तंत्र पूर्वहंगामी ऊस लागवडीचे

लागवडीसाठी उसाचे बेणे ९ ते ११ महिने वयाचे जाड, रसरशीत, सशक्त व जोमदार असावे. डोळे पूर्ण वाढलेले व फुगीर असावेत. रोग-किडीचा प्रादुर्भाव असलेला, पाण्याचा ताण बसलेला, पांगशा फुटलेला व तुरा आलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये. तीन ते चार वर्षांतून एकदा बेणे बदल करावा.
sugar cane cultivation
sugar cane cultivation

लागवडीसाठी उसाचे बेणे ९ ते ११ महिने वयाचे जाड, रसरशीत, सशक्त व जोमदार असावे. डोळे पूर्ण वाढलेले व फुगीर असावेत. रोग-किडीचा प्रादुर्भाव असलेला, पाण्याचा ताण बसलेला, पांगशा फुटलेला व तुरा आलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये. तीन ते चार वर्षांतून एकदा बेणे बदल करावा.

महाराष्ट्रामध्ये आडसाली, पूर्वहंगामी व सुरू अशा तीन हंगामांमध्ये उसाची लागवड होते. पूर्वहंगामी  उसाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यांत करून खरीप हंगामात एक पीक किंवा हिरवळीची (ताग, धैंचा, उडीद, मूग व इतर) पिके घेता येतात. याचा फायदा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी होतो. पूर्वहंगामी उसामध्ये भाजीपाला व इतर पिके आंतरपिके म्हणून घेता येतात. त्यामुळे दीर्घकाळ जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि नैसर्गिक स्त्रोतांचा पुरेपूर वापर होतो. पूर्वहंगामी उसाची तोडणी फेब्रुवारीपूर्वी होत असल्यामुळे पिकाचा खोडवा ही चांगला येतो. त्यामुळे अपेक्षित खोडवा पीक घेण्यासाठी पूर्वहंगामी उसाची लागवड फायदेशीर ठरते.

जमीन व पूर्वमशागत

  • लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. 
  • जमिनीचा सामू ७.० ते ८.० पर्यंत असावा. 
  • अधिक उत्पादनासाठी जमिनीची पूर्वमशागत चांगली होणे आवश्‍यक असते. उसाचे पीक १२ ते १५ महिने शेतात राहत असल्यामुळे पिकाच्या जोमदार वाढीसाठी मुळे खोलवर जाऊन पसरणे आवश्‍यक आहे.
  • जमीन वाफशावर असताना, पहिली नांगरट २० ते २५ सेंमी खोल करावी. नांगरणीनंतर १५ दिवस जमीन उन्हात तापू द्यावी.
  • दुसऱ्या नांगरटीपूर्वी हेक्टरी ५० बैलगाडी किंवा १२ ते १५ ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. शेणखतामध्ये ६० किलो गंधक मिसळून समप्रमाणात पसरावे.
  • कंपोस्ट किंवा शेणखत उपलब्ध नसल्यास, अगोदर हिरवळीची पिके घ्यावीत. 
  • उभी आडवी नांगरट करून कुळवाच्या २ उभ्या आडव्या पाळ्या द्याव्यात.  
  • जमिनीच्या प्रकारानुसार रिजरच्या साह्याने सऱ्या पाडाव्यात. भारी काळ्या जमिनीत ४.५ फूट ते ५ फूट व मध्यम जमिनीत ४ फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. 
  • पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळण्यासाठी जमिनीचा उतार ०.३ ते ०.४ टक्क्यापर्यंत असणे आवश्‍यक आहे.
  • भारी जमिनीमध्ये पाण्याचा योग्य निचरा होत नाही. यासाठी पीक निघाल्यानंतर किंवा लागवडीपूर्वी, पहिल्या नांगरटीनंतर सबसॉयलर चालवावा. सबसॉयलरच्या २ तासांत ५ फूट अंतर ठेवावे. १.५ ते २ फूट खोलीपर्यंत सबसॉयलर लागतो. यामुळे जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते. तसेच मुळांच्या सान्निध्यातील क्षारांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयोग होतो. तीन ते चार वर्षांतून एकदा सबसॉयलर चालवावा.
  • जाती  एम.एस.१०००१, व्हीएसआय ०८००५ (१२१२१), कोसी ६७१, को ८६०३२, एम.एस.९०५७, कोएम ०२६५, कोव्हीएसआय ०३१०२, को ९२००५ व व्हीएसआय ४३४. 

    बेणे निवड 

  • उसाचे बेणे जाड, रसरशीत, सशक्त व जोमदार असावे. बेण्याचे वय ९ ते ११ महिने असावे. डोळे पूर्ण वाढलेले व फुगीर असावेत. बेणे रोग व कीडमुक्त असावे. 
  • पाण्याचा ताण बसलेला, पांगशा फुटलेला व तुरा आलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये. लागवडीसाठी शास्त्रशुद्ध जोपासना केलेल्या मळ्यातील बेणे वापरावीत. 
  • तीन ते चार वर्षांतून एकदा बेणे बदल करावा. 
  •  पी.व्ही.घोडके, ९८२२०१३४८२ (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ,  मांजरी (बु.), ता. हवेली, जि.पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com