Agriculture Agricultural News Marathi article regarding weather forecast. | Page 2 ||| Agrowon

काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता

डॉ.रामचंद्र साबळे
रविवार, 20 सप्टेंबर 2020

महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे कोकणासह उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात विस्तृत स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे कोकणासह उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात विस्तृत स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ४० ते ७६ मिमी तर उत्तर कोकणात रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात २४ ते ३८ मिमी पावसाची शक्‍यता आहे. उत्तर महाराष्ट्रात २५ ते ३८ मिमी, मराठवाड्यात २२ ते ३२ मिमी, पश्‍चिम विदर्भात २१ ते ३० मिमी, मध्य विदर्भात २८ ते २९ मिमी, पूर्व विदर्भात १० ते ३८ मिमी तर दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्रात १६ ते ४३ मिमी पावसाची शक्‍यता आहे. नैऋत्य मान्सूनचा प्रभाव राहील.

गुरुवार व शुक्रवार (ता.२४,२५) रोजी महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००४ तर दक्षिण भागावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. शनिवार (ता.२६) रोजी संपूर्ण महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १००६ हेप्टापास्कल इतकी वाढ होईल. त्यामुळे पावसात उघडीप राहील. त्याचवेळी ईशान्य भारतावरील हवेच्या दाबात १००८ इतकी वाढ होईल. यामुळे परतीचा पाऊस म्हणजेच ईशान्य मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होईल. तोपर्यंत राजस्थानसह उत्तर भारतात नैऋत्य मान्सूनचा प्रभाव कायम राहील. परतीच्या मान्सूनला अजून बराच काळ बाकी आहे. यावर्षी परतीच्या म्हणजेच ईशान्य मान्सूनला सुरुवात होण्यास थोडा विलंब होणार आहे. 

कोकण  
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवशी ५७ ते ७६ मिमी पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्‍यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ४० ते ५१ मिमी, रायगड व पालघर जिल्ह्यात २८ ते ३० मिमी तर ठाणे जिल्ह्यात २४ ते ३६ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैऋतेकडून तर रायगड, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी राहील. कमाल तापमान रत्नागिरी जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस व ठाणे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. दक्षिण कोकणात आकाश पूर्णतः ढगाळ तर उत्तर कोकणात अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८२ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र  
नाशिक जिल्ह्यात काही दिवशी २८ ते ३८ मिमी, धुळे जिल्ह्यात २५ ते २६ मिमी, नंदूरबार जिल्ह्यात १० ते ३८ मिमी तर जळगाव जिल्ह्यात २२ ते ३२ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात नैऋतेकडून तर धुळे व जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस तर नंदूरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७१ टक्के राहील.

मराठवाडा  
उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात काही दिवशी २९ ते ३२ मिमी तर लातूर व परभणी जिल्ह्यात २४ ते ३० मिमी पावसाची शक्‍यता आहे. बीड जिल्ह्यात ३० ते ३७ मिमी, हिंगोली व जालना जिल्ह्यात १९ ते २२ मिमी तर औरंगाबाद जिल्ह्यात ८ ते २६ मिमी पावसाची शक्‍यता आहे. काही काळ पाऊस तर काही काळ उघडीप राहील. वाऱ्याचा दिशा औरंगाबाद जिल्ह्यात ईशान्येकडून तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व जालना जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १४ किमी राहील. कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, बीड व जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान औरंगाबाद जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, नांदेड, परभणी, जालना व हिंगोली जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ७४ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ 
बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात काही दिवशी २५ ते ३१ मिमी तर अकोला व वाशिम जिल्ह्यात १५ ते २२ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग १० ते १४ किमी राहील. कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर अकोला व वाशिम जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, अमरावती जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अमरावती जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर उर्वरित बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९१ टक्के तर दुपारची ६३ ते ७१ टक्के राहील.

मध्य विदर्भ 
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात काही दिवशी २८ ते २९ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ८ ते ११ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६९ टक्के राहील.

पूर्व विदर्भ 
गडचिरोली जिल्ह्यात काही दिवशी ३६ ते ३८ मिमी, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात १० ते १५ मिमी पावसाची शक्‍यता आहे. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून, गडचिरोली जिल्ह्यात आग्नेयेकडून तर गोंदिया जिल्ह्यात नैऋतेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग चंद्रपूर जिल्ह्यात ८ किमी तर उर्वरित गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २ ते ४ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९४ टक्के तर दुपारची ५३ ते ६५ टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र 
कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी ७६ मिमी पावसाची शक्‍यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्‍यता राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यात काही दिवशी १६ ते ४३ मिमी पावसाची शक्‍यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋतेकडून आणि ताशी वेग ६ ते १३ किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७९ टक्के राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील.

कृषी सल्ला 

  • पावसात उघडीप होताच परिपक्व झालेल्या सोयाबीन पिकाची काढणी करावी. मळणी करून धान्य सुरक्षित स्थळी ठेवावे.
  • खरीप भुईमुगाचे पीक परिपक्व होताच काढणी करावी. शेंगा उन्हात वाळवून सुरक्षित स्थळी साठवण करावी.
  • भात खाचरात पाण्याची पातळी ५ ते १० सेंमी ठेवावी. 

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र राज्य)


इतर ताज्या घडामोडी
काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना...ही योजना काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर,...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
संरक्षित शेतीचे महत्त्वसंरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा...
पोषक आहारासाठी बियाणे स्वावलंबन...येत्या काळात कमी पाण्यावर येणारी पिके बाजरी,...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके...सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला...
सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा...
कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूचनाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी...
लाचखोर तलाठ्यास कारावासवर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा...
‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी...कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध...
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३०...मुंबई : कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक...
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?...मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये...
शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः...करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने...सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला...
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल...सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा...
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली...
रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकटरत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार...
नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत...येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी...
नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी...नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली...
रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच...रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन...