green manuring in sugarcane
green manuring in sugarcane

हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता

कोकणात चांगल्या पावसाची शक्‍यता, उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात हलक्‍या स्वरूपात, तर काही जिल्ह्यांत मध्यम स्वरूपात, तसेच मराठवाड्याच्या बऱ्याचशा जिल्ह्यांत हलक्‍या स्वरूपात व काही जिल्ह्यांत मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे.

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून, कोकणावर १००२, तर दक्षिणेस १००४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब आहे. बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहण्यामुळे व मराठवाड्याच्या काही भागावर व विदर्भावरील वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहण्यामुळे पावसाच्या वितरणावर परिणाम होणार आहे. कोकणात चांगल्या पावसाची शक्‍यता, उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात हलक्‍या स्वरूपात, तर काही जिल्ह्यांत मध्यम स्वरूपात, तसेच मराठवाड्याच्या बऱ्याचशा जिल्ह्यांत हलक्‍या स्वरूपात व काही जिल्ह्यांत मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम व मध्य विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या व मध्यम स्वरूपात, तसेच दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे.  बुधवारपासून महाराष्ट्रावरील हवेचे दाब वाढण्याची शक्‍यता असून, पावसात उघडीप व त्यानंतर हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता राहील. आठवडाभर हवामान ढगाळ राहील. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता मध्यम स्वरूपात राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. तो प्रकर्षाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात जाणवेल.   कोकण दक्षिण व उत्तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे तसेच पालघर जिल्ह्यात ४८ ते ५६ मि.मी., तर सोमवारी सर्वच जिल्ह्यांत ७० मि.मी. पावसाची शक्‍यता असून, बऱ्याच भागात विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. काही भागात अतिवृष्टीचीही शक्‍यता आहे.  सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर रायगड व ठाणे जिल्ह्यात ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ठाणे जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस इतके अधिक राहील, तसेच रायगड जिल्ह्यात ते २६ अंश सेल्सिअस आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९३ टक्के राहील,  तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८६ टक्के राहील.  उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात रविवारी ३२ मि.मी., तर सोमवारी २४ मि.मी. पावसाची शक्‍यता असून, पावसाचे प्रमाण पश्‍चिम भागात अधिक व पूर्व भागात कमी राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात रविवारी ६ ते १७ मि.मी., तर सोमवारी ९ ते १२ मि.मी. राहील. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक, नंदूरबार व धुळे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस सर्वच जिल्ह्यांत राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८९ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ७२ टक्के राहील.  मराठवाडा  उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यात पावसात उघडीप राहणे शक्‍य आहे. उर्वरित नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांत ३ ते ७ मि.मी. अल्प पावसाची शक्‍यता राहील, औरंगाबाद जिल्ह्यात  २० ते २३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. परभणी व जालना जिल्ह्यात ९ ते १३ मि.मी. व हिंगोली जिल्ह्यात ६ मि.मी. पावसाची शक्‍यता सोमवारी आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. मात्र परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ते ३५ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात ते २६ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७९ ते ८५ टक्के, तर दुपारची ५२ ते ६१ टक्के राहील.  पश्‍चिम विदर्भ बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात रविवारी १२ ते  १६ मि.मी. पावसाची शक्‍यता असून, सोमवारी बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यात १५ मि.मी. व अमरावती जिल्ह्यात ३३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ५८ टक्के राहील.  मध्य विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात १२ मि.मी., तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात २० ते २२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सोमवारी वर्धा जिल्ह्यात १४ मि.मी., यवतमाळ जिल्ह्यात १७ मि.मी. व नागपूर जिल्ह्यात ३० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे.  कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील.  पूर्व विदर्भ या आठवड्यात पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण चांगले राहील. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांत २४ ते २८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे, तर सोमवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ४६ मि.मी., तसेच चंद्रपूर जिल्ह्यात ६६ मि.मी. व गडचिरोली जिल्ह्यात ८० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. पावसाचे प्रमाण चांगले राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९२ टक्के, तर दुपारची ५५ ते ५८ टक्के राहील.  दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्ह्यात ४० मि.मी. पावसाची शक्‍यता असून, उर्वरित सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यात ५ ते १० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. त्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यात पावसात उघडीप शक्‍य आहे. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यात ६५ मि.मी. पावसाची शक्‍यता असून, सांगली जिल्ह्यात १५ मि.मी. सातारा व सोलापूर जिल्ह्यात २५ ते ३५ मि.मी. व पुणे व नगर जिल्ह्यात १५ ते १८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे.  कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस व उर्वरित जिल्ह्यांत ते ३० ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ अंश सेल्सिअस सर्वच जिल्ह्यांत राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ९४ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८९ टक्के राहील. 

कृषी सल्ला 

  • पीक पेरणीनंतर ३० ते ४५ दिवसांपर्यंत पिके तणविरहित ठेवावीत.  कोळपणी व खुरपणी करून तण नियंत्रण करावे अन्यथा तणांची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्यास ३३ टक्के उत्पादन घटते. तणनाशकांचा योग्य प्रकारे वापर करावा.
  • जोडओळ पट्टा पद्धतीने ऊस लागवड करायची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ फुटावर तर भारी जमिनीसाठी ३ फुटावर सलग सऱ्या पाडाव्यात. दोन सरीत उसाची लागवड करून एक सरी रिकामी सोडावी. त्यामुळे ७५-१५० सें.मी. व ९०-१८० सें.मी. या पद्धतीने सरी पडेल. रिकाम्या ओळीत दोन्ही बगलेला आंतरपीक किंवा हिरवळीच्या खतासाठी धैंचा किंवा ताग घेता येईल. 
  • कांदा रोपांच्या जोमदार व सशक्त वाढीसाठी गादी वाफ्यावर रोपवाटिका तयार करावी. गादी वाफे एक मीटर रुंद व जमिनीच्या उपलब्धतेनुसार लांब करावेत. वाफ्याची उंची १५ सेंमी ठेवावी.   
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com