तयार करा ग्रामविकास आराखडा

सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, याशिवाय गावातील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्ती, यांचा समावेश ग्रामसंसाधन गटात असतो. या संसाधन गटाने विस्तार अधिकारी व प्रवीण प्रशिक्षक यांच्या सहयोगातून ग्रामविकास आराखड्याचा मसुदा तयार करावा.
group discussion with villagers
group discussion with villagers

सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, याशिवाय गावातील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्ती, यांचा समावेश ग्रामसंसाधन गटात असतो. या संसाधन गटाने विस्तार अधिकारी व प्रवीण प्रशिक्षक यांच्या सहयोगातून ग्रामविकास आराखड्याचा मसुदा तयार करावा.

लोकसहभाग नियोजन प्रक्रियेत सूक्ष्म नियोजन कसे केले जाते. ?  तीन दिवसांची नियोजन प्रक्रिया सुरू होण्याच्या आदल्या दिवशी प्रवीण प्रशिक्षक व प्रभारी अधिकारी दुपारनंतर गावात येतात. त्या दिवसाला शून्य दिवस म्हणतात. त्या दिवशी दुपारी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा परस्पर परिचयाचा कार्यक्रम व गावातील संसाधन गटाची भेट घेऊन त्यांचे समवेत ग्रामस्थांसह गावात वातावरणनिर्मितीसाठी मशाल फेरी काढावी. ग्रामस्थांना विकासाची संकल्पना व ग्रामपंचायत विकास आराखडा याबाबत माहिती द्यावी.   पहिल्या दिवशी काय काम केले जाते?  शून्य दिवशी मशालफेरीने गावात कल्पना दिल्यानंतर पहिल्या दिवशी सकाळी प्रभात फेरी काढावी. त्यामध्ये ग्रामसंसाधन गट, प्रवीण प्रशिक्षक, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी यांना सहभागी करून घ्यावे. दुपारी ग्रामपंचायत किंवा योग्य ठिकाणी चर्चासत्राचे आयोजन करून गावाची व ग्रामपंचायतीची बलस्थाने, कमकुवत घटक, संधी, धोके याचे विश्‍लेषण करावे. या चर्चासत्रात प्रवीण प्रशिक्षक व संशोधन गटाने सहभाग घेऊन चर्चा करावी. त्याच दिवशी दुपारी २०११ ची जनगणना माहिती, ग्रामपंचायत निधीची उपलब्धता, पायाभूत सुविधांची माहिती यावर आधारित सामाजिक नकाशा करण्यात यावा. सायंकाळी गावस्तरावरील विविध समित्या, विविध घटक, शेतकरी अधिकारी प्रवीण प्रशिक्षक व ग्रामसंसाधन गटाने चर्चा करावी.  दुसऱ्या दिवशी काय करायचे असते?  पहिल्या दिवशी मिळालेल्या माहितीच्या आधारावर गावाच्या विकासाचे उपक्रम, त्यांचे विश्‍लेषण व नियोजन करण्याची सुरवात होते. त्यासाठी अधिक माहिती मिळावी म्हणून किशोरी व महिला बैठकांच्या आधारे प्राप्त परिस्थितीची माहिती मिळविली जाते. त्याचबरोबर बालसभेचेही आयोजन करण्यात येते. याच दिवशी शिवारफेरी, पायाभूत सुविधांची पाहणी, यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे गावसंसाधन नकाशा तार करावयाचा असतो.  तिसऱ्या दिवसाचा दिनक्रम कसा असतो?  तिसऱ्या दिवशी महिलासभा, बालसभेचे आयोजन करून जी माहिती एकत्र केली जाते, त्यामध्ये महिलांचे व बालकांचे विषय वाचून दाखवून काही मुद्दे राहिले असल्यास त्यांचा समावेश करून माझ्या स्वप्नातील गाव तयार करण्यासाठी ग्रामविकास आराखड्याचा मसुदा तयार केला जातो. अंतिम ग्रामसभा घेऊन या ग्रामसभेत तयार केलेल्या ग्रामविकास आराखड्यास मंजुरी देण्यात येते.  ग्रामसंसाधन गटामध्ये कोण कोण असते?  सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक/ शिक्षक, ग्रामपंचायतीच्या सर्व समित्यांचे सदस्य, कृषी सहायक, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वयंसेवक, पशुधन पर्यवेक्षक, आशा वर्कर, आरोग्य सेवक/ सेविका, युवक/ युवती गट, बचत गट (अध्यक्ष/ सचिव), ग्रामरोजगार सेवक, वनपाल/ वनरक्षक, जलसुरक्षक, संगणक परिचालक याशिवाय गावातील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्ती, यांचा समावेश ग्रामसंसाधन गटात असतो. या संसाधन गटाने विस्तार अधिकारी व प्रवीण प्रशिक्षक यांच सहयोगातून ग्रामविकास आराखड्याचा मसुदा तयार करायचा असतो.   - डॉ. कैलास बवले, ८८८८८९२७५७ (समन्वयक, डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्‍वत ग्रामविकास केंद्र,  गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com