Agriculture Agricultural News Marathi article regarding Tractor management | Agrowon

योग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा वापर

वैभव सूर्यवंशी
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये विनातक्रार काम करणे शक्‍य होते; परंतु ट्रॅक्‍टरचा होणारा सततचा वापर व त्याच्या विविध भागांची होणारी झीज यामुळे सिलिंडर लायनर, कनेक्‍टिंग रॉड बेअरिंग्ज, मेन बेअरिंग्ज व पिस्टन रिंग बदलाव्या लागतात.

ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये विनातक्रार काम करणे शक्‍य होते; परंतु ट्रॅक्‍टरचा होणारा सततचा वापर व त्याच्या विविध भागांची होणारी झीज यामुळे सिलिंडर लायनर, कनेक्‍टिंग रॉड बेअरिंग्ज, मेन बेअरिंग्ज व पिस्टन रिंग बदलाव्या लागतात.

ट्रॅक्‍टर नेहमी एकहाती असावा.ट्रॅक्टर चालू करण्यापूर्वी इंजीन, 
 टाकीतले तेल पुरेसे आहे की नाही ते पाहावे.  पंपामधले वंगण / तेल डीप स्टीकच्या साहाय्याने तपासावे.  रेडीएटरमधील पाणी कमी झाले असेल तर ते भरावे.  एअर क्लीनर स्वच्छ करावा.  ट्रान्स्मिशन ऑईल डीपस्टीकच्या साहाय्याने तपासावे.  टायरमधला हवेचा दाब योग्य आहे ना याची खात्री करावी.  (पुढच्या चाकात ०.८ ते १.९ आणि मागच्या चाकात १,५ ते २.५ केजी सें. मी.असावा.) फॅनबेल्ट तपासावा.  ज्या ठिकाणी ग्रीस लागते असे भाग तपासावेत.  महत्त्वाचे नट आणि बोल्ट तपासावेत.  बॅटरीमधल्या पाण्याची पातळी योग्य आहे की नाही ते तपासावे.  या गोष्टी पाहून खात्री करून मगच किल्ली फिरवून  ट्रॅक्टर  चालू करावा.

 •  ट्रॅक्टर  चालू करताना पहिल्यांदा इंधन कॉक चालू करावा.  गिअर शिफ्ट लिव्हर आणि पिटीओ लिव्हर न्युट्रल पोझिशनला ठेवावा. थ्रोटल लिव्हर तीनचतुर्थांश जागेवर ठेवावी.  क्लच दाबून  ट्रॅक्टरची चावी ऑनच्या बाजूने फिरवावी.  अशा पद्धतीने ट्रॅक्‍टर चालू करावा. 
 • ट्रॅक्‍टर बंद करताना थ्रोटल लिव्हर ओढावी आणि इंजिनाची गती कमी करावी. क्लच पेडल दाबावे.  गिअर शिफ्ट लिव्हर न्युट्रल पोझिशनला ठेवावी.  मेन स्विच ऑफच्या बाजूला फिरवावे.  गरज असेल तर पार्किंग ब्रेक लावावेत.
 • ट्रॅक्‍टर चालू असताना अचानक वेगळा आणि साधारण आवाज ऐकू येऊ लागला की  ट्रॅक्टर  थांबवून कारण शोधावे.  जर इंजिनातून सतत काळा धूर निघत असेल तर त्यावरचा भर कमी करावा.  
 • ट्रॅक्‍टर गतीमध्ये असताना त्वरित गिअर बदलू नये.  मागे घेताना, अवजारे जोडताना दक्षता घ्यावी.  ड्राबर पट्टी किंवा अवजारांवर उभे राहू नये.  नेहमी क्लच हळुवार सोडवा.  रस्त्यावर चालवताना दोन्ही चाकांना ब्रेक लागतो का नाही ते तपासावे.  उतारावरून जाताना नेहेमी  ट्रॅक्‍टर  गिअरमध्ये असावा.  वळणावर ब्रेक दाबताना गती कमी करावी.  पुली गतीत असताना बेल्ट लावू अगर काढू नये.
 •  मॅन्युअलप्रमाणे  ट्रॅक्‍टरच्या सर्व्हिसिंग करून घ्याव्यात.  काही तास कामाचे झाले की सुचनेनुसार फिटरकडून  ट्रॅक्‍टरची देखभाल करून घ्यावी.  म्हणजे पुढे भविष्यात एखादा मेजर मोठा घोटाळा होत नाही.  ट्रक्टर यंत्राची आपण जशी काळजी घेऊ तसा तो आपल्याला साथ देईल.  
 • ट्रॅक्‍टरचे व्यवस्थापन हे कामाच्या तासावरून केले जाते. ट्रॅक्‍टरचा वापर करताना चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी. सर्व चाकांचे नट बोल्ट्‌स तपासून आवश्‍यकतेनुसार आवळून घ्यावेत. गिअर बॉक्‍समधील तेलाची पातळी तपासावी. ब्रेक लायनिंग स्वच्छ व व्यवस्थित बसवावे. योग्य व्यवस्थापनातून ट्रॅक्‍टरची कार्यक्षमता वाढविता येते, तसेच इंधनामध्ये बचत करणे शक्‍य आहे. 

ट्रॅक्‍टरची दुरुस्ती

 • ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये विनातक्रार काम करणे शक्‍य होते; परंतु ट्रॅक्‍टरचा होणारा सततचा वापर व त्याच्या विविध भागांची होणारी झीज यामुळे सिलिंडर लायनर, कनेक्‍टिंग रॉड बेअरिंग्ज, मेन बेअरिंग्ज व पिस्टन रिंग बदलाव्या लागतात. क्रॅंक शाफ्ट ग्राइंडिंग करून घ्यावा लागतो. तसेच व्हॉल्व्ह व व्हॉल्व्ह सीटसुद्धा बदलावे लागते. 
 • ट्रॅक्‍टरचा कोणता भाग कधी बदलावयाचा यासाठी काही ठोस असा नियम नाही. सर्वसामान्य ट्रॅक्‍टरच्या कार्याचा विचार करता एकूण ४००० तास काम केल्यानंतर इंजिनाच्या कॉम्प्रेसरमध्ये घसारा येतो व पूर्ण शक्ती तयार करण्यामध्ये इंजीन अपयशी ठरते, तसेच सिलिंडर लायनर व पिस्टन रिंग बदलाव्या लागतात. 
 • व्हॉल्व्ह, व्हॉल्व्ह सीट रिफेस करून घ्यावे लागते. याशिवाय ऑईल सील, रेडिएटर होस पाइप तसेच बुशिंगसुद्धा गरजेप्रमाणे बदलावे लागतात. तसेच कनेक्‍टिंग रॉडच्या बेअरिंगमधील क्‍लिअरन्स  तपासून ठीक करावी लागते. 
 • साधारणतः जेव्हा ट्रॅक्‍टरच्या कामाचे ८००० तास पूर्ण होतात तेव्हा क्रॅंकशाफ्ट व कॅमशाफ्टची तपासणी करावी. त्या वेळी कमी मापाचे बेअरिंग वापरावे लागते. शक्‍यतो दुसऱ्या ओव्हरहॉलिंगच्या वेळेस पिस्टन व सिलिंडर लायनर बदलावे. 
 • इंजीन ओव्हरहॉल करताना पिस्टनच्या डोक्‍यावरील रिंग वरील खाचांमधील तसेच व्हॉल्व्ह व व्हॉल्व्ह दांडीवरचा कार्बन व काळी चिकट तेलकट घाण स्वच्छ करावी व सर्व भाग केरोसीनमध्ये स्वच्छ धुऊन काढावेत. 
 •  इंजीन हेड जोडताना नवीन गॅसकेटचा वापर करावा. सिलिंडर गॅसकेटमध्ये गळती राहिल्यास तयार होणाऱ्या शक्तीचा अपव्यय होतो किंवा सिलिंडरमध्ये पाणी घुसण्याची किंवा दोहोंची शक्‍यता वाढते. 
 • बहुतांश वेळेस असे लक्षात आले आहे, की ट्रॅक्‍टरची दुरुस्ती ही होणाऱ्या मोडतोडीमुळे करावी लागते. सुगीच्या वेळी होणारी मोडतोड थांबवण्यासाठी ज्या वेळी सुगी संपते व रिकामा वेळ उपलब्ध असतो अशा वेळी ट्रॅक्‍टरची दुरुस्ती करावी. 
 • बहुतांश भाग प्रमाणाबाहेर खराब होईपर्यंत ट्रॅक्‍टरची दुरुस्ती लांबवू नये, अन्यथा अचानक होणाऱ्या मोडतोडीमुळे त्याहूनही जास्त खर्चाला सामोरे जावे लागते. 
 • सुगी सुरू होण्यापूर्वीच काही महत्त्वाचे सुटे भाग विकत घेऊन ठेवावेत म्हणजे सुगीच्या काळात सुट्या भागांच्या कमतरतेमुळे व योग्य प्रकारचा भाग न मिळाल्याने होणारा वेळेचा अपव्ययही टाळता येईल.
   

दर ८ ते १० तासांच्या कामानंतर

 • इंजिनामधील (सम्पमधील) व एअर क्लीनरमधील तेलाची पातळी तपासावी. 
 • रेडिएटर व बॅटरीमधील पाण्याची पातळी तपासावी. 
 • जर ट्रॅक्‍टरचे काम धुळीमध्ये असेल तर एअर क्लीनरमधील तेल बदलावे. 
 • डिझेल लिकेज आहे का ते पाहावे.

 दर ५० ते ६० तासांच्या कामानंतर 

 • फॅन बेल्टचा ताण योग्य प्रमाणात असल्याची खात्री करावी. 
 • गिअर बॉक्‍समधील तेलाची पातळी तपासावी. 
 • चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी. 
 • बॅटरी व मोटर यांची सर्व कनेक्‍शन घट्ट बसवावीत. 
 • इंधन फिल्टर (डिझेल फिल्टर)मध्ये साचलेले पाणी बाहेर काढावे.

दर १०० ते १२० तासांच्या कामानंतर 

 • इंजिन तेल बदलावे, तसेच बदलण्याजोगे फिल्टर्स बदलावेत. 
 • शक्‍यतो सर्वच्या सर्व ग्रीसिंग पॉइंटना वंगण द्यावे. 
 • डायनामोच्या बेअरिंगमध्ये ८ ते १० थेंब ऑईल टाकावे. 
 • पुढील चाकांमध्ये प्ले आहे का ते पाहावे व सर्व चाकांचे नट बोल्ट्‌स तपासून आवश्‍यकतेनुसार आवळून घ्यावेत. 
 • बॅटरी तपासून आवश्‍यकतेनुसार डिस्टिल्ड वॉटर भरावे.

दर २०० ते २५० तासांच्या कामानंतर  

 • ऑइल सम्प काढून स्वच्छ करून त्यात नवीन ऑईल भरावे. 
 • ऑईल फिल्टर तसेच डिझेल फिल्टर बदलावेत. 
 • स्टिअरिंग कॉलमच्या बेअरिंग ग्रीसिंग कराव्यात. 
 • ब्रेक्‍सची तपासणी करावी.

दर ४०० ते ५०० तासांच्या कामानंतर 

 • पुढील चाकाचे हब ग्रीसिंग करावे. 
 • रेडिएटरमधील पाणी काढून तो स्वच्छ करून घ्यावा. पुन्हा नवीन पाणी भरावे. 
 • क्‍लच तपासून घ्यावा. 
 • आवश्‍यकतेनुसार ब्रेक ऍडजस्ट करून घ्यावेत.

दर ७५० ते ८०० तासांच्या कामानंतर  

 • गिअर ऑईल बदलावे. 
 • ब्रेक लायनिंग स्वच्छ व व्यवस्थित बसवावे. 
 • डिझेल टाकी साफ करावी. 
 •  स्टिअरिंग बॉक्‍समधील ऑईल तपासून पाहावे.
 • दर १००० ते १२०० तासांच्या कामानंतर  
 • पुढील व मागील चाकाच्या ऍक्‍सलचे बेअरिंग्ज स्वच्छ करून पुन्हा बसवावेत. 
 • बॉश पंप व नोझल्स अधिकृत सर्व्हिस सेंटरकडून तपासून घ्यावेत. 
 • व्हॉल्व्ह सेटिंग करून घ्यावेत. 
 • स्टार्टर डायनामो व कटआऊट तपासून घ्यावेत. 
 • बॉनेट, ग्रील मडगाईड तसेच सीट तपासून पाहावे व आवश्‍यकतेनुसार दुरुस्त करून घ्यावेत.

सुगीपश्‍चात ट्रॅक्‍टरची देखभाल 

 • ट्रॅक्‍टर बाहेरून स्वच्छ पुसून घ्यावा व स्वच्छ करावा.  एअर क्‍लीनर स्वच्छ करावा.त्यामध्ये नव्याने तेल भरावे. 
 • ट्रॅक्‍टर गरम होईपर्यंत इंजीन सुरू ठेवावे,  सर्व फिल्टर्स स्वच्छ करावेत. 
 • क्रॅंककेसमधील सर्व वंगण तेल बाहेर काढावे व पुन्हा भरावे. 
 • गिअर बॉक्‍स (ट्रान्समिशन) तेल पूर्णपणे बाहेर काढावे व निर्मात्यांच्या निर्देशानुसार पुन्हा नवीन तेल भरावे. 
 • डिझेल टाकीमधील, फीड पंपामधील व डिझेल लाइनमधील सर्व डिझेल काढावे.
 • गंज प्रतिबंधक तेल प्रत्येक सिलिंडरमध्ये सोडावे. बॅटरी सोडवून व्यवस्थित बाजूला ठेवावी. 
 • चाकांना लावलेली वजने काढून चाकातील पाणी काढावे. ट्रॅक्‍टर लाकडी ठोकळ्याच्या साह्याने उचलून ठेवावा. 
 • क्‍लच वेगळा करावा.  ट्रॅक्‍टरला कव्हर घालावे. 

- वैभव सूर्यवंशी,९७३०६९६५५४,

(कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म,जळगाव)


इतर टेक्नोवन
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...
चाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...
स्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...
सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...
पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...
यांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...
विरळणी, तण काढणी करा झोपून!अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
योग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...