Agriculture Agricultural News Marathi article regarding spice crops. | Agrowon

व्यवस्थापन मसाला पिकांचे

डॉ. वैभव शिंदे,डॉ. सुनील घवाळे
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

नारळ, सुपारी बागेत अतिशय चांगल्या प्रकारे मसाला पिकांची वाढ होते. या पिकांची लागवडीपासून योग्य काळजी घेतल्यास अपेक्षित गुणवत्तापुर्ण उत्पादन मिळते.

नारळ, सुपारी बागेत अतिशय चांगल्या प्रकारे मसाला पिकांची वाढ होते. या पिकांची लागवडीपासून योग्य काळजी घेतल्यास अपेक्षित गुणवत्तापुर्ण उत्पादन मिळते.

जायफळ  

 • कोकण सुगंधा, कोकण स्वाद, कोकण श्रीमंती आणि कोकण संयुक्ता या जातींची लागवड करावी. या जातींचे चांगले उत्पादन मिळते.
 • सध्या लागवड केलेल्या रोपांवर पावसाळा संपल्यानंतर सावली करावी. 
 • जायफळ कलमे /रोपे पाण्याचा ताण सहन करू शकत नाही. यासाठी योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करावा. ठिबक सिंचनाव्दारे प्रति कलम प्रति दिन ३० लिटर पाणी द्यावे. 
 • झाडाच्या बुंध्याजवळ आच्छादन करावे. 
 • सुरुवातीच्या काळात कलमांच्या उंचीपेक्षा अधिक उंचीचा आधार देणे आवश्‍यक आहे. 

काळी मिरी 

 • पन्नियूर-१ ही जात अर्ध सूर्यप्रकाशात चांगली उत्पादन देते. 
 • पाण्याच्या ताणापासून मिरी वेल जपावेत. नियमित पाणी द्यावे. फळांचे घोस उंदीर, खार, सरडे खाणार नाहीत, गळ होणार नाही यांची काळजी घ्यावी. 
 • नवीन लागवडीला सावली करावी. प्रति वेलाला १० लिटर प्रति दिन ठिबक सिंचनाव्दारे पाणी द्यावे. 
 • जलद आणि हळुवार मर तसेच इतर रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेलीवर  १ टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी. तसेच १ मीटर उंचीपर्यंत वेलीवर १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी. रोगट पाने व मेलेल्या वेली जाळून टाकाव्यात. (ॲग्रेस्को शिफारस)
 • बुशपेपर मिरीची जोपासना करताना बुंध्यामध्ये तण येणार नाही याची काळजी घ्यावी. 

 ऑलस्पाईस  
सुकलेली फळे आणि पाने मसाल्यात वापरली  जातात. 
वाढीच्या टप्यातील रोपांना पाण्याच्या ताण देऊ नये. 
रोपांना आधार द्यावा. बुंध्यात आच्छादन करावे. 

लवंग  

 • मसाल्यात वापरली जाणारी लवंग म्हणजे झाडावरची कळी अवस्था. पूर्ण वाळलेल्या कळ्या काढून उन्हात वाळवल्या की लवंग तयार होते. 
 • या पिकास कडक उन्हाचा त्रास होतो. रोपे लहान असताना त्यावर सरळ ऊन पडले तर पाने करपतात, खोड काळे पडून खराब होते. म्हणून नवीन लागवड केलेली रोपे  तसेच वाढीच्या टप्यात असलेल्या झाडांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली करावी. 
 • पाण्याचा ताण पडणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. अन्यथा पाने गळतात, फांद्या सुकतात. प्रत्येक दिवशी प्रति झाड सरासरी २० ते २५ लिटर ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. 

कोकम 

 • कोकम अमृता आणि कोकम हातीस या जातींची लागवड करावी. 
 • कोकम हातिस जातीची फळे मोठी, जाड साल आणि गर्द लाल रंगाची आहेत. प्रति झाडापासून १५० किलो फळे मिळतात. हे मादी झाड असल्याने परागीकरण व फलधारणेसाठी कोकमाचे नर कलम किंवा ५ ते ६ टक्के रोपे बागेत लावणे गरजेचे आहे. 
 • कोकम अमृता जातीची फळे मध्यम आकार, जाड साल आणि आकर्षक लाल रंगाची आहेत. प्रति झाड १४० किलो उत्पादन मिळते. 
 • सध्या वाढीच्या टप्यातील झाडांच्या बुंध्यात आच्छादन करावे. पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.

 ः ०२३५२ - २५५०७७
(प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, 
भाटये, जि. रत्नागिरी)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर मसाला पिके
व्यवस्थापन हळद पिकाचेसध्या हळद लागवड होऊन सात महिन्यांचा कालावधी (२१०...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
आले पिकावरील कंदमाशीचे व्यवस्थापनआले पिकामध्ये कंदमाशी, खवले कीड, खोडकिडा, फुलकिडे...
ओळखा हळदीवरील किडींचा प्रादुर्भाव...सध्या हळद पीक फुटवे आणि गड्डे तयार होण्याच्या...
व्यवस्थापन मसाला पिकांचेनारळ, सुपारी बागेत अतिशय चांगल्या प्रकारे मसाला...
हळदीची पाने पिवळी पडण्याची समस्या अन्...सध्या काही भागात हळदीची पाने पिवळे पडण्याची...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
हळदीला द्या शिफारशीत खतमात्रापावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा अभ्यासून पाणी...
तंत्र कारळा लागवडीचे...कारळ्याची पेरणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यापासून ते...
काळीमिरीची लागवड मिरी लागवडीसाठी आधाराच्या झाडांपासून किमान ४५ सें...
साठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...
कढीपत्त्याची व्यावसायिक लागवड फायदेशीरकढीपत्याचे शास्त्रीय नाव ‘मुर्रया कोइनिगी’ आहे....
काळी मिरी काढणी तंत्रज्ञानविविध पदार्थांच्या निर्मितीमध्ये मिरीचा वापर केला...
योग्य परिपक्वतेला करा पिकांची काढणीपिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करण्यासाठी...
हळदीची पॉलिशिंग, प्रतवारी करणे...हळदीची विक्री उघड लिलाव पद्धतीने होत असल्याने...
व्यवस्थापन दालचिनीचे...वाढीच्या टप्यात असलेल्या दालचिनी कलमांना आधार...
व्यवस्थापन मसाला पिकांचे...मिरी वेल आणि जायफळास पुरेसे पाणी आणि खत...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीहळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत...
दालचिनीची वेळेवर काढणी महत्त्वाचीदालचिनी झाडाची साल ही मसाल्यात दालचिनी म्हणून...