Agriculture Agricultural News Marathi article regarding use of information technology in agriculture | Page 2 ||| Agrowon

पीक व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान

डॉ. जयश्री पाचपुते, डॉ. प्रदीप दळवी
बुधवार, 1 एप्रिल 2020

शेती व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक नियोजन, व्यवस्थापनात बदल होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा, आयओटी तंत्रज्ञानाचा वापर शेतीविकासासाठी फायदेशीर ठरणार आहे.

शेती व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक नियोजन, व्यवस्थापनात बदल होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा, आयओटी तंत्रज्ञानाचा वापर शेतीविकासासाठी फायदेशीर ठरणार आहे.

 

 

माहिती तंत्रज्ञानाचा वापर शेतीच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. या माध्यमातून हवामान, माती परीक्षण अहवाल, नवीन संशोधन, पीक परिस्थिती, पाऊस, कीडरोगांचा प्रादुर्भाव याची एकत्रित माहिती संकलित होणार आहे. शेती नियोजनात ड्रोन आणि सेन्सरचा उपयोग वाढत जाणार आहे. शेतीच्या 
बरोबरीने बाजारपेठेचा कल, किमती, ग्राहकांच्या गरजा जाणून घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार आहे. शेती व्यवस्थापनात चॅटबॉट, संसाधनाच्या अंदाजासह योग्य पीकनिवडीसाठी कृषी-एक्‍लक्‍युलेटर, पीक व्यवस्थापन सेवा, किमतीचा अंदाज, पीककर्ज आणि विमासेवेबाबतही माहिती तंत्रज्ञान वापरले जात आहे.
चॅटबॉट तंत्रज्ञान 
सध्याच्या काळात प्रवास, माध्यम आणि विमा क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. येत्या काळात या सेवेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पीक व्यवस्थापनातील प्रश्नांची उत्तरे त्यांच्या मूळ भाषांमध्ये व्हॉईस चॅटद्वारे मिळणार आहेत.

ॲग्री-ई-कॅल्क्‍युलेटर 
पीक नियोजनाच्या दृष्टीने ॲग्री-ई-कॅल्क्‍युलेटर फायदेशीर तंत्र आहे. उपलब्ध जमिनीचा विचार करून कोणत्या पिकाची निवड करावी, त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठा, बियाणे, खते, पाणी, मजूर, लागवडीसाठी यंत्रसामग्री याचे नियोजन या तंत्रज्ञानातून करता येते. याचबरोबरीने पीक उत्पादन, काढणीच्या वेळचा बाजारभावाचा अंदाजही या तंत्रज्ञानाने मिळू शकतो. व्यवहार्यतेच्या अभ्यासानुसार विविध अंदाज या तंत्रज्ञानातून मिळतात. 

पीक व्यवस्थापन सेवा
पीक लागवडीपासून ते विक्रीपर्यंतची सेवा या तंत्रज्ञानातून उपलब्ध होते. ज्या ठिकाणी आवश्‍यकता असेल त्या क्षेत्रातील आयओटी सेन्सरद्वारे माहिती गोळा केली जाते. ही सर्व माहिती स्मार्ट फोनवरदेखील उपलब्ध होते.

संगणक आणि रोबोटिक्‍सचा वापर

  • स्टार्टअप कंपन्यांच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. अमेरिकेतील एक कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक आणि रोबोटिक्‍स तंत्रज्ञानाचा वापर करून विविध कृषी यंत्रांची निर्मिती करत आहे. संगणकाद्वारे पिकाचे छायाचित्र घेऊन वनस्पतीमधील कमतरता ओळखली जाते. त्यानुसार उपाययोजना केल्या जातात. कॅमेरा आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून तणनियंत्रण, कीडनाशकांची फवारणी, फळ तपासणी केली जाते.
  • एका कंपनीने सी अँड स्प्रे नावाचा रोबोट विकसित केला आहे, जो कापसामधील तणांचा प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणाचे उपाय करतो. पिकाला पाण्याची किती गरज आहे, हेदेखील सेन्सरद्वारे पाहता येते. 
  •  एका कंपनीने स्ट्रॉबेरी व्यवस्थापन आणि फळांच्या काढणीसाठी रोबोट विकसित केला आहे. यामुळे मजुरीमध्ये बचत झाली आहे. रोबोटिक्स तंत्रज्ञानामुळे आर्थिक बचत होणार आहे, तसेच उत्पादनात वाढ, मजुरीत बचत होणार आहे.
  •   इस्राईलमधील एका कंपनीने पीक व्यवस्थापनामध्ये क्लाउड तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानामध्ये पीक परिस्थिती, माती आणि पाण्याच्या नियोजनासाठी सेन्सर, हवाई प्रतिमांचे एकत्रीकरण केले जाते. त्यानुसार पुढील पीक व्यवस्थापनाबाबत निर्णय घेणे शक्य होते.
  •  - डॉ. प्रदीप दळवी, ७९७२०१३४७२
    (आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे.)

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
'हायब्रीड’ पवनचक्कीच्या निर्मितीतून...शेतीला चोवीस तास वीज मिळावी, रात्रीचे भारनियमन...
साध्या डोळ्यांनी न पाहता येणारे रंगही...तेल अविव विद्यापीठाने विकसित केलेल्या...
जनुकीय सुधारित पिकांसाठी अधिक...विविध पिकांमध्ये जनुकीय सुधारित जातींची भर पडत...
सूक्ष्म हवामानासाठी वारा प्रतिबंधक सजीव...थंड किंवा उष्ण वाऱ्यामुळे पिकाचे किंवा पशुधनाचे...
काटेकोर शेतीसाठी सापेक्ष आर्द्रतेचा...सापेक्ष आर्द्रता किंवा वातावरणातील बाष्प आणि पीक...
शेतीकामावेळी उडणाऱ्या धूलिकणांपासून करा...शेतीमध्ये विविध यंत्रे, अवजारांचा वापर करताना...
काकडीच्या सालापासून पर्यावरणपूरक...खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी...
शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापरशेतीसमोरील समस्यांमध्ये बदलते हवामान, मजुरांची...
अल्पभूधारक शेतकऱ्यांने तयार केले छोटे...कोविड १९ च्या काळात टाळेबंदीमुळे अनेक उद्योगाचे...
काटेकोर शेतीसाठी पिकातील तापमानाचा...पॉलिहाऊस, शेडनेट यासारख्या संरक्षित शेतीमध्ये...
स्वयंचलित बहूपीक पेरणी यंत्ररब्बी हंगामातील गहू, ज्वारी, बाजरी, साळ, हरभरा,...
महिलांसाठी शेतीपयोगी अवजारेसुधारीत अवजारांचा वापर केल्याने शेतीच्या...
पिकातील सूर्यप्रकाशाची प्रत मोजणारी...आपल्याकडेही हरितगृह, शेडनेटगृहातील लागवड वेगाने...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
संरक्षित व नियंत्रित शेतीचे तंत्रज्ञानकृषी क्षेत्रात नियंत्रित शेतीला अनन्यसाधारण...
मुळांतील स्रावके ठरतात पिकासाठी संजीवनीवनस्पतींच्या वाढीमध्ये मुळाच्या परिवेशामध्ये...
कोको उत्पादनवाढीसाठी हाताने परागीभवनाचे...कोको पिकाला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. मात्र...
वेळ, खर्चात बचत अन् गुणवत्तेसाठी...द्राक्ष बागेचे हंगाम व्यवस्थापन काटेकोरपणे होणे...
कृत्रिम बुद्धिमत्तेवर हवा नैतिकतेचा...वारविक विद्यापीठ, इंपिरिअल कॉलेज लंडन, इपीएफएल (...
पिकातील बाष्पोत्सर्जन मोजणारी उपकरणेशेतकऱ्यांनी सर्व जैविक घटक व आपले पीक याचा संबंध...