Agriculture Agricultural News Marathi article regarding use of Tipayi and Ghadvanchi for cattle milking. | Agrowon

दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाई

डॉ. जयश्री रोडगे
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

दुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांतर्गत गाई,म्हशीचे दूध काढण्याचा अभ्यास केला. दूध काढणाऱ्याच्या अडचणी लक्षात घेऊन संशोधनातून  फिरती घडवंची आणि तिपाईची निर्मिती केली.

दुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांतर्गत गाई,म्हशीचे दूध काढण्याचा अभ्यास केला. दूध काढणाऱ्याच्या अडचणी लक्षात घेऊन संशोधनातून  फिरती घडवंची आणि तिपाईची निर्मिती केली.  

गाई,म्हशीचे दूध काढण्यासाठी एका व्यक्तीला पाच ते दहा मिनिटांचा कालावधी लागत असला तरी व्यक्तीला या कालावधीत ताण सहन करावा लागतो. दूध काढताना महत्त्वाची जोखीम म्हणजे जनावराची लाथ लागून भांडे लवंडते आणि दुधाचे नुकसान होते. काहीवेळा दूध काढताना कधी कधी भांडे दोन पायांमध्ये घट्ट पकडून दोन्ही हातांनी दूध काढले जाते. यावेळी दूध काढणारी व्यक्ती अतिशय अवघडलेल्या स्थितीत बसलेली असते. त्यामुळे दूध काढणाऱ्या व्यक्तीवर शारीरिक आणि मानसिक ताण 
असतो. 

संशोधनाचे निष्कर्ष 

 • जेव्हा दूध काढणाऱ्या व्यक्तीची अवघडलेल्या शारीरिक स्थितीबाबत संशोधन केले तेव्हा असे दिसून आले की, या शारीरिक व मानसिक ताणामुळे दूध काढणाऱ्या व्यक्तीची ह्रदय गती लक्षणीयरीत्या वाढते. कधी कधी ह्रदयगती धोकादायक पातळी गाठते. म्हणून दूध काढणे हे काम अत्यंत जोखमीचे आहे. 
 • दूध काढणाऱ्या व्यक्तीला येणारी अडचण म्हणजे दूध काढताना होणारी जनावरांची हालचाल.  सकाळी, संध्याकाळी दूध काढताना गाई,म्हशी माश्या व डास चावल्यामुळे वैतागून शेपटी आणि पाय हलवतात. यामुळे भांड्याला लाथ लागून दूध सांडते. महिन्याकाठी साधारणत: १ ते २ लिटर दूध या कारणामुळे वाया जाते. 

 

फिरती घडवंची आणि तिपाईची निर्मिती 
दुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांतर्गत गाई,म्हशीचे दूध काढण्याचा अभ्यास केला. दूध काढणाऱ्याच्या अडचणी लक्षात घेऊन संशोधनातून  फिरती घडवंची आणि तिपाईची निर्मिती केली.  

 • फिरत्या घडवंचीला चाके लावलेली आहेत. त्यामुळे दुधाचे भांडे ठेवल्यानंतर ते सहज मागे पुढे फिरवता येते. गाई,म्हशींच्या हालचालीमुळे किंवा लाथ लागल्यामुळे ही घडवंची लवंडत नाही. 
 • दूध काढताना तिपाईवर बसल्यामुळे दूध काढणारी व्यक्ती अवघडलेल्या स्थितीत बसत नाही. 
 • आरामदायी सुविधांमुळे दूध काढणाऱ्या व्यक्तीचा मानसिक व शारीरिक ताण कमी होतो. दूध काढणाऱ्या व्यक्तीची ह्रदययगती प्रमाणात राहते. दूध काढणे हे कार्य जोखीम न वाटता आरामदायीरित्या पार पाडता येते. 

प्रमुख फायदे 

 • कोणत्याही प्रकारचे भांडे घडवंचीमध्ये बसते. 
 • घडवंचीमध्ये भांडे ठेवून दूध काढणे आरोग्यदायक आहे, भांडे स्वच्छ राहते. दूध सांडण्याची भिती नाही. 
 • कुठल्याही जमिनीवर वापरता येते. 
 • गाई,म्हशींच्या हालचालीप्रमाणे घडवंची सरकते, त्यामुळे चुकून लाथ मारल्यास भांड्यातील दूध सांडत नाही. कार्यक्षमतेमध्ये वाढ. 
 • दूध काढताना हात ठेवण्यास आरामदायक. शारीरिक सुस्थितीमध्ये सुधारणा. 
 • श्रम व वेळेची बचत होते. आरामदायक बसून दूध काढता येते. 
 • गाई,म्हशींच्या हालचालीप्रमाणे दूध काढताना तिपाई फिरवता येते. 
 • स्थानिक कारागिराकडून फिरती घडवंची आणि तिपाई तयार करून घेता येते.

- डॉ. जयश्री रोडगे,९५९४००५८४०
 (अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प, गृह विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 

टॅग्स

इतर टेक्नोवन
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...
चाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...
स्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...
सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...
पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...
यांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...
विरळणी, तण काढणी करा झोपून!अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
योग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...