Agriculture Agricultural News Marathi article regarding Use of paper pot and pot mix. | Page 2 ||| Agrowon

दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा वापर

राजकुमार चौगुले
रविवार, 20 सप्टेंबर 2020

रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी रोपवाटिकेमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. अलीकडच्या काळात रोपनिर्मितीसाठी प्लॅस्टिक पिशवी ऐवजी  पेपर पॉट आणि रोपवाढीसाठी माध्यम म्हणून पीट मॉसचा वापर फायदेशीर दिसून आला आहे.

रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी रोपवाटिकेमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. अलीकडच्या काळात रोपनिर्मितीसाठी प्लॅस्टिक पिशवी ऐवजी  पेपर पॉट आणि रोपवाढीसाठी माध्यम म्हणून पीट मॉसचा वापर फायदेशीर दिसून आला आहे.

तळसंदे (ता. हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील `सीमा बायोटेक'चे विश्‍वास चव्हाण हे  रोपे तयार करण्याकरिता पेपर पॉट तंत्रज्ञानाचा वापर करतात. या तंत्रज्ञानामुळे रोपांच्या जोमदार वाढीबरोबरच वाहतूक खर्चातही बचत होत आहे. पूर्वी चव्हाण यांच्या रोपवाटिकेत टिश्‍यूकल्चर तंत्राने तयार केलेली केळी, साग आणि बांबूची रोपे प्लॅस्टिक पिशवीत माती भरून लावली जात होती. ठराविक काळानंतर मातीच्या पिशवीत वाढलेली रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जायची. परंतु यामध्ये असे लक्षात आले की, मातीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर रोपवाढीवर व पर्यायाने उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. याला पर्याय म्हणून चव्हाण यांनी मातीऐवजी कोको पीटचा वापर सुरू केला.  कोको पीट माध्यमांमध्ये केळी रोपांची वाढ चांगली होऊ लागली. ओलावा दीर्घकाळ टिकून राहू लागला, परंतु कालांतराने असे लक्षात आले की, कोकोपीट एकाच गुणवत्तेचे मिळत नाही. काही वेळा जास्त विद्युत वाहकता असलेल्या कोकोपीटमुळे रोप वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. विशेषतः पावसाळ्यात कोकोपीटमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे रोपांची वाढ खुंटते. मर होण्याचे प्रमाण वाढते. या अनुभवानंतर चव्हाण यांनी टिश्‍यू कल्चर केळी रोपांसाठी कोकोपीट माध्यमाला पर्यायी माध्यम म्हणून पीट मॉसचा वापर सुरू केला. त्यांचे चांगले फायदे दिसून आले आहेत.  

नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब 
रोपांच्या वाढीसाठी माध्यम म्हणून कोकोपीटला पर्याय शोधताना चव्हाण यांना पीटमॉसबाबत माहिती कळाली. अनेक देशांतील हायटेक नर्सरीमध्ये कोकोपीट ऐवजी पीट मॉस हे उच्च दर्जाचे माध्यम वापरले जाते. तसेच रोपांसाठी प्लॅस्टिक पिशवी ऐवजी पेपर पॉटचा वापर केला जातो. हे लक्षात घेऊन प्रत्यक्ष प्रयोगानंतर पेपर पॉट तंत्रज्ञानाचा टिशू कल्चर केळी रोपांच्या वाढीसाठी अतिशय चांगला दिसून आला. अभ्यास आणि प्रत्यक्ष वापर करून केळी रोप निर्मितीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला.पेपर पॉटसाठी लागणारा पेपर हा नेदरलॅंड आणि पीट मॉस हे लिथुवानिया देशातून आयात केले जाते. पेपर पॉट मध्ये पीट मॉस भरणारे यंत्र चीनमधून आयात केलेले आहे.

तंत्रज्ञानाचे फायदे 

  • पेपर पॉटमध्ये रोपवाढीसाठी वापरण्यात आलेले पीट मॉस हे माध्यम दर्जेदार आहे.
  • या माध्यमामध्ये रोपांची वाढ अतिशय जोमदार, वेगवान होते. हे माध्यम योग्य प्रमाणात ओलावा धरून ठेवते. पेपर पॉटमध्ये जादा पाण्याचा निचरा होईल अशी रचना असते. 
  • या तंत्रज्ञानामुळे विशेषतः पावसाळ्यात अति पाण्यामुळे रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होत नाही. जादा पाण्यामुळे रोपांच्या मुळांच्या कक्षेत होणारी हानिकारक बुरशीची वाढ टाळली जाते.
  •   योग्य वाढीचे रोप शेतामध्ये लावताना प्लॅस्टिक पिशवी ब्लेडने फोडावी लागते. पिशवी फाडताना मुळाभोवतीची मातीची हुंडी फुटल्यामुळे रोपांच्या मुळ्यांना इजा पोहाचते. परंतु पेपर पॉटचा पेपर हा जमिनीत कुजतो. त्यामुळे पेपर पॉट न फोडता रोप लागवड करता येते. 
  • पेपर पॉटमधील रोपांची वाढ एकसारखी होते. मुळ्यांची वाढ चांगली होते. ही रोपे जमिनीत लावली असता तत्काळ रूजतात.
  • कोणत्याही रोपाची नर्सरी अवस्थेतील वाढ निरोगी आणि सशक्त झाली, तर त्या रोपांपासून चांगले उत्पादन मिळते. पेपर पॉट मधील रोपे लावली असता तुलनात्मकदृष्ट्या शेतामध्ये वाढ जोमदार होते.त्यामुळे पीक उत्पादन देखील वाढते. असे प्रत्यक्ष शेतामध्ये दिसून आले आहे. 
  • पेपर पॉटमधील रोपांची लागवड केल्यानंतर तुलनात्मकदृष्ट्या शेतातील रोपांची मर अत्यंत कमी दिसून आली. पेपर पॉटमधील रोपांवर नर्सरी अवस्था आणि शेतामध्ये लागवड केल्यानंतर कीड, रोगांचे प्रमाण कमी दिसून आले.

पर्यावरण पूरक तंत्रज्ञान
रोपनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक बॅगा लागतात. शेतात रोप लागवडीनंतर बरेच जण प्लॅस्टिक पिशव्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता बांधावर फेकून देतात. त्यामुळे शेतीच्या परिसरात प्रदूषण वाढते. हे प्लॅस्टिक अनेक वर्ष जमिनीत तसेच राहते. त्यामुळे निसर्गाला हानी पोहोचते. हे लक्षात घेता पेपर पॉट तंत्रज्ञान पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. रोपांच्या वाहतुकीचा खर्च शेतकरी करत असतो. एक गाडीमधून पूर्वी दहा हजार रोपांची वाहतूक व्हायची, त्याच गाडीतून आता वीस हजार पेपर पॉट रोपांची वाहतूक होते.त्यामुळे वाहतुकीचा खर्चदेखील वाचला आहे.

- विश्‍वास चव्हाण, ९८२२५४७६२२

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
हुमणी भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी गंध...भारतीय कृषी संशोधन  संस्थेच्या बंगळूर येथील...
तुषार सिंचनाने वाढवले कडधान्य पिकांचे...हमिरपूर येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी...
मळणी यंत्राची क्षमता, गुणवत्ता...काढणीनंतर पिकांची मळणी केली जाते. मळणीसाठी...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
कोबीवर्गीय पिकांतील कीडनियंत्रणासाठी...बंगळूर येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने...
जमिनीतील बाष्प मोजण्याच्या पद्धतीया पूर्वीच्या लेखांमध्ये वातावरणातील पाण्याचे...
मत्स्य बीजोत्पादनातून पर्यायी...कोवालम गाव (जि. चेंगलपट्टू) येथील गटाने खारवट...
निचरा प्रणाली सुधारण्यासाठी सबसॉयलर,...फळबागांमध्ये कमी अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे...
व्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...
मजुरी, वेळेत बचत करणारी अवजारेकृषी यांत्रिकीकरणामुळे मजूर टंचाईवर मात करणे शक्य...
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करता येईल...पारंपरिक पद्धतीची शेती करताना शेतकरी मेटाकुटीला...
अवघ्या सात हजारांत बनवली स्वयंचलित ठिबक...सोलापूर ः वीजपंपाच्या स्टार्टरला स्वतःच्या...
दोन एकर ‘व्हर्टिकल फार्म’ मध्ये ७२०...सॅनफ्रान्सिस्को येथील प्लेन्टी या कंपनीने...
पाण्यातील प्रतिमाही घेता येतील सहजतेनेस्टॅनफोर्ड येथील अभियंत्यांनी पाण्याबाहेरून...
डाळिंबाचे नवीन अधिक पोषक वाण ः सोलापूर... भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय डाळिंब...
पीक व्यवस्थापनात स्मार्ट कॅमेऱ्याचा वापरकृषी यंत्रणेमध्ये स्मार्ट कॅमेरा प्रणालीचा विकास...
बहुउद्देशीय टोकण यंत्राने वाचवले...नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील सौरभ कदम व...
शेतीमाल वाळविण्यासाठी सोलर टनेल ड्रायर...भाजीपाला, फळांचे काप वाळविण्यासाठी सौर ऊर्जेचा...
शास्त्रीय हाताळणी, पॅकिंग...खानदेश हा केळीसाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश मानला...
सूक्ष्म वातावरणावर होतो वाहत्या...वारे नुसते वाहत नाहीत, तर सोबत पावसाचे ढग,...