Agriculture Agricultural News Marathi article regarding summer soya bean seed production. | Agrowon

उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्र

डॉ. एस. पी. म्हेत्रे, डॉ. आर. एस. जाधव, व्ही. आर. घुगे
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

गत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने बियाण्यांची उगवणशक्ती कमी राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी घरगुती पातळीवर बियाण्याच्या उपलब्धतेसाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन केल्यास उपयुक्त ठरेल.

गत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने बियाण्यांची उगवणशक्ती कमी राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी घरगुती पातळीवर बियाण्याच्या उपलब्धतेसाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन केल्यास उपयुक्त ठरेल.

सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पीक बनले आहे. खरीप २०२० मधील खरीप हंगामात ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये सोयाबीन काढणी वेळी झालेल्या पावसाने शारीरिक पक्वतेच्या अवस्थेत बियाणे भिजले. परिणामी, त्यांची उगवणशक्ती कमी राहण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी लागवडीसाठी बियाणे कमी पडण्याची शक्यता आहे. अशा वेळी उन्हाळी सोयाबीनचे बीजोत्पादन घेतल्यास दर्जेदार बियाणे उपलब्ध उपलब्ध होऊ शकेल. बीजोत्पादनासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.

जमीन : सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे. अत्यंत हलक्या जमिनीत सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन येत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त आणि रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. जमिनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असली पाहिजे.

हवामान : सोयाबीन हे पीक सूर्यप्रकाशास संवेदनशील आहे. सोयाबीन पिकासाठी समशीतोष्ण हवामान अनुकूल असते. उन्हाळी हंगामामध्ये पिकाची कायिक वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते. सोयाबीन पीक २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते. मात्र कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर फुले व शेंगा गळतात. शेंगांची योग्य वाढ होत नाही. दाण्याचा आकार कमी होतो.
वाण : पेरणीसाठी किमान ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे आवश्यक आहे. 
  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी ः एमएयूएस ७१, एमएयूएस १५८ व एमएयूएस ६१२ किंवा 
  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ः केडीएस ७२६, केडीएस ७५३ किंवा 
  जवाहरलाल नेहरू कृषी विश्‍वविद्यालय, जबलपूर ः जेएस ३३५, जेएस ९३-०५, जेएस २०-२९, जेएस २०-६९, जेएस २०-११६. 
वरील जातींपैकी खरिपात लागवड असेल, तर त्या बियाण्याची उगवणशक्ती तपासून घ्यावी. उत्तम उगवणशक्ती असलेले घरचे बियाणे स्वच्छ करून व बीज प्रक्रिया करून पेरणीसाठी वापरता येईल.

जमिनीची पूर्वमशागत : खरीप हंगामातील पिकाच्या काढणीनंतर नांगरणी करून विरुद्ध दिशेने मोगडणी करावी. नंतर पाटा मारून जमीन समतोल करावी.

बीजप्रक्रिया : सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या काळात येणाऱ्या विविध रोगांपासून बचावासाठी बीजप्रक्रिया उपयुक्त ठरते. सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झीन (३७.५%) अधिक थायरम (३७.५%) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे सोयाबीनचे कॉलर रॉट, चारकोल रॉट व रोपावस्थेतील अन्य रोगांपासून संरक्षण होते. या शिवाय बीजप्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी ८ ते १० ग्रॅम  प्रति किलो बियाणे या प्रमाणे वापर करता येतो. या बुरशीनाशकाच्या प्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत (ब्रेडी रायझोबियम) अधिक स्फुरद विरघळवणारे जिवाणू खत (पीएसबी) प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो किंवा द्रवरूप असल्यास १०० मि.लि. प्रति १० किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

पेरणीची वेळ : उन्हाळी हंगामी सोयाबीनच्या बीजोत्पादनाकरिता डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पिकाची पेरणी करावी. जर पेरणीस उशीर झाल्यास पीक फुलोऱ्यात असताना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना म्हणजेच मार्च व एप्रिल महिन्यांत जास्त तापमानामुळे फुले व शेंगा गळ होते. दाण्याचा आकार लहान राहतो. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. पेरणीवेळी किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले असल्यास पेरणी थोडी लांबवून तापमान साधारणत: १५ अंश झाल्यानंतर पेरणी करावी. कमी तापमानात पेरणी केल्यास उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागतात. 
लागवडीचे अंतर  : सोयाबीनची पेरणी ४५ × ५ सें.मी. अंतरावर व २.५ ते ३.० सें.मी.  खोलीवर करावी. पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोलीवर पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही. 
बियाण्याचे प्रमाण : सोयाबीन लागवडीसाठी हेक्टरी ६५ किलो बियाणे वापरावे. (एकरी २६ किलो).

अन्नद्रव्य व्यवस्थापन  

सेंद्रिय खते  
सोयाबीनसाठी हेक्टरी २० गाड्या (५ टन) शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. 
रासायनिक खते 

  •   सोयाबीनला हेक्टरी ३० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ३० किलो पालाश आणि २० किलो गंधक पेरणी वेळी द्यावे. पेरणी करतेवेळी खते ही बियाण्याच्या खालीच पडतील व त्यांचा बियाण्याशी सरळ संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. 
  •   गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत आवश्यक आहे. तसेच हेक्टरी २५ किलो झिंक सल्फेट आणि १० किलो बोरॅक्स द्यावे. या पिकास नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम, गंधक, कॅल्शिअम, मॉलिब्डेनम, बोरॉन, लोह, जस्त व मँगनीज ही अन्नद्रव्ये वाढीसाठी, फुलधारणेसाठी व शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात. 
  •   उन्हाळी हंगामात पाणी देण्यामध्ये खंड पडल्यास पोटॅशिअम नायट्रेटच्या दोन फवारण्या अनुक्रमे ३५ व्या व ५५ व्या दिवशी १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे कराव्यात. 
  •   पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी. 
  •   पीक २० ते २५ दिवसाचे असताना सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास, मायक्रोन्यूट्रियन्ट (ग्रेड-२) या सूक्ष्मअन्नद्रव्यांची ५० ते ७५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
  •   पीक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना १९:१९:१९ या द्रवरूप रासायनिक खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना ०:५२:३४ या द्रवरूप रासायनिक खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 

- डॉ. एस. पी. म्हेत्रे,
  ७५८८१५६२१०
- व्ही. आर. घुगे, 
 ७५८८१५६२१३
(सोयाबीन संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर कृषी शिक्षण
जैवतंत्रज्ञान विषयात करिअर संधी...जीवशास्त्र आणि त्याबरोबरच तंत्रज्ञान विषयाची आवड...
उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रगत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने...
कोडोली येथे कंपोस्ट खत निर्मिती...कोडोली (जि .सातारा) ः ग्रामीण कृषी कार्यानुभव...
कृषीकन्येने भरविले रानभाज्याचे प्रदर्शनरानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने...
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
परदेशी भाज्यांच्या लागवडीचा प्रयोगबीड येथील सौ.के.एस.के.(काकू) कृषि महाविद्यालयात...
कृषी विद्यार्थी पोहोचविताहेत नवे तंत्रपुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर...
कृषीकन्या सांगताहेत जमीन सुपिकतेचे फायदेमाळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयातील...
मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी गाईतील...दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे...
मध्यपूर्व प्रदेशातील पावसात ४० टक्के घटविविध प्रारूपाद्वारे मध्यपूर्वेतील पावसाच्या...
सूक्ष्म अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया...मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
कृषी पदवीच्या परीक्षांचा कृती आराखडा...अकोला/नाशिक ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पीक कर्जावरील व्याज आकारणीवेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....