Agriculture Agricultural News Marathi article regarding ultrasonography in cow and buffallo | Page 2 ||| Agrowon

गाई, म्हशींच्या तपासणीसाठी अल्ट्रासोनोग्राफी तंत्र

डॉ. अजित माळी
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

पशूपालनातील प्रमुख अडचण म्हणजे गाई, म्हशी माजावर न येणे आणि माजावर आल्यानंतर वारंवार उलटणे. पशूतज्ज्ञ गाई,म्हशींच्या प्रजनन संस्थेची तपासणी हाताने करत असतो, परंतु त्यास काही मर्यादा आहेत. यासाठी अल्ट्रासोनोग्राफी यंत्राचा वापर करून कमीतकमी दिवसात अचूक निदान आणि योग्य उपचार करणे शक्‍य होत आहे. 

पशूपालनातील प्रमुख अडचण म्हणजे गाई, म्हशी माजावर न येणे आणि माजावर आल्यानंतर वारंवार उलटणे. पशूतज्ज्ञ गाई,म्हशींच्या प्रजनन संस्थेची तपासणी हाताने करत असतो, परंतु त्यास काही मर्यादा आहेत. यासाठी अल्ट्रासोनोग्राफी यंत्राचा वापर करून कमीतकमी दिवसात अचूक निदान आणि योग्य उपचार करणे शक्‍य होत आहे. 
 

साधारणपणे गाई, म्हशीमध्ये वर्षाला एक वेत ही संकल्पना प्रत्यक्ष पशुपालकाच्या गोठ्यामध्ये राबविणे आवश्यक आहे. गाई, म्हैस व्यायल्यानंतर साधारणपणे ६० ते ८० दिवसात माजावर येणे अपेक्षित आहे, परंतु तसे काही प्रमाणातच होते. यामुळे भाकडकाळ जास्त दिवसाचा होतो आणि दुग्धव्यवसायात तोटा सहन करावा लागतो. भाकडकाळाचा कालावधी जास्त असण्यामागे महत्त्वाची दोन कारणे म्हणजेच माजावर न येणे आणि माजावर आली तर वारंवार उलटणे. याबाबत निदान करण्यासाठी  गाई, म्हशींच्या तपासणीसाठी अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञान फायदेशीर ठरणारे आहे. अल्ट्रासोनोग्राफी यंत्रामुळे अचूक निदान होते. या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही प्रकारची हानी पशुतज्ज्ञ तसेच जनावरांना होत 
नाही.

अल्ट्रासोनोग्राफी तंत्राची कार्यपद्धती 

 • अल्ट्रासोनोग्राफी यंत्राच्या माध्यमातून जनावरांच्या शरीरातील विविध अवयवाच्या अंतरंगाची पाहणी सहज करता येते. यासाठी जनावरास कोणत्याही प्रकारची भूल द्यायची गरज नसते किंवा शरीरांवर कोणताही छेद देण्याची गरज नसते.
 • अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानात अतिनील ध्वनिलहरींचा वापर केलेला आहे. यंत्राचे प्रामुख्याने दोन भाग आहेत एक म्हणजे मॉनिटर आणि दुसरा म्हणजे प्रोब. जे विविध ध्वनिलहरींचे असतात. 
 •  यंत्राला विजेचा पुरवठा केल्यानंतर जोडलेल्या प्रोब त्यांच्या ध्वनिलहरींच्या तीव्रतेनुसार शरीराच्या तपासणी करावयाच्या भागावर आदळतात आणि अवयवांच्या अंतरंगाप्रमाणे सदर ध्वनिलहरी माघारी येतात आणि सदर अवयवाची प्रतिमा मॉनिटरवर तयार होते. सदर प्रकारच्या प्रतिमा सेकंदाच्या काही भागात सतत बदलत असतात. यामुळे विविध अवयवाच्या अंतरंगाची पाहणी सहज करता येते. 
 •  यंत्राच्या साहाय्याने जनावरातील शरीराच्या वेगवेगळ्या संस्थांच्या अवयवांचे निरीक्षण आणि अंतरंग प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यासारखा दिसते. या तंत्राने पशुवैद्यकास गाई, म्हशीच्या प्रजनन संस्थेच्या विविध आजाराचे अचूक निदान व आकलन सहज शक्‍य होते. 
 • सद्यःस्थितीत राज्यातील सहा पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पशुवैद्यकीय संस्थामध्ये अल्ट्रासोनोग्राफी यंत्रांची उपलब्धता पशुपालकांसाठी करण्यात आली आहे. 

अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानाचे फायदे 

 • जनावरांमधील प्रजनन संस्था आणि इतर अवयवांचे अचूक व लवकर निदान. 
 • यंत्राचा वापर करून काही सेकंदामध्ये जनावरामधील अवयवाच्या अंतरंगाची माहिती मिळते. 
 •  यंत्राचा वापर केल्याने वाढणारा गर्भ व पशुतज्ज्ञास कोणत्याही प्रकारचा धोका नाही. 
 •  जनावरांना पाडण्याची किंवा बधीर करण्याची गरज नाही. 
 •  यंत्राचा वापर करून वेळोवेळी तपासणी केल्यास कोणताही दुष्परिणाम जनावरांवर होत नाही. 
 •  यंत्रासाठी लागणारा विद्युत पुरवठा कमी दाबाचा असल्याने वापरासाठी सोईस्कर. 
 • वारंवार वापर झाला तरी यंत्राची कोणत्याही प्रकाराची झीज होत नाही. 
 • यंत्र वजनाला हलके व आकाराने लहान असल्यामुळे वापरण्यास सोपे.

 

अल्ट्रासोनोग्राफी यंत्रणा वापरताना 

अल्ट्रासोनोग्राफी यंत्र नोंदणीकृत पशुवैद्यकीय संस्थेत ठेवावे लागते. हे यंत्र पीसीपीएनडीटी कायदा १९९४ अन्वये ज्या ठिकाणी नोंद आहे तिथून हालवता येत नाही. त्यामुळे  पशुपालकांना अल्ट्रासोनोग्राफी तपासणीसाठी ज्या पशुवैद्यकीय संस्थेत यंत्र उपलब्ध आहे, त्या ठिकाणी जनावरांस घेऊन जावे लागते. पशुवैद्यकांना सदर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेणे आवश्‍यक असते. 

 

२८ दिवसांची गर्भधारणा तपासणी शक्‍य 

 • गाई, म्हशीमध्ये गर्भधारणा तपासणी करण्याकरिता  पशूतज्ज्ञास साधारणपणे दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागतो, तरच तो योग्य निदान देऊ शकतो. परंतु अल्ट्रासोनोग्राफी यंत्राचा वापर केल्यास २८ ते ३० दिवसांची गर्भधारणा तपासणी अचूक करता येते. 
 • यंत्राचा वापर करून गर्भधारणा तपासणीसाठी लागणारा वेळ हा पशुवैद्यकाला हाताने लागणाऱ्या वेळेएवढाच आहे. यंत्राच्या साहाय्याने आपण गर्भतपासणीसाठी लागणारा कालावधी ३० ते ६०  दिवसांनी कमी करतो, यामुळे पशुपालकांचा वेळ वाचतो.
 • अचूक व लवकर निदान झालेल्या जनावरातील वांझपणा आणि सतत उलटणे या आजारांवर योग्य उपचार झालेने गाई, म्हशी कमी कालावधीमध्ये गाभण राहतात. एकूण भाकडकाळ कमी होतो. 
 • साधारणपणे एका गाई, म्हशीसाठी व्यवस्थापनावरील खर्च कमीतकमी ३०० रुपये पकडल्यास ३० दिवसांचा कालावधी वाचविल्यास पशुपालकाचे व्यवस्थापनावरील ९,००० रुपये वाचविता येतील. अचूक निदान झाल्याने प्रजनन संस्थेच्या विकारांवरील औषधोपचारासाठी लागणारा खर्च कमी करणे शक्य होते.

- डॉ. अजित माळी, ९८५००७०४८१

(सहाय्यक प्राध्यापक, पशुप्रजननशास्त्र व प्रसूती विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ जि. सातारा)  

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
शेळीपालनासाठी महत्वाचे मुद्दे...शेळीपालन व्यवसाय सुरू करताना पूर्वतयारी करावी....
व्यवस्थापन दुधाळ जनावरांचे...गाई, म्हशींच्या आहारात पशुखाद्याचा योग्य प्रमाणात...
जनावरांतील ताण कमी करा... उन्हाळयात अनेकवेळा तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा...
शेतकऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्डमुळे कर्जाचे पैसे घेण्यासाठी...
असे बनवा घरच्या घरी पशुखाद्यउन्हाळ्यात गाई, म्हशी आणि इतर जनावरांची भूक कमी...
जनावरांच्या जैवसुरक्षेबाबत जागरूक रहाजनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचाराचा...
गाई, म्हशींच्या तपासणीसाठी...पशूपालनातील प्रमुख अडचण म्हणजे गाई, म्हशी माजावर...
ब्रुसेलोसिसकडे नको दुर्लक्षएखाद्या संक्रमित जनावराचे  रक्त, द्रव किंवा...
जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...
पशुपालनात सुरक्षितता महत्त्वाची...पशू सांभाळ, दैनंदिन निगा, चारा-पाण्याची सोय, दूध...
अनुदानाचा योग्य विनियोगअनुदानासाठीची बहुतांश प्रक्रिया बॅंकेमार्फतच...
आजारांपासून कोंबड्यांचे संरक्षणकोंबड्यांना होणाऱ्या आजारांचे वेळीच व्यवस्थापन...
बदलत्या हवामानानुसार जनावरांचे...बदलत्या हवामानानुसार जनावरांच्या आहार, गोठा,...
उत्पादन धिंगरी अळिंबीचेअळिंबीमध्ये भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत प्रथिने...
फायदेशीर पशुपालनाचे तंत्रगाई,म्हशींची उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याकडे...
गाय, म्हशींच्या आहारात बायपास फॅटचा वापरआपल्याला सुरुवातीच्या १०० ते १२० दिवसांत नफा...
स्वच्छतेतून वाढते दुधाची गुणवत्तादुधाची गुणवत्ता कमी होते. अयोग्य दुधामुळे आर्थिक...
अॅझोलाः एक आरोग्यदायी पशुखाद्य जनावरांचे दूध उत्पादन, प्रजनन, वाढ आणि...
दुधातील फॅट कमी राहण्याची कारणे,...दुधातील स्निग्धांश (फॅट) हा प्रतवारीच्या दृष्टीने...
चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ दूध उत्पादन...स्वच्छ दूध उत्पादनासाठी स्वच्छ वातावरण आणि...