सोपी, सहज सौर वाळवण यंत्रे

सध्या कोरोनाच्या स्थितीमध्ये विक्रीअभावी शेतीमाल शेतात किंवा घरामध्ये शिल्लक राहत आहे. अशा स्थितीमध्ये शेतीमाल वाळवून त्याचा वापर पुढे करणे शक्य आहे.त्यासाठी सोपी आणि सहजनपणे वापरता येणाऱ्या वाळवण यंत्रांची माहिती घेऊयात.
SOLAR DRYER
SOLAR DRYER

सध्या कोरोनाच्या स्थितीमध्ये विक्रीअभावी शेतीमाल शेतात किंवा घरामध्ये शिल्लक राहत आहे. अशा स्थितीमध्ये शेतीमाल वाळवून त्याचा वापर पुढे करणे शक्य आहे.त्यासाठी सोपी आणि सहजनपणे वापरता येणाऱ्या वाळवण यंत्रांची माहिती घेऊयात.   

सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रुपाने येणाऱ्या उर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेचा उपयोग माणसे रोजच्या व्यवहारांमध्ये नियमितपणे करत नसल्यामुळे तिला अपारंपरिक ऊर्जा असेही म्हणतात. वास्तविक सौर ऊर्जा हा अक्षय्य उर्जेचा एक मोलाचा स्त्रोत आहे. ह्या सौर उर्जेचा वापर सौर वाळवणी यंत्रामध्ये केला जातो. सौर वाळवणी यंत्र हे नाशवंत शेतीमाल (धान्य, भाजीपाला, फळे इ.) दिर्घकाळ टिकवण्यासाठी उपयोगात येते. सौर वाळवणी यंत्रात शेतीमालाचे निर्जलीकरण करण्यात येते, ज्यामुळे हा शेतीमाल दिर्घकाळ साठवून ठेवता येते. शेतीमालाचे निर्जलीकरण केल्याने त्यावर बुरशींची वाढ होत नाही. अन्य सूक्ष्मजीवांपासून त्याचे रक्षण होते. परिणामी शेतीमाल दीर्घकाळ टिकतो. शेतीमालाच्या वजनात व आकारात घट होते. त्यामुळे त्यावर होणाऱ्या वाहतूक व साठवणूकीवरील खर्चात बचत होते. अनेक वर्षांपासून पदार्थ दिर्घकाळ टिकवण्यासाठी वाळवणे ही पद्धत वापरात आणली जाते, परंतु यात शेतीमाल उघड्यावर वाळवला जातो.  त्यामुळे मुख्यतः पुढील समस्या येतात.   

  • वारा, धूळ, माती यामुळे शेतीमालाचा दर्जा ढासळतो.
  • पशू, पक्षी, कीटक इ. मुळे शेतीमालाचे नुकसान होते.
  • समप्रमाणात वाळवण होत नसल्यामुळे शेतमालाची प्रत (गुणवत्ता) कमी होते.
  • वाळवण प्रक्रियेवर नियंत्रण नसण्याने आवश्यकतेपेक्षा कमी-अधिक प्रमाणात पदार्थ वाळविले जातात.
  • सौर वाळवण यंत्र  पदार्थांची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी वेळेत पदार्थ (शेतीमाल) वाळवण्यासाठी सौर वाळवण यंत्राचा वापर होतो. सौर वाळवणी यंत्राच्या रचनेनुसार त्याचे वर्गीकरण मुख्यतः पुढील तीन प्रकारात होते.  

  • प्रत्यक्ष सौर वाळवण यंत्र
  • अप्रत्यक्ष सौर वाळवण यंत्र. 
  •  घुमटाकार सौर वाळवण यंत्र.
  • प्रत्यक्ष सौर वाळवण यंत्राची संरचना सौर वाळवण यंत्रामध्ये सौर संकलक हा महत्त्वाचा भाग असून त्यात पदार्थ वाळवण्यासाठी ठेवण्यात येतो. सौर संकलकाचा आतील भाग काळ्या रंगाने रंगविलेला असतो व तो पारदर्शक काचेच्या साहाय्याने बंदिस्त केलेला असतो. पारदर्शक काचेतून सौर किरण सौर संकलकात पोहोचतात. तेथील तापमान वाढते.  सौर कलकाचा आतील भाग गरम झाल्यामुळे संयंत्रात जाणारा नैसर्गिक हवेचा झोत गरम होतो. सौर संकलकामधील गरम हवा व सौरकिरण यामुळे पदार्थाची आर्द्रता कमी होते. पदार्थ लवकर वाळण्यास मदत होते. 

    अप्रत्यक्ष सौर वाळवण यंत्र संरचना या प्रकारच्या सौर वाळवण यंत्राचे मुख्य भाग म्हणजे सौरसंकलक, सुकवण जाळ्या (ट्रे), हवा बंद काचेचे आवरण आणि गरम हवा बाहेर जाण्यासाठी चिमणी. सौरसंकलकाचा आतील भाग काळ्या रंगाने रंगविला जातो. परिणामी अधिक उष्णता शोषून घेतली जाते.  अप्रत्यक्ष सौर वाळवणी यंत्रामध्ये कांदा, लसूण, कढीपत्ता, आले, भाजीपाला इ. पदार्थ वाळवता येतात.

    घुमटाकार सौर वाळवण यंत्र संरचना हे वाळवण यंत्र मोठ्या क्षमतेचे असून याचे मुख्य भाग म्हणजे अर्ध गोलाकार लोखंडी पाइपचा सांगाडा, २०० मायक्रॉनची पॉलिइथीलीन शीट, सिमेंट क्रॉंक्रीटचा पृष्ठभाग, पदार्थ वाळविण्याच्या जाळ्या, चिमणी इ. घुमटकार सौर वाळवणी यंत्रामध्ये दिवसा ग्रीनहाऊस इफेक्टमुळे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा ५ ते २० अंश सेल्सिअसने अधिक राहते.  संकलकातील तापमान भर दुपारी ६० ते ६५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती वाळवण्यासाठी करण्यात येतो. या यंत्राची पदार्थ वाळवण्याची क्षमता १०० किलोएवढी आहे.

    सौर वाळवण यंत्राचे फायदे

  • सौर वाळवण यंत्रामध्ये वाळविण्यासाठी ठेवलेल्या शेतमालाचा वारा, धूळ, माती यापासून संरक्षण होते.
  • पशू, पक्षी व इतर कीटकांपासून शेतमालाचे संरक्षण होते.
  •  नाशवंत पदार्थ लवकर वाळवल्यामुळे शेतीमालाचे होणारे नुकसान टाळले जाते.
  •  नाशवंत पदार्थांवर वाळवण्याची किंव निर्जलीकरणाची प्रक्रीया केल्याने पदार्थाची गुणवत्ता वाढते. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. 
  • पदार्थ वाळवणीसाठी कमी वेळ लागतो.
  • वाळवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या शेतीमालावर सतत लक्ष द्यावे लागत नाही.
  •  अपारंपरिक उर्जेचा वापर केल्यामुळे इंधनाची बचत होते.
  • - शुभांगी गावंडे, ७०५८५९०७९९ (अपरंपरिक ऊर्जा अभियांत्रिकी विभाग, के. के. वाघ कृषी अभियांत्रिकी विद्यालय ,नशिक. )  - केतन फलफले, ९९२१०००२७८ (तांत्रिक सहाय्यक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली,जि.रत्नागिरी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com