Agriculture Agricultural News Marathi article regarding vegetable handling. | Agrowon

भाजीपाल्याची योग्य हाताळणी महत्वाची

डॉ. संजूला भावर, डॉ. अजय किनखेडकर
शनिवार, 4 एप्रिल 2020

पॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो.त्यामुळे टिकवण क्षमता वाढवून भाजीपाला योग्य त्या ठिकाणी पाठवता येतो.साठवणुकीच्या पद्धतीचा भाजीपाल्याचा पोत, टिकवण क्षमता, रंग आणि गुणवत्तेवर परिणाम होतो. 

पॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो.त्यामुळे टिकवण क्षमता वाढवून भाजीपाला योग्य त्या ठिकाणी पाठवता येतो.साठवणुकीच्या पद्धतीचा भाजीपाल्याचा पोत, टिकवण क्षमता, रंग आणि गुणवत्तेवर परिणाम होतो. 

  • भाजीपाला काढणीची परिपक्वता ही टिकवण क्षमतेवर खूप परिणाम करते. भाजीपाला अपरिपक्व किंवा अतिपक्व अशा दोन्ही अवस्थेत काढल्यास गुणवत्ता कमी होते. काही पालेभाज्या व काकडी, गावर, मटार, भेंडी इ. अपरिपक्व अवस्थेत काढणी करावी लागते. जर काढणी करण्यास उशीर झाला तर हे अतिपक्व होऊन खाण्यायोग्य राहत नाही.
  • काढणीच्या वेळेवर भाजीपाल्याची गुणवत्ता व टिकवण क्षमता अवलंबून असते. भाजीपाल्याची काढणी करताना प्रामुख्याने आकारमान, पोत हे घटक लक्षात घेतात. त्यानुसार काढणी केली जाते. 
  • काढणी हाताने करतो की यंत्राने याचा फार मोठा भाजीपाल्याच्या टिकवण क्षमतेवर परिणाम होतो. भाजीपाला यंत्राने काढणी केल्यास कापणे, ब्रशिंग करणे यांसारख्या क्रियेमध्ये भाजीपाल्याला जखमा होतात. त्यामुळे रोग वाढण्याची शक्यता अधिक होते. बहुतेक फळे व भाजीपाला तसेच सर्व फुले यांची काढणी हातानेच केली जाते. कंदवर्गीय भाजीपाला जसे की, कांदा, बटाटा, रताळे यांची काढणी यंत्राने केली जाते. 
  • एकदा का भाजीपाल्याची काढणी केली की त्यानंतर भाजीपाल्याची गुणवत्ता वाढत नाही, फक्त भाजीपाला खराब होण्याची क्रिया कमी करता येते. हा भाजीपाला वेगवेगळ्या प्रक्रियेने अधिक काळ टिकवून ठेवता येतो. त्यामध्ये भाजीपाला धुणे, प्रतवारी करणे, साठवणूक करणे इ. क्रियांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो.
  • भाजीपाला धुणे व ब्रशिंग केल्यामुळे शेतातील माती, फवारणीचे अवशेष, मावा मुळे तयार झालेला चिकट पदार्थ इ. निघून जाते. मात्र ब्रशिंग केल्यामुळे बारीक इजा होतात. त्यामुळे रोग तयार होण्याची शक्यता वाढते, म्हणून शक्यतो भाजीपाला ब्रशिंग करणे टाळावे. 

साठवणुकीचे नियोजन 
भाजीपाला थंड करणे : उष्णता निघून जाण्यासाठी भाजीपाला थंड करणे फार गरजेचे असते. भाजीपाला वेगवेगळ्या पद्धतीने थंड केला जातो. थंड केल्यामुळे भाजीपाल्याचा रंग, पोत, चव टिकून राहते, तसेच श्वसन क्रिया मंदावते, आतील पाण्याचा नाश कमी होतो, इथिलीनची निर्मिती कमी होते, भाजीपाला कुजण्याची क्रिया मंदावते.

पॅकेजिंग : पॅकेजिंगचा भाजीपाल्याच्या टिकवण क्षमतेवर फार मोठा परिणाम दिसून येतो. जर एखाद्या पॅकेटमध्ये कमी गुणवत्तेचा माल असेल, तर तो एका पॅकेटमधून दुसऱ्य पॅकेटला लागतो. जर पॅकेजिंग चांगले असेल तर असे होत नाही. पॅकेजिंगमुळे श्वसन क्रिया मंदावते, भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो.त्यामुळे टिकवण क्षमता वाढवून भाजीपाला योग्य त्या ठिकाणी पाठवता येतो.

साठवणूक : साठवणुकीच्या पद्धतीचा भाजीपाल्याचा पोत, टिकवण क्षमता, रंग यावर परिणाम होतो. साठवणुकीच्या वेळेस जर श्वसन क्रिया कमी असेल, आर्द्रता जास्त असेल तर भाजीपाला सुकत नाही. बहुतेक भाजीपाला साठवणुकीसाठी ८० ते ९० टक्के आर्द्रता लागते.

 - डॉ. संजूला भावर, ८६००३४४०९७
(विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र,खामगाव,जि.बीड)

टॅग्स

इतर कृषी प्रक्रिया
काजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थमहाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
फळे व पालेभाज्यांचे कॅनिंगफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण...
बचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...
अन्नधान्य साठवणुकीच्या पद्धतीशेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या...
फळे आणि भाज्या निर्जलीकरणाच्या विविध...मागील भागात आपण छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या...
फळे, भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पध्दतीफळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता कमी...
असे तयार करा कारल्यापासून चिप्स, रसकारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर...
फळे, पालेभाज्यांचे निर्जलीकरण ठरते...निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून...
साठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
महत्त्व‘प्रोबायोटीक’ खाद्यपदार्थांचे...शरीरातील आतड्यांमध्ये आढळणारे लॅक्टोबिसीलस आणि...
गुलकंद अन सुगंधी तेलनिर्मितीदर नसल्याने फेकून द्याव्या लागणाऱ्या किंवा वाया...
खरबुजाचे मूल्यवर्धित पदार्थखरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
भाजीपाल्याची योग्य हाताळणी महत्वाचीपॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो....
गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे...सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात मोठे महत्व आले...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...
केळीपासून प्युरी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...