Agriculture Agricultural News Marathi article regarding use of solar dryer | Page 2 ||| Agrowon

सोपी, सहज सौर वाळवण यंत्रे

शुभांगी गावंडे, केतन फलफले
बुधवार, 8 एप्रिल 2020

सध्या कोरोनाच्या स्थितीमध्ये विक्रीअभावी शेतीमाल शेतात किंवा घरामध्ये शिल्लक राहत आहे. अशा स्थितीमध्ये शेतीमाल वाळवून त्याचा वापर पुढे करणे शक्य आहे.त्यासाठी सोपी आणि सहजनपणे वापरता येणाऱ्या वाळवण यंत्रांची माहिती घेऊयात. 

सध्या कोरोनाच्या स्थितीमध्ये विक्रीअभावी शेतीमाल शेतात किंवा घरामध्ये शिल्लक राहत आहे. अशा स्थितीमध्ये शेतीमाल वाळवून त्याचा वापर पुढे करणे शक्य आहे.त्यासाठी सोपी आणि सहजनपणे वापरता येणाऱ्या वाळवण यंत्रांची माहिती घेऊयात. 
 

सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रुपाने येणाऱ्या उर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेचा उपयोग माणसे रोजच्या व्यवहारांमध्ये नियमितपणे करत नसल्यामुळे तिला अपारंपरिक ऊर्जा असेही म्हणतात. वास्तविक सौर ऊर्जा हा अक्षय्य उर्जेचा एक मोलाचा स्त्रोत आहे. ह्या सौर उर्जेचा वापर सौर वाळवणी यंत्रामध्ये केला जातो. सौर वाळवणी यंत्र हे नाशवंत शेतीमाल (धान्य, भाजीपाला, फळे इ.) दिर्घकाळ टिकवण्यासाठी उपयोगात येते. सौर वाळवणी यंत्रात शेतीमालाचे निर्जलीकरण करण्यात येते, ज्यामुळे हा शेतीमाल दिर्घकाळ साठवून ठेवता येते. शेतीमालाचे निर्जलीकरण केल्याने त्यावर बुरशींची वाढ होत नाही. अन्य सूक्ष्मजीवांपासून त्याचे रक्षण होते. परिणामी शेतीमाल दीर्घकाळ टिकतो. शेतीमालाच्या वजनात व आकारात घट होते. त्यामुळे त्यावर होणाऱ्या वाहतूक व साठवणूकीवरील खर्चात बचत होते.
अनेक वर्षांपासून पदार्थ दिर्घकाळ टिकवण्यासाठी वाळवणे ही पद्धत वापरात आणली जाते, परंतु यात शेतीमाल उघड्यावर वाळवला जातो.  त्यामुळे मुख्यतः पुढील समस्या येतात.   

 • वारा, धूळ, माती यामुळे शेतीमालाचा दर्जा ढासळतो.
 • पशू, पक्षी, कीटक इ. मुळे शेतीमालाचे नुकसान होते.
 • समप्रमाणात वाळवण होत नसल्यामुळे शेतमालाची प्रत (गुणवत्ता) कमी होते.
 • वाळवण प्रक्रियेवर नियंत्रण नसण्याने आवश्यकतेपेक्षा कमी-अधिक प्रमाणात पदार्थ वाळविले जातात.

सौर वाळवण यंत्र 
पदार्थांची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी वेळेत पदार्थ (शेतीमाल) वाळवण्यासाठी सौर वाळवण यंत्राचा वापर होतो. सौर वाळवणी यंत्राच्या रचनेनुसार त्याचे वर्गीकरण मुख्यतः पुढील तीन प्रकारात होते.  

 • प्रत्यक्ष सौर वाळवण यंत्र
 • अप्रत्यक्ष सौर वाळवण यंत्र. 
 •  घुमटाकार सौर वाळवण यंत्र.

प्रत्यक्ष सौर वाळवण यंत्राची संरचना
सौर वाळवण यंत्रामध्ये सौर संकलक हा महत्त्वाचा भाग असून त्यात पदार्थ वाळवण्यासाठी ठेवण्यात येतो. सौर संकलकाचा आतील भाग काळ्या रंगाने रंगविलेला असतो व तो पारदर्शक काचेच्या साहाय्याने बंदिस्त केलेला असतो. पारदर्शक काचेतून सौर किरण सौर संकलकात पोहोचतात. तेथील तापमान वाढते.  सौर कलकाचा आतील भाग गरम झाल्यामुळे संयंत्रात जाणारा नैसर्गिक हवेचा झोत गरम होतो. सौर संकलकामधील गरम हवा व सौरकिरण यामुळे पदार्थाची आर्द्रता कमी होते. पदार्थ लवकर वाळण्यास मदत होते. 

अप्रत्यक्ष सौर वाळवण यंत्र संरचना
या प्रकारच्या सौर वाळवण यंत्राचे मुख्य भाग म्हणजे सौरसंकलक, सुकवण जाळ्या (ट्रे), हवा बंद काचेचे आवरण आणि गरम हवा बाहेर जाण्यासाठी चिमणी. सौरसंकलकाचा आतील भाग काळ्या रंगाने रंगविला जातो. परिणामी अधिक उष्णता शोषून घेतली जाते.  अप्रत्यक्ष सौर वाळवणी यंत्रामध्ये कांदा, लसूण, कढीपत्ता, आले, भाजीपाला इ. पदार्थ वाळवता येतात.

घुमटाकार सौर वाळवण यंत्र संरचना
हे वाळवण यंत्र मोठ्या क्षमतेचे असून याचे मुख्य भाग म्हणजे अर्ध गोलाकार लोखंडी पाइपचा सांगाडा, २०० मायक्रॉनची पॉलिइथीलीन शीट, सिमेंट क्रॉंक्रीटचा पृष्ठभाग, पदार्थ वाळविण्याच्या जाळ्या, चिमणी इ. घुमटकार सौर वाळवणी यंत्रामध्ये दिवसा ग्रीनहाऊस इफेक्टमुळे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा ५ ते २० अंश सेल्सिअसने अधिक राहते.  संकलकातील तापमान भर दुपारी ६० ते ६५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती वाळवण्यासाठी करण्यात येतो. या यंत्राची पदार्थ वाळवण्याची क्षमता १०० किलोएवढी आहे.

सौर वाळवण यंत्राचे फायदे

 • सौर वाळवण यंत्रामध्ये वाळविण्यासाठी ठेवलेल्या शेतमालाचा वारा, धूळ, माती यापासून संरक्षण होते.
 • पशू, पक्षी व इतर कीटकांपासून शेतमालाचे संरक्षण होते.
 •  नाशवंत पदार्थ लवकर वाळवल्यामुळे शेतीमालाचे होणारे नुकसान टाळले जाते.
 •  नाशवंत पदार्थांवर वाळवण्याची किंव निर्जलीकरणाची प्रक्रीया केल्याने पदार्थाची गुणवत्ता वाढते. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. 
 • पदार्थ वाळवणीसाठी कमी वेळ लागतो.
 • वाळवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या शेतीमालावर सतत लक्ष द्यावे लागत नाही.
 •  अपारंपरिक उर्जेचा वापर केल्यामुळे इंधनाची बचत होते.

- शुभांगी गावंडे, ७०५८५९०७९९
(अपरंपरिक ऊर्जा अभियांत्रिकी विभाग, के. के. वाघ कृषी अभियांत्रिकी विद्यालय ,नशिक. )
 - केतन फलफले, ९९२१०००२७८
(तांत्रिक सहाय्यक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली,जि.रत्नागिरी) 


इतर टेक्नोवन
'हायब्रीड’ पवनचक्कीच्या निर्मितीतून...शेतीला चोवीस तास वीज मिळावी, रात्रीचे भारनियमन...
साध्या डोळ्यांनी न पाहता येणारे रंगही...तेल अविव विद्यापीठाने विकसित केलेल्या...
जनुकीय सुधारित पिकांसाठी अधिक...विविध पिकांमध्ये जनुकीय सुधारित जातींची भर पडत...
सूक्ष्म हवामानासाठी वारा प्रतिबंधक सजीव...थंड किंवा उष्ण वाऱ्यामुळे पिकाचे किंवा पशुधनाचे...
काटेकोर शेतीसाठी सापेक्ष आर्द्रतेचा...सापेक्ष आर्द्रता किंवा वातावरणातील बाष्प आणि पीक...
शेतीकामावेळी उडणाऱ्या धूलिकणांपासून करा...शेतीमध्ये विविध यंत्रे, अवजारांचा वापर करताना...
काकडीच्या सालापासून पर्यावरणपूरक...खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी...
शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापरशेतीसमोरील समस्यांमध्ये बदलते हवामान, मजुरांची...
अल्पभूधारक शेतकऱ्यांने तयार केले छोटे...कोविड १९ च्या काळात टाळेबंदीमुळे अनेक उद्योगाचे...
काटेकोर शेतीसाठी पिकातील तापमानाचा...पॉलिहाऊस, शेडनेट यासारख्या संरक्षित शेतीमध्ये...
स्वयंचलित बहूपीक पेरणी यंत्ररब्बी हंगामातील गहू, ज्वारी, बाजरी, साळ, हरभरा,...
महिलांसाठी शेतीपयोगी अवजारेसुधारीत अवजारांचा वापर केल्याने शेतीच्या...
पिकातील सूर्यप्रकाशाची प्रत मोजणारी...आपल्याकडेही हरितगृह, शेडनेटगृहातील लागवड वेगाने...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
संरक्षित व नियंत्रित शेतीचे तंत्रज्ञानकृषी क्षेत्रात नियंत्रित शेतीला अनन्यसाधारण...
मुळांतील स्रावके ठरतात पिकासाठी संजीवनीवनस्पतींच्या वाढीमध्ये मुळाच्या परिवेशामध्ये...
कोको उत्पादनवाढीसाठी हाताने परागीभवनाचे...कोको पिकाला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. मात्र...
वेळ, खर्चात बचत अन् गुणवत्तेसाठी...द्राक्ष बागेचे हंगाम व्यवस्थापन काटेकोरपणे होणे...
कृत्रिम बुद्धिमत्तेवर हवा नैतिकतेचा...वारविक विद्यापीठ, इंपिरिअल कॉलेज लंडन, इपीएफएल (...
पिकातील बाष्पोत्सर्जन मोजणारी उपकरणेशेतकऱ्यांनी सर्व जैविक घटक व आपले पीक याचा संबंध...