Agriculture Agricultural News Marathi article regarding tomato cropping pattern in Pune district. | Agrowon

जुन्नर तालुका झाला 'टोमॅटो क्लस्टर'

गणेश कोरे
बुधवार, 1 जुलै 2020

सिंचन सुविधा, लागवडीचे नवे तंत्र आणि जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या खुल्या खरेदी-विक्री सुविधेमुळे जुन्नर, आंबेगावसह संगमनेर हा परिसर टोमॅटो उत्पादनाचे आगार बनला आहे.

सिंचन सुविधा, लागवडीचे नवे तंत्र आणि जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या खुल्या खरेदी-विक्री सुविधेमुळे जुन्नर, आंबेगावसह संगमनेर हा परिसर टोमॅटो उत्पादनाचे आगार बनला आहे. गेल्या १५ वर्षांत वाढलेले उत्पादन आणि विक्री सुविधांमुळे नारायणांव परिसर उन्हाळी टोमॅटोचे ‘क्लस्टर' म्हणून पुढे आला आहे.

गेल्या १५ वर्षांपासून पुणे जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगावसह नगर जिल्ह्यातील संगमनेर हे तालुके टोमॅटो उत्पादनाचे हब बनले आहेत. या भागातील टोमॅटो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजारात विक्रीस येतो. येथून हा टोमॅटो देशाच्या विविध राज्यांमध्ये पाठविला जातो. काही प्रमाणात आखाती देशांमध्ये निर्यातदेखील होते. त्यामुळे नारायणगांव बाजारात दरवर्षी टोमॅटोची उलाढाल अब्जावधी रुपयांपर्यंत होते.

गेल्या काही वर्षांपासून वाढत्या सिंचन सुविधा, ठिबक आणि मल्चिंग पेपरचा वापर करत उन्हाळी टोमॅटो लागवडीचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीयेला लागवड होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूरसह नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील टोमॅटो उत्पादक नारायणगांव येथील उपबाजारावर अवलंबून आहेत. या पाचही तालुक्यांत सुमारे १० हजार हेक्टरवर टोमॅटो लागवड असते. येत्या काळात टोमॅटो प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज आहे.

उन्हाळी टोमॅटोवर भर 
टोमॅटो आणि विविध भाजीपाला लागवडीबाबत धामणखेल (ता. जुन्नर) येथील प्रयोगशील शेतकरी राजू कोंडे म्हणाले की, १५ वर्षांपूर्वी आम्ही एकत्र येऊन वडज धरणातून सहाकरी उपसा सिंचन योजना राबविली. यामुळे शिवारातील शेती बारामाही झाली. बाजारपेठेचा अंदाज घेत परिसरातील शेतकरी काकडी, टोमॅटो, दोडका, तोंडली याचबरोबरीने डाळिंब, केळी लागवडीकडे वळले. नारायणगाव येथे टोमॅटोसाठी खुली बाजारपेठ सुरू झाल्याने विविध राज्यांतील व्यापारी खरेदीसाठी येतात. या बाजारपेठेमुळे आम्ही उन्हाळी टोमॅटोची गुढीपाडवा आणि अक्षय्यतृतीयेला लागवड करतो. या पिकातून चांगला नफा शेतकरी मिळवत आहेत.

जुन्नर, आंबेगावसह शिरूर तालुक्यामध्ये उन्हाळी टोमॅटो लागवड वाढली आहे. यामुळे हा भाग टोमॅटो क्लस्टर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भाजीपाला रोपवाटिकांची संख्या वाढली आहे. जुन्नर तालुक्यात नारायणगाव, आर्वी, आळेफाटा, ओतूर परिसरातून नगर जिल्ह्यात भाजीपाला रोप विक्री होते. वाढत्या टोमॅटो आणि भाजीपाला लागवडीमुळे रोपवाटिका हा चांगला व्यवसाय शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे.’’ 
- राजेश गावडे,  
अध्यक्ष, जुन्नर आंबेगाव तालुका नर्सरी असोसिएशन. 
 

जुन्नर तालुक्यातून भायखळा, वाशी बाजार समितीमध्ये विविध भाजीपाला मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी जात असे. मात्र माळशेज, खंडाळा घाटातील कोंडीमुळे शेतमाल वाहतुकीला अडचण निर्माण झाल्याने नुकसान व्हायचे. यामुळे व्यापारी नारायणगावमध्ये कसे येतील यासाठी आम्ही प्रयत्न केला. नारायणगावमध्ये टोमॅटोचा खुला बाजार सुरू केला. दरवर्षी देशभरातून २०० खरेदीदार या बाजारपेठेत येतात. गेल्या वर्षी नारायणगाव उपबाजारात ४८ लाख ६९ हजार क्रेटची आवक झाली. सरासरी प्रति क्रेट २५० रुपये दर मिळाला, सर्वाधिक दर ६०० रुपयांपर्यंत होता. यातून सुमारे १७३ कोटींची उलाढाल झाली होती. बाजार समितीच्या वतीने शीतगृह उभारणी प्रक्रिया सुरू आहे.  
- संजय काळे, 
सभापती, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती.  

 

 

 

 

 

 


इतर अॅग्रो विशेष
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...