Agriculture Agricultural News Marathi article regarding Vegetable cultivation. | Page 2 ||| Agrowon

वेलवर्गीय पिकासाठी मंडप उभारणी

बी.जी. म्हस्के, डॉ. एन. एम. मस्के
शुक्रवार, 23 जुलै 2021

 मंडपामध्ये वेली ६ ते ७ महिने चांगल्या राहतात. जमिनीवर केवळ ३ महिने चांगल्या राहतात. मंडपावर वाढवलेल्या वेलीची वाढ चांगली होते. फळांची संख्या अधिक राहते. उत्पादन अधिक मिळते.

 मंडपामध्ये वेली ६ ते ७ महिने चांगल्या राहतात. जमिनीवर केवळ ३ महिने चांगल्या राहतात. मंडपावर वाढवलेल्या वेलीची वाढ चांगली होते. फळांची संख्या अधिक राहते. उत्पादन अधिक मिळते.

  • वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा व घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश होतो. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे आवश्यक असते. त्यातून दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते. 
  • सामान्यतः वेलीसाठी मंडप किंवा तारेच्या ताटीचा आधार देता येतो. मंडप उभारणी करताना लोखंडी खांबाचा किंवा बांबूचा वापर केला जातो. खांब किंवा बांबू कुजू नयेत, यासाठी जमिनीत गाडल्या जाणाऱ्या भागावर गाडण्यापूर्वी डांबर लावावे. मंडपाच्या सर्व तारांना सारखा ताण देणे आवश्यक आहे. तारा केवळ हाताने किंवा पकडीच्या साह्याने ओढून पाहिजे तेवढा ताण देता येत नाही. त्यासाठी लोखंडी पुलर व लाकडी पुलरचा वापर करणे फायदेशीर ठरते. 
  • मंडप पद्धतीमध्ये दोन ओळींतील अंतर १० ते १२ फूट आणि दोन वेलींतील अंतर ३ फूट ठेवावे. एक टोक वेलाचा खोडाजवळ काठीच्या आधाराने बांधावे, तर दुसरे टोक तारेस बांधावे. वेलीची वाढ ५ फूट होईपर्यंत वेलीची बगलफूट काढत राहावी. मुख्य वेल मंडपावर पोहोचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा. राखलेल्या बगलफुटींच्या वाढ होण्यासाठी भर द्यावा. 

मंडप उभारणीचे फायदे

  • मंडपामध्ये वेली ६ ते ७ महिने चांगल्या राहतात. जमिनीवर केवळ ३ महिने चांगल्या राहतात.
  • मंडपावर वाढवलेल्या वेलीची वाढ चांगली होते. फळांची संख्या अधिक राहते. उत्पादन अधिक मिळते.
  • वेलवर्गीय भाजीपाला पिकाची पाने व फळे यांचा संपर्क जमिनीशी होत नाही. फळाची व्यवस्थित वाढ होऊन फळाचा रंग सारखा व चांगला राहतो. त्यामुळे गुणवत्ताही चांगली राहते.
  • मंडप पद्धतीमध्ये हवा चांगल्या प्रकारे खेळती राहत असल्याने सडण्याचे, कीड व रोगाचे प्रमाण कमी राहते. फवारणीसुद्धा व्यवस्थित करता येते. 
  • फळाची तोडणी, खुरपणी ही कामे अत्यंत सुलभ रीतीने होतात. पिकात दोन ओळींमध्ये कमी कालावधीचे १ ते २ महिन्यांचे आंतरपीक उदा. पालेभाज्या, कोथिंबीर, पालक इ.

- बी.जी. म्हस्के,
 ९०९६९६१८०१
(सहायक प्राध्यापक, एम. जी. एम  नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, औरंगाबाद)


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...