Agriculture Agricultural News Marathi article regarding use of x ray technique in animal treatment | Agrowon

जनावरांतील निदानासाठी क्ष-किरण तपासणी

डॉ. संजीव पिटलावार
बुधवार, 17 जून 2020

क्ष-किरण तपासणीद्वारे जनावरांतील जठराचा दाह, फुफ्फुसाचा दाह, हृदयाचा दाह, कर्क रोग निदान करता येते. पशूपालकांनी आजारी जनावरांची पशूतज्ज्ञांच्या सल्ल्याने क्ष-किरण तपासणी करून घ्यावी.

क्ष-किरण तपासणीद्वारे जनावरांतील जठराचा दाह, फुफ्फुसाचा दाह, हृदयाचा दाह, कर्क रोग निदान करता येते. पशूपालकांनी आजारी जनावरांची पशूतज्ज्ञांच्या सल्ल्याने क्ष-किरण तपासणी करून घ्यावी.

पशुवैद्यकशास्त्रामध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. संगणक तंत्रामुळे क्ष-किरण, सोनोग्राफी, कलर डॉपलर, एम आर आय, सिटी इत्यादी उपकरणांचा वापर पशूचिकित्सेमध्ये होत आहे. क्ष-किरण तंत्राचा वापर क्ष-किरण यंत्र, मॅमोग्राफी, संगणकीय टोमोग्राफी(सीटी) यामध्ये केला जातो.  

 • जनावरे आणि मनुष्यातील क्ष-किरण तपासणीत फरक नसतो. सध्या जनावारांतील क्ष-किरण तपासणी उपकरणे ही माणसांसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांपेक्षा मोठ्या क्षमतेची आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मानवाकरिता १००० मिली अम्पियर या क्षमतेच्या यंत्राचा वापर करण्याचे निर्देश आहेत. 
 • सध्या पशूवैद्यक व पशूविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे दोन प्रकारची क्ष-किरण उपकरणे उपलब्ध आहेत. एक उपकरण हे ८०० मिली अम्पियर क्षमतेचे आहे. सदर उपकरण हे अचल प्रकारात मोडते. दुसरे उपकरण हे १०० मिली अम्पियर क्षमतेचे असून ते चल प्रकारात मोडते. अचल प्रकारच्या उपकरणांची भेदन क्षमता व गुणवत्ता ही इतर कोणत्याही प्रकारच्या यंत्रापेक्षा जास्त असते. 

जनावरांची तपासणी ः 

 • गाय, बैल, म्हैस, घोडा, वराह, सरपटणारे प्राणी, जंगलातील प्राणी, सर्व प्रकारचे पक्षी, शहामृग व जलाशयातील प्राणी यांची सुद्धा क्ष-किरण तपसणी करता येते.
 • क्ष किरण तपासणीद्वारे अख्याद्य वस्तू खाल्यामुळे होणारे आजार, हृदयाचा दाह, शिंगाचा कर्करोग, मुतखडा, जबड्याचे विकार, दातांचे विकार, सांध्याचे विकार, अस्थिभंग, पोटाचे आजार, अन्ननलिकेचे आजार इत्यादी आजारांचे निदान करण्यात आले.
 •  क्ष-किरण तपासणी पूर्वी जनावरांस कमीत कमी १२ ते २४ तास उपाशी ठेवणे फायद्याचे ठरते, कारण क्ष-किरण तपासणी विविध कारणाकरिता करण्यात येते. त्यानुसार जनावरांच्या कोणत्या भागाची तपासणी करावयाची आहे त्यानुसार भुलीचे इंजेक्शन देण्याची गरज आहे किंवा नाही हे ठरविले जाते. 
 •  उदाहरणार्थ जनावरास काही निदानाकरिता पाठीच्या कण्यावर उताणे करावे लागते, अशावेळी जनावरास त्रास होऊ नये म्हणून 
 • भुलीचे इंजेक्शन देण्याची गरज पडते. त्याचप्रमाणे अस्थिभंग या प्रकारात वेदना 
 • शमविण्यासाठी सुद्धा भुलीचे इंजेक्शन देण्यात येते.

 तपासणीचे नियम  

 • क्ष-किरण तपासणी कोठीही करता येत नाही, कारण अणु ऊर्जा नियामक मंडळ यांच्या अणु उर्जा विकिरण संरक्षण नियम २००४ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार क्ष-किरण कक्षाची स्थापना व देखरेख करणे क्रमप्राप्त असते. यामध्ये क्ष-किरण परीक्षण कक्ष, नियंत्रण पॅनेल कक्ष व अंधार खोली कक्ष  असतात. ज्यामध्ये वेगवेगळी प्रक्रिया करणे गरजेचे असते. त्यामुळे अणु ऊर्जा नियामक मंडळ यांच्या संमतीने घोषित जागेवरच क्ष-किरण तपासणी करावी लागते.
 • परंतु काही आवश्यक ठिकाणी गरजेनुसार वाहनात सदर यंत्राची स्थापना करता येते. दिलेल्या परवानगीनुसार क्ष-किरण तपासणी करता येते.
 • तपासणी करते वेळी शक्यतोवर जमेल तेवढ्या कमी मनुष्यबळाचा वापर करावा.
 • तपासणी कक्षात उपस्थित सर्वांनी लेड अप्रोन, लेड चष्मा, लेड कॉलर घालणे आवश्यक असते. 
 • बऱ्याच वेळा तपासणीकरिता जनावर पाडावे लागते. त्यामुळे जनावराची मानसिकता बदलते. या वेळी काहीवेळा जनावर हिंसकपणे प्रतिकार करते, इजा पोहोचवू शकते. त्यामुळे जनावरास भूल देणे क्रमप्राप्त ठरते. 
 • क्ष-किरण तंत्रज्ञ व सहाय्यक यांना मनगटावर बॅज घालणे आवश्यक आहे. क्ष-किरण कक्षात १८ वर्षांखालील बालकास, गरोदर महिलेस प्रवेश देऊ नये. 
 • क्ष-किरण तपासणीमुळे जनावरांच्या शरीरावर नगण्य असे परिणाम होतात. परंतु क्ष-किरण तंत्रज्ञ व सहाय्यक यांचेवर सततच्या क्ष-किरणांच्या माऱ्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतात. कारण, क्ष-किरण हे कार्सिनोजेनिक म्हणजेच कर्करोग घडवून आणणारे किरण असतात. त्यामुळे क्ष-किरण कक्षात कुणासही प्रवेश निषेध असतो.
 • साधारणतः क्ष-किरण तपासणीसाठी तीनशे रुपये इतका खर्च येतो, त्याच प्रमाणे विशेष स्वरूपाच्या तपासणीकरिता खर्च वाढू शकतो ज्या मध्ये पोझिटीव्ह कॉन्ट्रास्ट, निगेटिव्ह कॉन्ट्रास्ट किंवा डबल कॉन्ट्रास्ट अशा पद्धतीच्या चाचण्या केल्यास खर्च अधिक होऊ शकतो.

तपासणीचे फायदे  

 • प्रामुख्याने अंतर्गत अवयवांचे विविध आजार जे बाह्य स्वरूपात दिसून येत नाहीत, अशा आजारांच्या निदानासाठी क्ष-किरण उपकरणांचा फायदा होतो.
 • फुफ्फुसांचा दाह इतर उपलब्ध कोणत्याही प्रकारच्या उपकरणाद्वारे सहजरित्या निदान पुष्टीकरण देऊ शकत नाही. हृदयास सूज तपासण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर आहे. 
 • जनावर अशक्त, कमजोर असेल आणि वेळीच उपचार न मिळाल्यास जनावर दगावते. विविध आजारांचे निदान क्ष-किरण उपकरणा अभावी करणे कठीण, वेळ खाऊ व खर्चिक ठरते. क्ष-किरण तपासणी ही कमी वेळेत निदान पुष्टी करू शकते. त्यामुळे क्ष-किरण तपासणी ही फायदेशीर ठरते.

 

तपासणीद्वारे आजाराचे निदान 

 • अस्थी भंग तसेच पोटातील व छातीतील अखाद्य वस्तुची तपासणी. 
 • सुई, तार, खिळे इत्यादी वस्तुचे अपघाती सेवन केल्यामुळे सदर वस्तू ही फुफ्फुस व हृदयाला इजा करते. दाह निर्माण करते. त्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो, अशा आजारांचे निदान. काही वेळा भटकी जनावरे आंब्याची कोय, कांदा, बटाटा, मोसंबी, चामड्याचे तुकडे खातात. हे घटक अन्ननलिकेत अडकतात. त्यामुळे जनावरांमध्ये पोट फुगी होते. त्याची तपासणी करता येते.
 •  निमोनिया, छातीत पाणी साचणे, मुत्राशायात लघवी कोंडणे, मूतखडे, शिंगाचा कर्करोग इत्यादी अनेक आजारांचे निदान क्ष-किरण तपासणीद्वारे शक्य आहे.

-  डॉ. संजीव पिटलावार, ८६०५५३४८६४
(पशुशल्यचिकित्सा व क्ष किरण विभाग,पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर) 

टॅग्स

इतर कृषिपूरक
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...
जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्षपावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक...
शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे...
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वेदूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी...
संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रेसद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वशेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या...
दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन...अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स ...
जनावरे, गोठ्याची ठेवा स्वच्छतापावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका...
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करामनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला...
जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढेविदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी...
जनावरांच्या आहारात मूरघासाचा वापरमूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता...