Agriculture Agricultural News Marathi article regarding testing of animal feed. | Agrowon

पशुआहारातील घटकांची तपासणी महत्वाची

डॉ. पराग घोगळे
बुधवार, 22 जुलै 2020

आपल्याला उपलब्ध झालेला पशुआहार किंवा त्यासाठी लागणारा कच्चा माल योग्य गुणवत्तेचा आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.गाई, म्हशी व इतर जनावरांना आपण देत असलेले खाद्य, चाऱ्याची गुणवत्ता योग्य असेल तर त्यांच्या क्षमतेएवढे उत्पादन घेणे शक्य होते.

आपल्याला उपलब्ध झालेला पशुआहार किंवा त्यासाठी लागणारा कच्चा माल योग्य गुणवत्तेचा आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.गाई, म्हशी व इतर जनावरांना आपण देत असलेले खाद्य, चाऱ्याची गुणवत्ता योग्य असेल तर त्यांच्या क्षमतेएवढे उत्पादन घेणे शक्य होते.

पशुखाद्य निर्मिती कारखान्यातील तज्ज्ञ तसेच प्रगतिशील दूध उत्पादक पशू आहारातील विविध कच्चा माल, चारा, खाद्य पाणी  प्रयोगशाळेमध्ये तपासून घेऊ लागले आहेत. आपल्याला उपलब्ध झालेला पशुआहार किंवा त्यासाठी लागणारा कच्चा माल योग्य गुणवत्तेचा आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. पशू खाद्यासाठी लागणाऱ्या कच्या मालाची गुणवत्ता नेहमी तपासून पहिली जाते. त्यातील घटकांवर त्याची किंमत ठरते.

पशुआहारातील विविध घटकांचे प्रयोगशाळेत पृथक्करण केल्यास त्याची गुणवत्ता ओळखण्यास मदत होते. बनविलेले पशुखाद्य उत्पादन कारखान्यातून बाहेर पडताना त्याच्या गुणवत्तेची खात्री देता येते. गाई, म्हशी व इतर जनावरांना आपण देत असलेले खाद्य, चाऱ्याची गुणवत्ता योग्य असेल तर त्यांच्या क्षमतेएवढे उत्पादन घेणे शक्य होते. 

प्रयोगशाळेतील तपासणी मुळे तयार पशुखाद्यामध्ये दिलेल्या फॉर्म्युलेशन प्रमाणे पोषणतत्त्वे उपलब्ध होण्याची खात्री केली जाते. पशुखाद्य निर्मिती कारखान्यामध्ये  पशुखाद्य पृथक्करण प्रयोगशाळा असते. याचबरोबरीने शासकीय किंवा खाजगी प्रयोगशाळेमध्ये पशुखाद्य किंवा त्यासाठी लागणारा कच्चा माल, चारा तपासून त्यातील पोषक तत्त्वे जसे आद्रता, प्रोटीन, फॅट/ऑईल, फायबर सँड सिलिका तपासून पाहता येतो.  प्रगत तपासण्या करताना पशुआहारातील विविध घटकांमधील अफलाटॉक्सीन (बुरशीजन्य विषारी घटक), ऊर्जा (एनर्जी) , टी.डी.एन.(एकूण पचनीय पदार्थ), खनिजे (कॅल्शिअम, फॉस्फरस व इतर खनिजे) ए.डी.एफ., एन.डी.एफ.तपासून पशुखाद्याच्या गुणवत्तेची खात्री करता येते.

पशुआहारासाठी लागणाऱ्या विविध कच्चा मालाची प्रयोगशाळेबाहेरील तपासणी करताना प्रथम त्याचा रंग, आकार, एकजिनसीपणा, वास, चव, स्पर्श तसेच धान्याच्या बाबतीत विविध प्रकारची चाचणी केली जाते. प्रयोगशाळेतील पृथक्करण करताना ठरवून दिलेले नियम व अटी पाळणे बंधनकारक असते. पशू आहाराचे पृथक्करण करण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करताना प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते.

पशूखाद्य तपासणीच्या पद्धती

प्रॉक्झीमेट पृथक्करण पद्धती 

  • यामध्ये आद्रता, क्रूड प्रोटीन(प्रथिने), क्रूड फायबर (तंतुमय पदार्थ) , इथर 
  • अर्क (फॅट/ऑईल), आम्लामध्ये विरघळणारी व न विरघळणारी अॅश (राख) किंवा सॅन्ड सिलिका, नायट्रोजन मुक्त अर्क इत्यादी गोष्टींचे मूल्यमापन केले जाते.
  • पशुआहार विश्लेषण तंत्रज्ञान वापरण्यासाठी विविध उपकरणांचा वापर होतो. यामध्ये अचूक वजन मापन यंत्र (वेईंग बॅलन्स), आद्रता मापन करण्यासाठी हॉट एअर ओव्हन, टोटल अॅश किंवा राख यासाठी मफल फर्नेस, प्रथिनांसाठी  जेल्दाल उपकरणे व टायट्रेशन उपकरण,  फॅट/ऑईल साठी सॉह्क्सलेट उपकरण, फायबर पृथक्करणासाठी मस्लीन क्लॉथ पद्धत किंवा फायबर टेक पद्धत, युरियाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी डिस्टिलेशन पद्धत किंवा कलरीमेट्रिक पद्धती व उपकरणांचा वापर केला जातो. आता स्वयंचलित उपकरणेही उपलब्ध झाली आहेत. 
  • या सर्व पद्धती वापरून पशू आहाराचे पृथक्करण करून अहवाल तयार करण्यास नमुन्याच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे सुमारे तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागू शकतो.

एन.आय.आर. पृथक्करण पद्धती

  • नियर इन्फ्रा रेड स्पेक्ट्रोमेट्री यामध्ये पशू आहाराच्या नमुन्याला नियर इन्फ्रा रेड किरणांच्या ७०० ते २५०० नॅनो मीटर  तरंगलांबीला परावर्तन करून एका विशिष्ट उपकरणाद्वारे तपासणी केली असता ६ ते  १० सेकंद इतक्या कमी कालावधी मध्ये पशू आहाराचा पृथक्करण अहवाल प्राप्त होतो. 
  • या उपकरणाला वापरण्याअगोदर कॅलीब्रेशन करणे अत्यावश्यक असते. एन आय आर पद्धती सध्याच्या काळात पशुखाद्य कारखाने, पोल्ट्री खाद्य तसेच इतर अनेक क्षेत्रांमध्ये वापरले जाते.

फायबर मधील ए.डी.एफ. आणि एन.डी.एफ.पृथक्करण पद्धती 

  • व्हान सोएस्ट व इतर शास्त्रज्ञांनी या पद्धतीचा शोध लावला. गाई, म्हशींच्या कोठी पोटातील जिवाणूंना उपलब्ध होणाऱ्या पोषक तत्त्वांच्या उपलब्धतेनुसार अॅसिड डिटर्जंट फायबर व  न्युट्रल डिटर्जंट फायबर वर्गीकरण होते. 
  •  यामध्ये वनस्पतींच्या पेशीतील घटक व पेशी बाहेरील आवरणाचे पृथक्करण करतात. 

अॅटोमिक अॅबसोर्बशन स्पेक्ट्रोफोटोमीटर 

  • पशू आहारातील तसेच खनिज मिश्रणामधील खनिजे जसे की,कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, झिंक, कॉपर, सेलेनियम, पोटॅशिअम, सोडिअम यांचे प्रमाण अॅटोमिक अॅबसोर्बशन स्पेक्ट्रोफोटोमीटर या उपकरणाच्या साहाय्याने  अचूकपणे काढता येते. 
  •  हे उपकरण अतिशय संवेदनशील असून यासाठी त्या खनिजांचे प्रमाण ओळखणारा बल्ब आवश्यक असतो. याशिवाय कॅल्शियमचे प्रमाण प्रेसीपीटेशन पद्धतीने व फॉस्फरसचे प्रमाण फोटोमेट्रिक पद्धतीने काढता येते. तर इतर खनिजांचे प्रमाण कलरीमेट्रिक पद्धतीने काढता येते. 

एच पी एल सी तंत्र 

  • पशू आहारातील अफलाटॉक्सीन व जीवनसत्त्वे ओळखण्यासाठी  (एच पी एल सी) हाय परफॉर्मन्स लिक़्विड क्रोमॅटोग्राफी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कच्चा माल किंवा खाद्य निर्यात करण्यासाठी या अहवालाची आवश्यकता असते.  

- डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९

(लेखक पशुआहार व पशुधन व्यवस्थापन सल्लागार आहेत)

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स

इतर टेक्नोवन
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...
कांदा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेकांदा वाळवून कांद्याच्या फ्लेक्स, चिप्स, चकत्या,...
दुचाकीला ट्रॉलीचे जुगाड अन् सुरू झाला...बीड : शेतात सालदार म्हणून काम करणाऱ्या सचिन...
हवामान अनुकूल रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानबदलत्या हवामानामध्ये राज्यातील प्रमुख पिकांसाठी...
यांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...
पशुआहारातील घटकांची तपासणी महत्वाचीआपल्याला उपलब्ध झालेला पशुआहार किंवा त्यासाठी...
काजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...
आंतरमशागतीसाठी अवजारे ठरतात फायदेशीरतण नियंत्रणासाठी दातेरी हात कोळपे, सायकल कोळपे,...
नारळ काढणी, सोलण्यासाठी यंत्रे फायदेशीर नारळ काढणी, झावळ्यांची स्वच्छता, कीडनाशक फवारणी...
कमी खर्चातील सौर ऊर्जा आधारीत...ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी...
जांभूळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक...औषधी गुणधर्म असूनही व्यावसायिक तत्त्वावरील लागवड...
यंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्यभाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक,...
एका कुटुंबासाठी स्वयंपूर्ण शिवार वसाहतअर्धा एकर शेतजमीन (दोन हजार चौ.मी. सूर्यप्रकाश) व...
कोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी...कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीनच्या लागवडीसाठी जोळओळ...
सुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून...तेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या...
यंत्राद्वारे भात रोपांची लावणीभात लावणी यंत्राचे वॉकिंग टाईप आणि रायडींग टाईप...
भात पेरणीसाठी सुधारित यंत्रेभात लागवडीसाठी सुधारित यंत्राचा वापर फायदेशीर...