मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
टेक्नोवन
पीक व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान
शेती व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक नियोजन, व्यवस्थापनात बदल होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा, आयओटी तंत्रज्ञानाचा वापर शेतीविकासासाठी फायदेशीर ठरणार आहे.
शेती व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक नियोजन, व्यवस्थापनात बदल होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा, आयओटी तंत्रज्ञानाचा वापर शेतीविकासासाठी फायदेशीर ठरणार आहे.
माहिती तंत्रज्ञानाचा वापर शेतीच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. या माध्यमातून हवामान, माती परीक्षण अहवाल, नवीन संशोधन, पीक परिस्थिती, पाऊस, कीडरोगांचा प्रादुर्भाव याची एकत्रित माहिती संकलित होणार आहे. शेती नियोजनात ड्रोन आणि सेन्सरचा उपयोग वाढत जाणार आहे. शेतीच्या
बरोबरीने बाजारपेठेचा कल, किमती, ग्राहकांच्या गरजा जाणून घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार आहे. शेती व्यवस्थापनात चॅटबॉट, संसाधनाच्या अंदाजासह योग्य पीकनिवडीसाठी कृषी-एक्लक्युलेटर, पीक व्यवस्थापन सेवा, किमतीचा अंदाज, पीककर्ज आणि विमासेवेबाबतही माहिती तंत्रज्ञान वापरले जात आहे.
चॅटबॉट तंत्रज्ञान
सध्याच्या काळात प्रवास, माध्यम आणि विमा क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. येत्या काळात या सेवेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पीक व्यवस्थापनातील प्रश्नांची उत्तरे त्यांच्या मूळ भाषांमध्ये व्हॉईस चॅटद्वारे मिळणार आहेत.
ॲग्री-ई-कॅल्क्युलेटर
पीक नियोजनाच्या दृष्टीने ॲग्री-ई-कॅल्क्युलेटर फायदेशीर तंत्र आहे. उपलब्ध जमिनीचा विचार करून कोणत्या पिकाची निवड करावी, त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठा, बियाणे, खते, पाणी, मजूर, लागवडीसाठी यंत्रसामग्री याचे नियोजन या तंत्रज्ञानातून करता येते. याचबरोबरीने पीक उत्पादन, काढणीच्या वेळचा बाजारभावाचा अंदाजही या तंत्रज्ञानाने मिळू शकतो. व्यवहार्यतेच्या अभ्यासानुसार विविध अंदाज या तंत्रज्ञानातून मिळतात.
पीक व्यवस्थापन सेवा
पीक लागवडीपासून ते विक्रीपर्यंतची सेवा या तंत्रज्ञानातून उपलब्ध होते. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या क्षेत्रातील आयओटी सेन्सरद्वारे माहिती गोळा केली जाते. ही सर्व माहिती स्मार्ट फोनवरदेखील उपलब्ध होते.
संगणक आणि रोबोटिक्सचा वापर
- स्टार्टअप कंपन्यांच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. अमेरिकेतील एक कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून विविध कृषी यंत्रांची निर्मिती करत आहे. संगणकाद्वारे पिकाचे छायाचित्र घेऊन वनस्पतीमधील कमतरता ओळखली जाते. त्यानुसार उपाययोजना केल्या जातात. कॅमेरा आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून तणनियंत्रण, कीडनाशकांची फवारणी, फळ तपासणी केली जाते.
- एका कंपनीने सी अँड स्प्रे नावाचा रोबोट विकसित केला आहे, जो कापसामधील तणांचा प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणाचे उपाय करतो. पिकाला पाण्याची किती गरज आहे, हेदेखील सेन्सरद्वारे पाहता येते.
- एका कंपनीने स्ट्रॉबेरी व्यवस्थापन आणि फळांच्या काढणीसाठी रोबोट विकसित केला आहे. यामुळे मजुरीमध्ये बचत झाली आहे. रोबोटिक्स तंत्रज्ञानामुळे आर्थिक बचत होणार आहे, तसेच उत्पादनात वाढ, मजुरीत बचत होणार आहे.
- इस्राईलमधील एका कंपनीने पीक व्यवस्थापनामध्ये क्लाउड तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानामध्ये पीक परिस्थिती, माती आणि पाण्याच्या नियोजनासाठी सेन्सर, हवाई प्रतिमांचे एकत्रीकरण केले जाते. त्यानुसार पुढील पीक व्यवस्थापनाबाबत निर्णय घेणे शक्य होते.
-
- डॉ. प्रदीप दळवी, ७९७२०१३४७२
(आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे.)
फोटो गॅलरी
- 1 of 21
- ››