल (७० टक्के पेक्षा ) अंदाजे तितके किलो बियाणे पेरणीसाठी जास्त वापरावे.  
 • सोयाबीन बियाण्याचे आवरण (सीड कोट) हे अत्यंत पातळ, नाजुक तसेच सछीद्र असते. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या दाण्यांनी जास्त प्रमाणात आर्द्रता शोषून घेतली. परिणामी त्यात रोगांचे प्रमाण वाढले असेल. त्यामुळे त्यांची उगवणक्षमता तपासून जे सोयाबीन बियाणे म्हणून वापरायचे आहे, त्याला कार्बोक्सीन (३७.५%) अधिक थायरम (३७.५%) २ ते ३ ग्रॅम प्रती किलो या प्रमाणे संयुक्त बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. नवीन पोत्यात हवेशीर संरक्षित कोठारात साठवावे. बुरशीनाशक लावलेल्या बियाण्याची धान्य म्हणून विक्री करू नये. साठवणूक करताना दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १० टक्केपेक्षा जास्त नसावे.
 • बियाणे साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोते ठेवावे. बियाण्याला ओल लागणार नाही, बियाणे खराब होणार नाही. 
 • बियाण्याची साठवणूक करताना, जास्तीत जास्त ५ पोत्याची थप्पी मारावी. त्यापेक्षा जास्त उंच थप्पी लावल्यास तळाच्या पोत्यातील बियाण्याची डाळ होऊन उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.  
 • बियाणे पोत्यात साठवताना चारही बाजूने हवा खेळती राहील, अशा रितीने ठेवावे. अन्यथा गोदामाच्या आत गरम जागा (हॉट स्पॉट) तयार होईल, बियाण्याची उगवणशक्ती लवकर कमी होते. 
 • बियाणे साठवणूक करण्याचे ठिकाण थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा, पण त्यासाठी कूलरचा वापर करू नये. अन्यथा बियाण्याची आर्द्रता वाढेल. बियाणे खराब होऊ शकते.
 • आवश्यकतेनुसार भांडाराची साफसफाई व आवश्यकता पडल्यास कीडनाशकांची फवारणी करावी.

उगवणशक्ती तपासण्याची घरगुती पद्धत 

 • घरच्या सोयाबीनच्या  प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर धान्य बाहेर काढावे. सर्व पोत्यातील काढलेले धान्य एकत्र करून घ्या.  गोणपाटाचे ६ चौकोनी तुकडे करून स्वच्छ धुऊन घ्यावेत. एक तुकडा जमिनीवर पसरावा. 
 • पोत्यामधून काढलेल्या धान्यातून सरसकट १०० दाणे,दीड ते दोन सेंमी अंतरावर (बोटाचे एक कांड अंतरावर) १०-१० च्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवा. अशा प्रकारे १०० दाण्याचे तीन नमुने तयार करावेत. 
 • गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओला करावे. बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरूण पुन्हा चांगले पाणी शिंपडावे.गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यासकट गोल गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा. त्यावर अधून-मधून पाणी शिंपडून ओले ठेवावे.
 • ६ ते ७ दिवसांनंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरवून उघडा, चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा व मोजा. तिन्ही गुंडाळ्याची सरासरी काढून शंभर दाण्यापैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर आपले बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे असे समजावे. शिफारशीप्रमाणे ते आपल्याला पेरणीसाठी वापरता येते. जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या तुलनेने ७० पेक्षा कमी म्हणजेच ६० पर्यंत असेल तर  बियाण्याचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करा. 
 • मात्र, साठ टक्क्यांपेक्षा उगवणक्षमता कमी असल्यास ते बियाणे पेरणीसाठी वापरू नका. 

- डॉ. सतीश निचळ, ९४२३४७३५५०

 (सोयाबीन पैदासकार आणि प्रमुख, प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती)
 

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...