Agriculture Agricultural News Marathi article regarding stem borer in sugarcane | Agrowon

नियंत्रण उसावरील खोडकिडीचे

डॉ. भैय्यासाहेब  गायकवाड
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

सुरू उसाला फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. उसाची लागवड फेब्रुवारीच्या पुढे केल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

सुरू उसाला फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. उसाची लागवड फेब्रुवारीच्या पुढे केल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

उसावर पाच प्रकारच्या खोड किडी येतात. त्यात खोड किडा, शेंडा खोड किडा, दोन कांड्यामधील खोड किडा व मुळाजवळील खोडावर येणारा खोड किडा यांचा समावेश आहे. उसाच्या उगवणीनंतर मोठ्या बांधणीपर्यंत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. खोडकिडीचा प्रादुर्भाव उगवणीनंतर झाल्यास ऊस मरतो. वाळलेल्या पोंग्यावरून ही कीड ताबडतोब ओळखता येते.

ओळख
मादी पतंग पानाच्या खालील बाजूस पुंजक्यात एका रेषेत पांढरी, लांब गोलाकार सपाट अशी सुमारे ३०० ते ४०० अंडी घालते. 
अंडी उबविण्यासाठी ३ ते ६ दिवसांचा कालावधी लागतो. अंड्यातून बाहेर आलेल्या अळीचा रंग पिवळसर पांढरा असतो. तिच्या अंगावर जांभळ्या रंगाचे पाच पट्टे असतात. अळी अवस्था नुकसान करणारी असून तिचा कालावधी २२ ते ३१ दिवसांचा असतो. 
कोषाचा रंग पिवळसर तपकिरी असून कोषाचा कालावधी ५ ते ९ दिवसांचा असतो. कोष जमिनीलगत पोंग्यात असतो. 
पतंगाचा कालावधी ४ ते ५ दिवस असतो. 
खोडकिडीचा जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी ३५ ते ५१ दिवस लागतात. 

नुकसानीचा प्रकार  
अंड्यातून बाहेर पडलेली अळी १७ ते १८ तास पानावर फिरते. नंतर ती उसाच्या सुरळीतून अगर जमिनीलगत असलेल्या खोडात शिरते. आतील भागावर उपजीविका करते. त्यामुळे उसाचे पोंगे वाळतात व मूळ ऊस मरतो. 
उसाला फुटवे फुटतात. फुटव्यावरसुद्धा ही अळी उपजीविका करते. खोडकिडीमुळे उत्पादनात २२ ते ३३%, साखर उताऱ्यात १२ % व गुळाच्या उत्पादनात २७% घट येते. 

व्यवस्थापनाचे उपाय 
मशागतीय पध्दती

 • जमिनीची खोल नांगरट करावी. 
 • लागवड पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने करावी. त्यामुळे कीडनाशकांची फवारणी किंवा धुरळणी करणे सोयीचे होईल. 
 • कीडग्रस्त बेणे वापरु नये. निरोगी बेण्याची लागवड करावी. 
 • ऊस लोळू देऊ नये. 
 • कांदा, लसूण, कोथींबीर व पालक ही आंतरपिके घ्यावीत, त्यामुळे मित्र कीटकांचे संवर्धन होईल. 
 • ज्वारी, गहू व मका इत्यादी पिके घेऊ नयेत, कारण या पिकावरील खोडकिडीचा प्रादुर्भाव उसावर होणार नाही. 
 • उसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा. पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे. 
 • नत्रयुक्त खतांचा शिफारशीपेक्षा जास्त वापर करू नये. 
 • खोडव्याचे खत व्यवस्थापन चांगले करावे. 
 • लागवड फेब्रुवारीनंतर करू नये.
 •  उगवणीनंतर ऊस ४५ दिवसांचा झाल्यावर बाळबांधणी करावी. खोडकिडीने निर्माण केलेली छिद्रे बंद होतील. पतंग बाहेर पडण्याचा मार्ग बंद होईल. बाळभरणी करताना फिप्रोनील दाणेदार ४ किलो प्रति एकरी या कीटकनाशकाचा लागवडीच्या खतासोबत मिसळून वापर करावा. 
 • खोडकिडीची अंडी व किडग्रस्त भाग अळ्यासह गोळा करून नष्ट करावा. 
 • खोडकिडीची अळ्या ऊस तोडणीनंतर खोडक्यात राहतात, म्हणून ऊस तोडणी नंतर लगेच नांगरणी करावी. अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. 
 • उगवणीनंतर पाचटाचे ५ टन प्रती हेक्टरी आच्छादन करावे. म्हणजे खोडकिडीच्या अळ्यांना खोडामध्ये जाताना अडथळा होईल.     

यांत्रिक पद्धती

 • खोडकिडाग्रस्त उसाचे पोंगे/ शेंडे काढून अळीसह नष्ट करावेत. 
 • किडींची अंडी / अंडीपुंज असलेली पाने गोळा करून जाळून टाकावीत किंवा जमिनीत पुरावीत. 
 • पिवळ्या चिकट सापळ्याचा वापर करावा.      

जैविक पध्दती

 • मित्र कीटक जसे क्रायसेापर्ला कार्निया, ईपीरीकॅनीया मेलॅनोल्युका, डिफा अॅफिडीव्होरा (कोनोबाथ्रा), ट्रायकोग्रामा यांचे संवर्धन करावे. 
 • खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास अंड्यावरील परोपजीवी कीटक ट्रायकोग्रामा चिलोनीस हेक्टरी ५० हजार प्रमाणे दर १० दिवसाच्या अंतराने ४ ते ६ वेळा सोडावेत. 

रासायनिक पद्धती

 • आर्थिक नुकसानीची पातळी १५ टक्के गाभे मर आहे. त्यापेक्षा अधिक प्रादूर्भाव असल्याच्या स्थितीमध्ये गरजेनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी. 
 • जमिनीत ओल असल्यास क्लोरअॅन्ट्रानिलिप्रोल (०.४ जीआर) १८.७५ किलो किंवा फिप्रोनिल (०.३ जीआर) २५ ते ३३ किलो हे दाणेदार कीटकनाशके प्रति हेक्टरी वापरावे. किंवा
 • थायामिथॉक्झाम (७५ एसजी) २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी करावी. किंवा
 • क्लोरअॅन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एससी) ३.७५ मिली किंवा 
 • क्लोरपायरिफॉस (२० ईसी) १५ ते २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

 - डॉ. भैय्यासाहेब  गायकवाड, ९४२०४५९८०८
(विषय विशेषज्ञ किटकशास्त्र,  कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, जि. बीड) 


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...