शेतकऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्डमुळे कर्जाचे पैसे घेण्यासाठी वारंवार बँकेत जावे लागत नाही. आपल्या गरजेप्रमाणे कधीही लागेल तसे पैसे काढता येतात किंवा दुकानातून शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी सरळ घेता येतात.
kisan card
kisan card

किसान क्रेडिट कार्डमुळे कर्जाचे पैसे घेण्यासाठी वारंवार बँकेत जावे लागत नाही. आपल्या गरजेप्रमाणे कधीही लागेल तसे पैसे काढता येतात किंवा दुकानातून शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी सरळ घेता येतात.

ॲग्रो क्लिनिक अशी पाटी असलेल्या दुकानासमोर रोहनने आपली मोटरसायकल थांबवली. क्लिनिकमध्ये प्रवेश करतानाच त्याने राजेंद्रकडे पाहत म्हटले, ‘‘नमस्कार डॉक्टर’’. त्यावर राजेंद्रने हसतच पण त्वरेने त्याला नकार देत म्हटले,‘‘नमस्कार, अरे रोहन हे क्लिनिक असले तरी  काही खरा डॉक्टर नाही. मी  तुमचा शेतकरी मित्र.” रोहनने त्वरित उत्तर दिले, “ क्लिनिकचा मालक म्हणजे माझ्यासारख्या शेतकऱ्यांसाठी डॉक्टरच.”  राजेंद्र हा कृषी पदवीधर. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ॲग्री क्लिनिक ॲग्री बिजनेस मॅनेजमेंट अंतर्गत प्रशिक्षण घेतले. त्याअंतर्गत त्याने स्वत:चे ॲग्रो क्लिनिक सुरू केले.  त्याची पत्नी शिला ही सुद्धा कृषी पदवीधर असून, राजेंद्रला या व्यवसायात मदत करते. गेल्या दोन वर्षापूर्वी सुरू झालेल्या अॅग्रो क्लिनिकविषयी लोकांच्या मनात साशंकता होती. मात्र, वेगवेगळ्या शेती विषयातील  योग्य मार्गदर्शनामुळे  शेतकऱ्यांच्या मनात विश्वास व स्थान निर्माण केले. मार्गदर्शनासोबतच खते, कीडनाशके, बी-बियाणे यांची विक्रीही येथे केली जाते. या ॲग्रो क्लिनिकच्या माध्यमातून विविध खत, बियाणे आणि कीडनाशक निर्मात्या कंपन्यांच्या सहकार्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातमध्ये नमूना व प्रात्यक्षिक प्लॉट घेतले. तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि उत्तम शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांची पंचक्रोशीमध्ये व्याख्यानेही आयोजित केली. त्यातून नव्या उत्पादनांविषयी व त्याच्या ॲग्रो क्लिनिकविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये विश्वासार्हताही मिळत गेली.  क्लिनिक शेजारीच मांडव टाकून शेतकऱ्यांसाठी आरामदायी बसण्याची व वाचनाची सोय केली. तिथे केवळ शेतीसंबंधी वृतपत्रे, मासिके, पुरवण्या ठेवलेल्या असतात. त्यातून शेतकऱ्यांमध्ये आपोआप नव्या पिकांच्या, तंत्रज्ञानाच्या चर्चा चालू होतात. तिथे आजही काही शेतकरी बसलेले होते. त्यांच्या समोर रोहनने खिशातून खते आणि कीडनाशकांची यादी राजेंद्रकडे दिली. किती बील होईल, याचा अंदाज घेतल्यानंतर त्याने खिशातून एक कार्ड काढत राजेंद्रला म्हणाला, ‘‘बँकेने ३ लाख रूपयांचे पीक कर्ज मंजूर केले आहे. सोबत त्यांनी हे किसान क्रेडिट कार्डही दिले आहे. याद्वारे ३ लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम किंवा खरेदी आपण करू शकत असल्याचे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.’’  त्यानंतर पुढे तो म्हणाला, ‘‘बँकेची ही सोय चांगली वाटते. या किसान क्रेडिट कार्डमुळे कर्जाचे पैसे घेण्यासाठी वारंवार बँकेत जावे लागत नाही. आपल्या गरजेप्रमाणे कधीही लागेल तसे पैसे काढता येतात किंवा दुकानातून शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी सरळ घेता येतात. एकाच वेळी पैसे काढून आणण्याची गरज नाही. काढेल तेवढ्याच रक्कमेवर व्याज लागते, म्हणजेच कमी व्याज लागते.’’ ॲग्रो क्लिनिकच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी सांभाळणारी राजेंद्रची पत्नी शीला म्हणाली, ‘‘ अहो म्हणूनच आम्ही सर्व शेतकऱ्यांना असे क्रेडिट कार्ड घेण्याचा आग्रह धरतो. हा व्यवहार बहुतांश रोखीप्रमाणेच होत असल्याने आम्हालाही कृषी निविष्ठांच्या खरेदीवर मग काही सवलती देणे शक्य होते.  उधारीवर माल नेणाऱ्या शेतकऱ्यांना या सवलती देता येत नाहीत.’’ त्यावर हसत हसत रोहन म्हणाला, ‘‘ अहो वहिनी, मला काय सवलत देणार ते तरी आधी सांगा. हा माझा पूर्वीपासून मित्र आहेच, मात्र त्याच्या मार्गदर्शनामुळे शेती सुधारायला लागल्याने आता गुरूही होत चाललाय.’’ पुन्हा राजेंद्रकडे पाहत त्याने ‘‘ काय हो, डॉक्टर, खरंय ना?’’ असे म्हटले. राजेंद्र दुसऱ्या शेतकऱ्याला काही माल दाखवत होता. तो एकदम दचकला.  त्यावर सर्वजण खळखळून हसले.  

उद्दिष्ट 

  • शेतकऱ्यांच्या पुढे दिलेल्या शेतीविषयक व इतर गरजांसाठी, एकाच खिडकीमधून व सुलभ व लवचिक कार्यरीतींनी, बँकिंग प्रणालीकडून, वेळच्या वेळी व पुरेसे कर्ज उपलब्ध करणे हे किसान क्रेडिट कार्डचे उद्दिष्ट आहे.
  • हेतू 

  • पिके घेण्यासाठी आवश्यक असलेल्या शेतकऱ्याच्या लघु मुदत कर्जाच्या गरजा पूर्ण करणे.
  • कापणी व हंगामासाठी येणारा खर्च .
  • उत्पादनाचे विक्रीसाठी होणारा खर्च .
  • शेतकऱ्यांचा घर खर्च.
  • शेती-मालमत्ता व शेती संबंधित कार्यकृतींचे परिरक्षण करण्यासाठी कार्यकारी भांडवल.
  • शेती व संबंधित कार्यकृतींसाठीच्या गुंतवणुक कर्ज गरजा.
  • किसान क्रेडिट कार्डचा  वापर  

  • शाखेमार्फत व्यवहार 
  • चेकने व्यवहार
  • एटीएम/डेबिट कार्डाने पैसे काढणे. 
  • बिझिनेस कॉरस्पॉडंट्स व बँकिंग आऊटलेट्स/ पार्ट टाईम बँकिंग आऊटलेट द्वारा व्यवहार 
  • विशेषतः जोडणी अग्रिम राशींसाठी, साखर कारखाने/काँट्रॅक्ट फार्मिंग कंपन्यांमध्ये असलेल्या पीओएस (Point Of Sale) मार्फत
  • खत, औषधे व बी-बियाणे  डीलर्सकडे असलेल्या पीओएस  (Point Of Sale) मार्फत व्यवहार करुन
  • शेती माल व्यापारी व मंडईमध्ये मोबाईल आधारित हस्तांतरण व्यवहार करणे.
  •  - अनिल महादार, ८८०६००२०२२    

      (निवृत्त सहायक महाप्रबंधक, बॅंक ऑफ इंडिया)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com