Agriculture Agricultural News Marathi article regarding subsidy for dairy business. | Agrowon

अनुदानाचा योग्य विनियोग

अनिल महादार
शनिवार, 4 एप्रिल 2020

अनुदानासाठीची बहुतांश प्रक्रिया बॅंकेमार्फतच राबवली जाते. कर्ज मंजूर झाल्यानंतर बँक त्यासाठी क्लेम पाठविते. पुढे ही सबसिडी बॅंकेकडे आल्यानंतर काही काळ बँकेतील वेगळ्या  खात्यात जमा होते. ती लगेच कर्जामध्ये जमा होत नाही. अनुदानाच्या रक्कम वगळता बाकी संपूर्ण कर्जाची परतफेड झाल्यानंतर हे अनुदान कर्ज खात्यात जमा केले जाते.

अनुदानासाठीची बहुतांश प्रक्रिया बॅंकेमार्फतच राबवली जाते. कर्ज मंजूर झाल्यानंतर बँक त्यासाठी क्लेम पाठविते. पुढे ही सबसिडी बॅंकेकडे आल्यानंतर काही काळ बँकेतील वेगळ्या  खात्यात जमा होते. ती लगेच कर्जामध्ये जमा होत नाही. अनुदानाच्या रक्कम वगळता बाकी संपूर्ण कर्जाची परतफेड झाल्यानंतर हे अनुदान कर्ज खात्यात जमा केले जाते.

माउलीच्या गोठ्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले होते. कामाची पाहण्यासाठी ते शेतावर आले होते. कोबा व गव्हाणीचे काम चालू होते. माउली काही सूचना देत होते, तेवढ्यात फोन वाजला. बॅंकेतून फोन होतो. त्यांना बोलावले होते. 
    बँकेत जाताच शाखा अधिकाऱ्यांनी बॅंकेच्या कृषी अधिकाऱ्यांना बोलावले. ते माऊलींना म्हणाले, ‘‘तुमचे १० गायींचे कर्ज प्रकरण मंजूर झाले आहे. मात्र, तुम्ही सादर केलेल्या प्रकल्प अहवालात थोडा बदल करावा लागेल. गांडूळ खत प्रकल्प व क्रीम सेपरेटर यंत्र या आणखी दोन बाबींचा समावेश या प्रकल्पात करायचा आहे. त्यामुळे प्रकल्प किंमत वाढेल. या साठी तुमची मान्यता हवी.’’  माउली म्हणाले, ‘‘तसा माझ्याकडे गोबर गॅस प्लॅंट तर आहेच. त्याला जोडूनच मला गांडूळ खताचा प्रकल्पही करायचा होताच. त्यामुळे माझी काहीच हरकत नाही.’’ 
त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी आणखी काही बाबी स्पष्ट केल्या. त्यानुसार या दूग्ध प्रकल्पास नाबार्डचे अनुदान (सबसिडी)  उपलब्ध आहे. ती अशी, 

  • १० गायीसाठी प्रत्येकी रु. १७,५००/- याप्रमाणे रु. १,७५,०००/- 
  •  वासरांच्या संगोपनासाठी प्रत्येकी रु. १७,५००/- याप्रमाणे १० वासरांसाठी रु. १,७५,०००/-, 
  • गांडूळ खत प्रकल्पासाठी रु. ६,३००/-,
  •  यंत्रासाठी (किमतीच्या २५ %) ( क्रीम सेपरेटर यंत्र) 

दुग्ध व्यवसायातील अन्य अनेक बाबीसाठी हे अनुदान उपलब्ध आहे. मात्र, आपल्या या प्रकल्पात त्यांचा समावेश नाही. हे  ऐकून माउली यांना खूपच आनंद झाला. ते म्हणाले, ‘‘या अनुदानाविषयी मला काहीच माहीत नव्हते. बरे वाटले, माझा कर्जाचा थोडा भार कमी होईल.’’  
शाखा अधिकारी म्हणाले, ‘‘हे बघा, बँकेतील कृषी अधिकारी आहेत. शासनाच्या योजनांची माहिती शेतकरी व कर्जदारांना करून देणे हे त्यांचे काम आहे. तुम्हाला अनुदानाबाबत किंवा अन्य काही अडचण आल्यास त्यांच्याशी संपर्क साधा. अनुदानासाठीची बहुतांश प्रक्रिया बॅंकेमार्फतच राबवली जाते. कर्ज मंजूर झाल्यानंतर बँक त्यासाठी क्लेम पाठविते. पुढे ही सबसिडी बॅंकेकडे आल्यानंतर काही काळ बँकेतील वेगळ्या  खात्यात जमा होते. ती लगेच कर्जामध्ये जमा होत नाही. अनुदानाच्या रक्कम वगळता बाकी संपूर्ण कर्जाची परतफेड झाल्यानंतर हे अनुदान कर्ज खात्यात जमा केले जाते. त्यानंतर कर्जखाते बंद होते.  याला ‘बॅक एंड सबसिडी’ 
म्हणतात.’’
पुढे त्यांनी कर्जाच्या व्याजाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘अनुदान ही बँकेकडे जमा असल्याने  त्या अनुदानाइतक्या रकमेवर बँक व्याज आकारत नाही. हे अनुदान कर्जखात्यात शेवटी जमा होते, त्यामुळे अनुदानाचा खरा उद्देश साध्य होतो.’’ हे सर्व  समजल्यावर माऊलींना खूप बरे वाटले. त्यांनी ते कृषी अधिकारी व शाखाधिकारी यांचे आभार मानले. कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील वेळी येताना क्रिम सेपरेटरचे कोटेशन आणण्याविषयी आठवण केली.  
सोबत दूध व्यवसायासाठी लागणारी यंत्रे पुरवठा करणाऱ्यांची यादी माउली यांना दिली. योग्य प्रकारचे तांत्रिक तपशील जाणून, योग्य दर्जाच्या यंत्राचे कोटेशन घेऊन ते बँकेत सादर करण्यास सांगितले. त्यानंतर एक शंका माउली यांनी विचारली. 
ते म्हणाले, ‘‘क्रीम सेपरेटर यंत्र कशासाठी?’’ त्यावर कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ‘‘शासनाच्या नियमाप्रमाणे दुधातील स्निग्धांश ठेवावा लागतो. आपल्या दुधामध्ये जर जास्त स्निग्धांश असल्यास तेवढे फॅट काढून त्याचा वापर अन्य उत्पादनाच्या निर्मितीसाठी करता येतो. त्यासाठी हे क्रीम सेपरेटर यंत्र आवश्यक असते. यामुळे उत्पन्नात वाढ होते.’’

 

- अनिल महादार, ८८०६००२०२२    

 (निवृत्त सहायक महाप्रबंधक, बॅंक ऑफ इंडिया)

टॅग्स

इतर कृषिपूरक
कोंबड्यांमध्ये दिसते खनिजांची कमतरताकोंबड्यांच्या आहारातील खनिजे विविध प्रकारची...
जनावरांना द्या पुरेसे खनिज मिश्रणजनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा...
शेळ्यांसाठी पौष्टिक चारा - शेवगा पालाशेळीपालन व्यवसायाचे यश हे मुख्यत्त्वे वापरलेल्या...
उष्णतेच्या लाटेत जनावरे सांभाळाजनावरे सावलीत, थंड ठिकाणी, खेळती हवा असणाऱ्या...
मत्स्यशेतीकरीता शेततळ्याची पूर्वतयारीयेत्या वर्षांत शेततळ्यामध्ये उत्तम मत्स्य उत्पादन...
जनावरांना चावणाऱ्या माशांवर नियंत्रण...लम्पी स्कीन डिसीज या आजाराच्या विषाणूचा प्रसार...
मधमाशांच्या संवर्धनासह व्यावसायिक...मधमाशांद्वारे वनस्पतीमध्ये होणारे परागीभवन व...
पशुपालक,पशुतज्ज्ञांनो आरोग्याची घ्या...जनावरांच्या गोठ्यात काम करणारे नियमित मजूर किंवा...
कासदाहाची लक्षणे ओळखा, उपचार करागाई, म्हशींना कासदाह होऊ नये यासाठी दररोज...
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
सेक्स सॉर्टेड सीमेन : पशुपालनातील नवीन...गाई विताना अधिक प्रमाणात कालवडीचा जन्म व्हावा...
मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धतीभारतामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती ही नवीन...
कलिंगडापासून बनवा जॅम,योगर्टकलिंगडामध्ये जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात...
जनावरांच्या आहारात काटे विरहीत...काटे विरहीत निवडुंगांमध्ये शुष्कपदार्थ, प्रथिने,...
हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे चारा...हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे सात ते दहा दिवसांत...
जनावरांना खुराकासोबत द्या बायपास...जनावरांना चाराटंचाईच्या काळात हवी तेवढी प्रथिने...
शेततळ्यातील मत्स्यशेतीतील अडचणीवरील...आपल्या राज्यात मत्स्यतळ्यांमध्ये मासे वाढविणे हे...
स्वच्छ दूध निर्मितीवर लक्ष द्यादूध काढण्यापूर्वी जनावरांना खरारा करावा. यामुळे...
शेळ्यांच्या सुलभ प्रजननासाठी...सुलभ प्रजनन व्यवस्थापन होण्यासाठी शेळीच्या प्रजनन...
जनावरांमध्ये दिसताहेत `लम्पी स्कीन...गडचिरोली, बीड जिल्ह्यात लम्पी स्कीन डिसीज या...